AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Guru Pradosh Vrat: आज गुरू प्रदोष व्रत, काय आहे या व्रताचे महत्व? ‘या’ उपायांनी होतील सर्व समस्या दुर

प्रदोषाचा दिवस सोमवारी येतो तेव्हा त्याला सोम प्रदोष, मंगळवारी पडणाऱ्या प्रदोषाला भौम प्रदोष आणि शनिवारी पडणाऱ्या प्रदोषाला शनि प्रदोष म्हणतात.

Guru Pradosh Vrat: आज गुरू प्रदोष व्रत, काय आहे या व्रताचे महत्व? 'या' उपायांनी होतील सर्व समस्या दुर
शिवलिंग Image Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jan 19, 2023 | 8:54 AM

मुंबई, प्रदोष व्रत (Guru Pradosh Vrat) हे शिवाला समर्पित मानले जाते. या दिवशी भगवान शिवासोबत माता पार्वतीचीही पूजा केली जाते. यावेळी प्रदोष व्रत 19 जानेवारी 2023 रोजी म्हणजेच आज पाळण्यात येत आहे. गुरुवारी येणाऱ्या प्रदोष व्रताला गुरु प्रदोष व्रत म्हणतात. प्रदोष व्रत चांद्र महिन्याच्या दोन्ही त्रयोदशी दिवशी पाळले जाते, त्यापैकी एक शुक्ल पक्षात आणि दुसरा कृष्ण पक्षात असतो. प्रदोषाचा दिवस सोमवारी येतो तेव्हा त्याला सोम प्रदोष, मंगळवारी पडणाऱ्या प्रदोषाला भौम प्रदोष आणि शनिवारी पडणाऱ्या प्रदोषाला शनि प्रदोष म्हणतात. असे मानले जाते की प्रदोष व्रताच्या दिवशी भगवान शंकराची विशेष प्रार्थना केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते. चला तर मग जाणून घेऊया प्रदोष व्रताचे काही खास उपाय –

प्रदोष व्रत शुभ मुहूर्त

  • प्रारंभ – 19 जानेवारी 2023, दुपारी 01:18 वाजता सुरू होईल
  • संपेल – 20 जानेवारी 2023 सकाळी 09:59 वाजता

प्रदोष व्रताचे उपाय

व्यवसायासाठी करा हा उपाय-

पिवळी मोहरी, तीळ, अख्खे मीठ आणि संपूर्ण धणे तीन मातीच्या दिव्यांमध्ये मिक्स करून तुमच्या व्यवसायाच्या ठिकाणी ठेवा. त्यामुळे व्यवसाय वाढण्यास सुरुवात होईल.

विद्यार्थ्यांसाठी उपाय-

लाल मिरचीच्या बिया काढून पाण्यात मिसळा. हे पाणी दिवसाच्या कोणत्याही वेळी सूर्याला अर्पण करावे. नैराश्याच्या समस्येपासून आराम मिळेल.

हे सुद्धा वाचा

त्रासांपासून मुक्ती मिळवण्याचा उपाय-

या दिवशी महादेवाला दही आणि मध मिश्रित भोग अर्पण करा. असे मानले जाते की असे केल्याने कौटुंबिक जीवनात येणारे त्रास दूर होतात.

शत्रूंवर विजय मिळवण्यासाठी –

गंगाजलाने स्वच्छ केलेली शमीची पाने भगवान शंकराला अर्पण करावीत. तेथे बसून ‘ओम नमः शिवाय’ चा जप करावा. प्रदोष व्रताच्या दिवशी शिव मंदिरात नारळ दान करावे आणि भगवान शंकराकडून उत्तम आरोग्याची कामना करावी. प्रदोष व्रताच्या दिवशी संध्याकाळी शिवमंदिरात दोन दिवे लावावेत. असे केल्याने भक्तांचे सर्व दुःख दूर होऊन त्यांना आराम मिळतो.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला
'सरकार मोदी की सिस्टिम राहुल गांधीकी', संजय राऊतांचा खोचक टोला.
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट
मुंबईच्या हुतात्मा चौकात राज ठाकरे आणि सुप्रिया सुळेंची आपुलकीची भेट.
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी
'जिथे खड्डे खोदले तिथेच..', वक्फच्या अधिकाऱ्यांना जलील यांची धमकी.
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील
मी निवडून आलो असतो, तर शिंदे मुख्यमंत्री झाले असते - शहाजी बापू पाटील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईच्या दौऱ्यावर.
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार
प्रवाशांनी केलं असं काही.., वैतागलेल्या चालकाने बस चालवण्यास दिला नकार.
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड
पाकने भारतासाठी एकच निर्णय घेतला अन् स्वतःच्या पायावर मारली कुऱ्हाड.
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती
पहलगाम हल्ल्यात लष्कर-ए-तैयबाच्या टॉप कमांडरचा हात, NIA कडून माहिती.
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!
विवेक फणसाळकर सेवानिवृत्त, मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी आता देवेन भारती!.
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?
मोदी सरकार भारतात जातनिहाय जनगणना करणार, केंद्राचा मोठा निर्णय काय?.