Guru Gobind Singh Jayanti 2022 | सुखी आयुष्यासाठी गुरु गोविंद सिंग यांचे अनमोल विचार आत्मसात करा
गुरु गोविंद सिंग हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे महान पुरुष होते. त्यांनी खालसा पंथची स्थापना केली. यावर्षी गुरु गोविंद सिंग यांची जयंती रविवार, ९ जानेवारी रोजी येत आहे. यानिमित्ताने जाणून घेऊयात गुरु गोविंद सिंग यांचे विचार.
मुंबई : दरवर्षी गुरू गोविंद सिंग यांची जयंती देशभरातील शीख समुदायामध्ये प्रकाश पर्व म्हणून साजरी केली जाते. गुरु गोविंद सिंग हे शिखांचे दहावे आणि शेवटचे गुरू होते. गुरु गोविंद सिंग हे एक महान योद्धा, कवी, भक्त आणि आध्यात्मिक व्यक्तिमत्वाचे महान पुरुष होते. त्यांनी खालसा पंथची स्थापना केली. यावर्षी गुरु गोविंद सिंग यांची जयंती रविवार, ९ जानेवारी रोजी येत आहे. गुरु गोविंद सिंग यांनी खालसा पंथाची स्थापना केली आणि जीवन जगण्यासाठी पाच तत्त्वे दिली, ज्यांना पाच काकर म्हणून ओळखले जाते. गुरुजींनी आपले संपूर्ण आयुष्य लोककल्याणासाठी समर्पित केले होते. यानिमित्ताने जाणून घेऊयात गुरु गोविंद सिंग यांचे विचार.
गुरु गोविंद सिंग यांचे विचार 1. जेव्हा तुम्ही तुमच्या आतून अहंकार काढून टाकाल, तेव्हाच तुम्हाला खरी शांती मिळेल. याचा अर्थ असा होतो की माणूस आयुष्यभर शांतता शोधतो, परंतु शांतता त्याच्या आत असते. फक्त ते मिळवण्यासाठी तुम्हाला तुमचा खोटा अहंकार नष्ट करावा लागेल.
2. कोणत्याही दुःखी व्यक्ती, अपंग किंवा गरजूंना मदत केली पाहिजे. यामुळे मानसिक शांती आणि आनंद मिळेल. गुरुजींचा असा विश्वास होता की, पुण्य कर्म केल्याने माणसाचा अहंकार नाहीसा होतो आणि त्याला आंतरिक सुख आणि शांती मिळते.
3. शत्रूचा सामना करताना प्रथम साम, दाम, दंड आणि भेड यांची मदत घ्या आणि नंतरच युद्धात उतरा. योग्य रणनीती वापरून युद्ध जिंकता येते. जेव्हा शत्रूशी युद्धाची परिस्थिती असते तेव्हा माणसाने योग्य रणनीती बनवून युद्ध केले पाहिजे, तरच तो विजयी होऊ शकतो.
4. तुमच्या कमाईचा एक दशांश दान करा. प्रत्येक धर्मात दान हे सर्वश्रेष्ठ कार्य मानले जाते. देव तुम्हाला कमावण्याची संधी देतो. कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रत्येक व्यक्तीने इतर गरजू लोकांना दान करावे.
5. माणसाने पैसा, तारुण्य, त्याची जात, यांचा अभिमान बाळगू नये. जोपर्यंत तुम्ही या जगात आहात तोपर्यंत हे सर्व आहे. यानंतर आपले काहीच राहणार नाही.
6. सत्कर्म केल्यानेच तुम्ही देवाला शोधू शकता. जो माणूस चांगले कर्म करतो, त्याला देवही मदत करतो. म्हणजे केवळ भगवंताची पूजा करून काहीही होत नाही, त्याला मिळवण्यासाठी कर्मही करावे लागते.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या
Numerology | ठरवलं की पूर्ण करणारच, हीच या शुभअंकांच्या व्यक्तींची ओळख
Mangal Dosh Nivaran | मंगळ दोष दूर करण्यासाठी हे उपाय करा, सर्वकाही ‘मंगलमय’ होईल