Guru Gochar 2024: या 6 राशींचे भाग्य चमकणार, आर्थिक लाभ होण्याची शक्यता

1 मे रोजी दुपारी गुरू मेष राशीतून बाहेर पडून वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. गुरु वृषभ राशीत एक वर्ष राहणार आहे. यादरम्यान १२ जून रोजी रोहिणी नक्षत्रात तो प्रवेश करेल. यानंतर, ते 9 ऑक्टोबर रोजी प्रतिगामी होईल आणि 4 फेब्रुवारी 2025 रोजी थेट होईल. 14 मे 2025 रोजी गुरू मिथुन राशीत प्रवेश करणार आहे.

Guru Gochar 2024: या 6 राशींचे भाग्य चमकणार, आर्थिक लाभ होण्याची शक्यता
Follow us
| Updated on: Apr 30, 2024 | 9:17 PM

जेव्हा एखादा ग्रह एका राशीतून दुस-या राशीत प्रवेश करतो त्याला त्या ग्रहाचे संक्रमण म्हणतात. 1 मे 2024 रोजी बृहस्पति वृषभ राशीत प्रवेश करणार आहे. हे गुरु गोचर 1 मे रोजी दुपारी 1:50 वाजता सुरु होईल. या गुरु संक्रमणामुळे अनेक राशींचे भाग्य उजळणार आहे.

मेष : ज्योतिषाशास्त्राच्या मते, मेष राशीच्या लोकांसाठी गुरूचे संक्रमण खूप शुभ ठरणार आहे. या राशीच्या लोकांना कामाच्या ठिकाणी चांगली संधी मिळेल. याशिवाय जोडीदारासोबतच्या नात्यात गोडवा येईल आणि वैवाहिक जीवन आनंदी राहील.

वृषभ : या राशीच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल घडवून येतील. जर तुम्ही खूप दिवसांपासून नवीन गाडी घेण्याचा विचार करत असाल तर तुमचे हे स्वप्न लवकरच पूर्ण होणार आहे. याशिवाय आर्थिक स्थितीही मजबूत होईल.

मिथुन : 1 मे 2024 रोजी गुरूचे संक्रमण मिथुन राशीच्या लोकांच्या जीवनात चांगली बातमी घेऊन येईल. ज्यांना मुले नाहीत त्यांना मुले होण्याची शक्यता आहे. लग्नाचा योग जुळून येईल. नवीन काम सुरू करण्याचा विचार करत असाल तर ही वेळ चांगली आहे. तुम्हाला यामध्ये यश नक्कीच मिळेल.

सिंह : तुमच्या जीवनात अनेक नवीन बदल घडू शकतात. कामानिमित्त तुम्हाला बाहेर जाण्याचा योग येऊ शकतो. बृहस्पतिच्या संक्रमणाच्या प्रभावामुळे या लोकांचे भाग्य उजळेल आणि त्यांना प्रसिद्धी देखील मिळू शकते.

तूळ : व्यवसाय करणाऱ्यांचा नफा वाढू शकतो. जीवनात पुढे जाण्याच्या उत्तम संधी मिळू शकतात. जर तुम्ही गुंतवणूक करण्याचा विचार केला असेल तर त्यात तुम्हाला फायदा होऊ शकतो.

धनु : गुरुच्या राशीच्या लोकांवर देखील याचा खूप शुभ प्रभाव पडणार आहे. या राशीचे लोक उपासना आणि अध्यात्मावर लक्ष केंद्रित करतील. पैशाशी संबंधित समस्या दूर होतील आणि यश मिळेल.

अस्वीकरण: येथे दिलेली सर्व माहिती ही ज्योतिषशास्त्राच्या आधारावर उपलब्ध असलेल्या माहितीच्या आधारावर देण्यात आली आहे. याबाबत टीव्ही ९ मराठी कोणताही दावा करत नाही. कोणत्याही समस्येसाठी तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.

Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!
Walmik Karad Video : कराडवर मकोका....हत्येच्या गुन्ह्यात अडकला!.
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?
MSRTC Viral Video : 'मी कसं चढू?', व्हायरल होणाऱ्या एसटीच वास्तव काय?.
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख
बीडचा पालकमंत्री कोण होणार? अजित पवारांनी सांगितली थेट तारीख.
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले
कराडवर मकोका अन् पुन्हा मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी, दमानिया म्हणाले.
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?
कराडवर मकोका, सरपंच देशमुखांच्या हत्येचा कट रचला? McocaAct म्हणजे काय?.
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'
वाल्मिक कराडला मकोका अन् सुरेश धस म्हणाले...'त्यांना शिक्षा होणार'.
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्...
वाल्मिक कराडवर मकोका अन् परळी बदं, समर्थक उतरले रस्त्यावर अन्....
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका
Walmik Karad BIG Breaking : मोठी बातमी, वाल्मिक कराडवर अखेर मकोका.
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट
मविआ राहिली की संपली?; शरद पवारांचं उत्तर अन् शाहंबद्दलही गौप्यस्फोट.
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा
'मी आता विधानसभा लढणार नाही', शिवसेनेच्या माजी मंत्र्यांची मोठी घोषणा.