AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Supermoon 13 July 2022: रोजच्या चांदोबाने काल मध्यरात्री बदलले रूप; सुपरमुनमुळे चंद्राची चमक 15 टक्क्यांनी वाढली

बुधवारी भारतात गुरुपौर्णिमा (Guru purnima 2022) साजरी झाली. गुरूपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच लोकांनी आपल्या गुरूंना शुभेच्छा देत अभिवादन करण्यास सुरवात केली होती. याशिवाय काल एक अद्वितीय खगोलीय घटना अनुभवण्यासाठी अनेक लोकं रात्र होण्याची वाट पाहत होते, कारण काल मध्यरात्री आकाशात  सुपरमून (Supermoon 13 July 2022) दिसणार होता. काल दिसलेला सुपरमून हा वर्षातील दुसरा सुपरमून होता, ज्यामध्ये रोज […]

Supermoon 13 July 2022: रोजच्या चांदोबाने काल मध्यरात्री बदलले रूप; सुपरमुनमुळे चंद्राची चमक 15 टक्क्यांनी वाढली
| Updated on: Jul 14, 2022 | 6:59 AM
Share

बुधवारी भारतात गुरुपौर्णिमा (Guru purnima 2022) साजरी झाली. गुरूपौर्णिमेनिमित्त सकाळपासूनच लोकांनी आपल्या गुरूंना शुभेच्छा देत अभिवादन करण्यास सुरवात केली होती. याशिवाय काल एक अद्वितीय खगोलीय घटना अनुभवण्यासाठी अनेक लोकं रात्र होण्याची वाट पाहत होते, कारण काल मध्यरात्री आकाशात  सुपरमून (Supermoon 13 July 2022) दिसणार होता. काल दिसलेला सुपरमून हा वर्षातील दुसरा सुपरमून होता, ज्यामध्ये रोज आकाशात दिसणारा परिचयाचा चंद्र नेहमीपेक्षा  बदललेला दिसत होता. यावेळी चंद्राची चमक 15 टक्के अधिक अनुभवता आली.  हा अद्भुत खगोलीय प्रसंग पाहण्यासाठी लोकं सकाळपासूनच आतुरतेने वाट पाहत होते. काल गुरुपौर्णिमेच्या रात्री जेव्हा सुपरमूनचा चंद्र त्याच्या सर्वोच्च बिंदूवर पोहोचला तेव्हा लोकांच्या उत्साहनेसुद्धा सर्वोच्च शिखर गाठले होते. बुधवारी रात्री 12.8 वाजता भारतात सुपरमूनच्या सर्वात मोठ्या आकाराची नोंद करण्यात आली.

चंद्राचा आकार रोजच्यापेक्षा  7 टक्के मोठा होता

बुधवारी रात्री जगभरात चंद्राची चमक रोजच्यापेक्षा अधिक होती. ज्याचं कारण होतं चंद्राचं पृथ्वीच्या सर्वात जवळ येणं. त्यामुळे बुधवारी सुपरमूनचा आकार सामान्य दिवसांच्या तुलनेत 7 टक्के अधिक होता. वास्तविक चंद्रापासून पृथ्वीचे अंतर सुमारे तीन लाख 84 हजार किलोमीटर आहे, परंतु सुपरमूनच्या वेळी चंद्र पृथ्वीपासून केवळ तीन लाख 57 हजार किलोमीटर दूर होता. त्यामुळे चंद्राचा प्रकाश पृथ्वीवर रोजच्यापेक्षा अधिक अनुभवायला मिळाला.

शुक्रवारपर्यंत दिसणार सुपरमून आहे

या अद्भूत खगोलीय घटनेनंतर म्हणजेच बुधवारी झालेल्या सुपरमूननंतर जगभरातील लोकांना पुढील तीन दिवस चंद्राचा मोठा आकार पाहता येणार आहे. नासाच्या अंतराळ संस्थेनुसार, शुक्रवारी सकाळपर्यंत चंद्राची चमक कायम राहील असे सांगितले. मात्र, ती पौर्णिमा असणार नाही, परंतु चंद्र आणि पृथ्वी यांच्यातील कमी अंतरामुळे पौर्णिमेची स्थिती अनुभवता येईल.

बक मून असे नाव या सुपरमूनला  देण्यात आले

बुधवारी मध्यरात्री दिसलेल्या पौर्णिमेच्या चंद्राला  बक मून असे नाव देण्यात आले.बक मून हे नाव देण्यामागे विशेष कारण आहे. चंद्रावर असणाऱ्या खाड्यांमुळे त्यावर हरिणाच्या शिंगांचा आकार दिसतो. हा आकार काल रोजच्यापेक्षा जास्त होता म्हणून सुपरमूनला बक मून असे नाव देण्यात आले आहे. हरीण जसजसा मोठा होतो तसतशी त्याची शिंगही मोठी होतात. ज्याच्या आधारावर या पौर्णिमेला बक मून म्हटले गेले आहे. या आधी झालेल्या पौर्णिमेला म्हणजेच सुपरमूनला स्ट्रॉबेरी मून असे नाव देण्यात आले होते. याचे कारण म्हणजे स्ट्रॉबेरी पिकाची ती वेळ होती. ज्याच्या आधारावर पौर्णिमेला बक मून असे नाव देण्यात आले.

त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान
त्यांच्यासोबत जाणं परवडणारं नाही! मलिकांबाबत शिरसाट यांचं मोठं विधान.
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या...
सुप्रिया सुळेंकडून मुख्यमंत्र्यांचे तोंडभरून कौतुक! म्हणाल्या....
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप
नाना पटोलेंचा भाजपवर सत्तेतून आमदार विकत घेतल्याचा आरोप.
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश
हिंगोलीत कॉंग्रेसला खिंडार! प्रज्ञा सातव यांचा भाजपात प्रवेश.
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!
नागपूर सत्र न्यायालयाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी!.
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा
ठाकरे बंधू भाजपचा पराभव करणार! संजय राऊतांचा मोठा दावा.
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप
दोन मंत्री गेले, हा काळिमा! राऊतांचा सरकारवर गंभीर आरोप.
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले
त्यांना पुन्हा मंत्री करणं सोपं नाही! संजय राऊतांनी स्पष्टच सांगितले.
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!
दादांची राष्ट्रवादी, शरद पवारांसोबत लढण्यास इच्छुक!.
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!
नागपूर मनपा निवडणुकीत भाजप-राष्ट्रवादीत चढाओढ!.