Guru Purnima : किती तारखेला आहे गुरू पौर्णिमा? मुहूर्त आणि पुजा विधी

गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख, शांती आणि समृद्धीचे वरदान मिळू शकते, असे ज्योतिषी सांगतात. या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात.

Guru Purnima : किती तारखेला आहे गुरू पौर्णिमा? मुहूर्त आणि पुजा विधी
गुरू पौर्णिमाImage Credit source: Social Media
Follow us
| Updated on: Jun 29, 2023 | 10:45 PM

मुंबई : आषाढ महिन्यातील पौर्णिमा ही गुरुपौर्णिमा (Guru Purnima 2023) म्हणून साजरी केली जाते. यावेळी गुरुपौर्णिमा 3 जुलै, सोमवारी साजरी होणार आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरूंच्या आशीर्वादाने धन, सुख, शांती आणि समृद्धीचे वरदान मिळू शकते, असे ज्योतिषी सांगतात. या दिवशी वेदव्यास यांचा जन्म झाला म्हणून याला व्यास पौर्णिमा असेही म्हणतात. हिंदू धर्मात गुरुपौर्णिमेचे विशेष महत्त्व सांगण्यात आले आहे. गुरूचे स्थान श्रेष्ठ असे मानले जाते. गुरू हा देवापेक्षाही वरचा आहे. कारण माणसाला अज्ञानाच्या अंधारातून बाहेर काढून योग्य मार्ग दाखवणारा गुरुच असतो. यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी विशेष योग होत आहे. जाणून घेऊया गुरुपौर्णिमेचा शुभ मुहूर्त आणि शुभ योग.

गुरु पौर्णिमा शुभ मुहूर्त

  • गुरु पौर्णिमा सुरू होते – 02 जुलै, रात्री 08:21 पासून
  • गुरु पौर्णिमा पूर्णता – जुलै 03, 05:08 PM

गुरु पौर्णिमा 2023 महत्व

महर्षी वेदव्यास यांचा जन्म गुरुपौर्णिमेच्या दिवशी झाला असे मानले जाते. सनातन धर्मात महर्षी वेदव्यास यांना प्रथम गुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे कारण ते मानव जातीला वेद शिकवणारे पहिले होते. याशिवाय महर्षी वेद व्यास यांना श्रीमद भागवत, महाभारत, ब्रह्मसूत्र, मीमांसा याशिवाय 18 पुराणांचे लेखक मानले जाते. यामुळेच महर्षी वेद व्यास यांना आदिगुरूचा दर्जा प्राप्त झाला आहे. गुरुपौर्णिमेच्या दिवशी महर्षी वेदव्यास यांची विशेष पूजा केली जाते.

हे सुद्धा वाचा

गुरु पौर्णिमा शुभ योग

यावेळी गुरुपौर्णिमेच्या दिवशी अनेक शुभ योग तयार होणार आहेत. या दिवशी ब्रह्मयोग आणि इंद्र योग तयार होतील. त्याचबरोबर सूर्य आणि बुध यांच्या संयोगामुळे बुधादित्य योगही तयार होणार आहे. ब्रह्मयोग 02 जुलै रोजी संध्याकाळी 07.26 ते 03 जुलै दुपारी 03.45 मिनिटांनी असेल. इंद्र योग 03 जुलै रोजी दुपारी 03:45 वाजता सुरू होईल आणि 04 जुलै रोजी सकाळी 11:50 वाजता समाप्त होईल.

गुरु पौर्णिमा पूजन पद्धत

या दिवशी सकाळी लवकर उठून घराची साफसफाई करून आंघोळ करून स्वच्छ कपडे घालावेत. यानंतर पूजेचे व्रत घ्या आणि स्वच्छ ठिकाणी पांढरे वस्त्र पसरून व्यासपीठ बांधा. यानंतर त्यावर गुरु व्यासांची मूर्ती स्थापित करून त्यांना रोळी, चंदन, फुले, फळे आणि प्रसाद अर्पण करा. गुरु व्यासांसोबतच शुक्रदेव आणि शंकराचार्य इत्यादी गुरुंना बोलावून “गुरुपरंपरसिद्धयर्थं व्यासपूजन करिष्ये” या मंत्राचा जप करा.

(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा
‘शिवेंद्रराजे यांना मंत्रिपद द्या, नाहीतर...’,पोलीस कर्मचाऱ्याचा इशारा.
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले
'... मी तर शपथ घेणार, थांबणार नाही', दादांच्या वक्तव्यानंतर सगळेच हसले.
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा
'फडणवीसांनी माझं नाव सुचवलं, आता मी...', शिंदेंनी सांगितला तो किस्सा.
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले..
शिंदे DCM पद स्वीकारणार? मंत्रिमंडळात असणार की नाही? फडणवीस म्हणाले...
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा
महायुतीचे तिन्ही नेते राजभवनावर, राज्यपालांकडे सत्तास्थापनेचा दावा.
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या...
पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळणार? सवाल करताच स्पष्टच म्हणाल्या....
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट
देवेंद्र फडणवीसांनी गटनेतेपदाच्या भाषणातून ठाकरेंना केलं थेट टार्गेट.
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण
'पुढची वाट संघर्षाची पण...', गटनेते होताच फडणवीसांचं पहिलं दमदार भाषण.
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्...
विधीमंडळाच्या गटनेतेपदी फडणवीसच, चंद्रकांतदादांकडून घोषणा अन्....
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता
रक्त सांडले जिथे मी.., सदाभाऊंकडून फडणवीसांचं कौतुक अन् केली खास कविता.