Guru Teg Bahadur Quote : गुरू तेग बहादुर यांचे अनमोल विचार, जीवनात कधीच येणार नाही नैराश्य
Guru Teg Bahadur Quotes गुरू तेग बहादुर यांच्या शौर्याबद्दल असे म्हटले जाते की, एकदा ते कर्तारपूरच्या युद्धानंतर वडील गुरु हरगोविंद साहिब यांच्यासोबत किरतपूरला जात होते. त्यावेळी ते फक्त 13 वर्षांचे होते. मुघल सैन्याच्या एका गटाने त्यांचा पाठलाग केला आणि फगवाडाजवळील पलाही गावात त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या युद्धात त्यांचे वडील गुरु हरगोविंद साहिब यांच्यासोबत गुरु तेग यांनीही मुघलांशी युद्ध केले.
मुंबई : भारताच्या गौरवशाली इतिहासात असे अनेक क्रांतिकारक जन्माला आले, ज्यांनी आपल्या धर्म, संस्कृती, आदर्श आणि मूल्यांच्या रक्षणासाठी आपल्या प्राणांची आहुती दिली. या महापुरुषांपैकी 9 वे शीख श्री गुरु तेग बहादुर (Guru Teg Bahadur) सिंग यांचे नाव देखील आहे. गुरु तेग बहादुर यांना ‘हिंदची चादर’ असेही म्हणतात. धर्म वाचवण्यासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. आज त्यांची पुण्यतिथी आहे. गुरु तेग बहादुर यांचा जन्म अमृतसर येथे 21 एप्रिल 1621 रोजी माता नानकी आणि शिखांचे सहावे गुरू गुरु हरगोविंद यांच्या पोटी झाला. गुरु तेग बहादूर यांचे बालपणातील नाव त्यागमल होते. गुरु तेग बहादुर हे गुरु हरगोविंद साहिब यांचे धाकटे पुत्र होते. त्यांनी आपले प्राथमिक शिक्षण आपल्या भावांकडून घेतले.
त्यागमल ते तेग बहादुर बनण्याची कहाणी
गुरू तेग बहादुर यांच्या शौर्याबद्दल असे म्हटले जाते की, एकदा ते कर्तारपूरच्या युद्धानंतर वडील गुरु हरगोविंद साहिब यांच्यासोबत किरतपूरला जात होते. त्यावेळी ते फक्त 13 वर्षांचे होते. मुघल सैन्याच्या एका गटाने त्यांचा पाठलाग केला आणि फगवाडाजवळील पलाही गावात त्यांच्यावर अचानक हल्ला केला. या युद्धात त्यांचे वडील गुरु हरगोविंद साहिब यांच्यासोबत गुरु तेग यांनीही मुघलांशी युद्ध केले. लहान वयातच तेगचे धाडस आणि जिद्द यामुळे तेग बहादुर बनले.
गुरू तेग बहादूर यांचे अनमोल विचार
नकळत कोणाच्याही भावना न दुखावणारा हा सज्जन माणूस असतो.
चुकांची कबुली देण्याची हिंमत असेल तर त्याला माफ केल्या जाऊ शकते.
अध्यात्मिक मार्गावरील दोन सर्वात कठीण परीक्षा म्हणजे योग्य क्षणाची वाट पाहण्याचा संयम आणि जे दिसते त्याद्वारे निराश न होण्याचे धैर्य.
यश कधीच अंतिम नसते, अपयश कधीच घातक नसते, महत्त्वाचे असते ते धैर्य.
जो आपल्या अहंकारावर विजय मिळवतो आणि भगवंतालाच सर्व गोष्टींचे प्रवेशद्वार मानतो. त्याला खऱ्या अर्थाने जीवन मुक्ती प्राप्त झाली आहे असे समजावे.
प्रत्येक जीवाशी दयाळूपणे वागा, द्वेष विनाशाकडे नेतो.
पराभव आणि विजय हे तुमच्या विचारावर अवलंबून आहे, तुम्ही ते स्वीकारले तर तो पराभव आहे आणि जर तुम्ही दृढनिश्चय केलात तर तो विजय आहे.
भीती इतर कोठेही नाही, फक्त तुमच्या मनात आहे.
धाडस म्हणजे भीती नसणे नव्हे, तर भीतीपेक्षा काहीतरी महत्त्वाचाचा निर्णय घेणे आहे .
गुरु तेग बहादुर यांच्या मते, छोट्या कामातच मोठ्या कामाचे यश लपलेले असते.