Gurupushamrut Yog 2022: गुरुपुष्यामृत योग आणि त्याचे महत्व

गुरुपुष्यामृत योग (Gurupushamrut Yog 2022) म्हणजेच गुरुवार दिनी पुष्यनक्षत्र येणे म्हणजेच गुरुवार आणि पुष्यनक्षत्र यांचा योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग (Shubha yog) म्हणून ओळखला जातो. पुष्यामृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग आहे. म्हणूनच आपण याला अमृतयोग असेही संबोधतो. पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण शुभ समय असतो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी […]

Gurupushamrut Yog 2022: गुरुपुष्यामृत योग आणि त्याचे महत्व
Follow us
| Updated on: Jun 25, 2022 | 5:24 PM

गुरुपुष्यामृत योग (Gurupushamrut Yog 2022) म्हणजेच गुरुवार दिनी पुष्यनक्षत्र येणे म्हणजेच गुरुवार आणि पुष्यनक्षत्र यांचा योग. आपल्या भारतीय संस्कृतीप्रमाणे हा योग सर्वात शुभ योग (Shubha yog) म्हणून ओळखला जातो. पुष्यामृत गुरुवारी येणे हा दुर्मिळ योग आहे. म्हणूनच आपण याला अमृतयोग असेही संबोधतो. पुष्य नक्षत्रात प्रत्येक क्षण शुभ समय असतो. गुरुपुष्यामृत हा योग पुष्य नक्षत्रासहित गुरुवारी येतो. असा हा शुभ योग 2022 या वर्षी तिनदा आलेला आहे. तर येत्या 30 जून ला हा योग आहे. कुठल्याही शुभ कार्यासाठी हा योग खूप महत्वाचा आणि पवित्र मानला जातो. या मुहूर्ताला आपण सर्व शुभकार्याला सुरुवात शुभारंभ करत असतो जसे की गृहप्रवेश, सोने व चांदी ह्या धातूंची खरेदी, मालमत्ता आणि इतर गुंतवणूक खरेदी, नवीन व्यवसाय सुरू करणे इत्यादि. सर्वात महत्वाचे म्हणजे ह्या योगावर केलेली गुरुसेवा, गुरुभक्तीचे फळ अमाप असते म्हणूनच या दिवशी गुरुमंत्र, गुरूचे नामस्मरण व पारायण केल्यास ते भक्तांना अत्यंत लाभदाई ठरते.

अशुभतेपासून वाचण्यासाठी गुरुपुष्यामृत योग श्रेष्ठ आहे, असे मानले जाते. गुरुवारी पुष्य नक्षत्र आले, तर त्या दिवशी ‘गुरुपुष्यामृत’ योग होतो. हा योग सर्व कार्यासाठी शुभ समजला जातो. या योगावर सोने खरेदी केले असता त्याची वृद्धी होते, अशी मान्यता आहे. त्यामुळे या योगानिमित्त सोने खरेदीसाठी ग्राहक मोठ्या प्रमाणावर गर्दी करतात. आपल्या जीवनात यशाच्या प्राप्तीसाठी या योगदिनी कोणत्याही नवीन कार्याचा आरंभ केला जातो. नव्या व्यापाराची सुरुवात करणे, नवे काम हाती घेणे, बंद पडलेले काम सुरू करणे, असे केल्यास मोठे यश प्राप्त होते, असे सांगितले जाते. अन्य कोणत्याही कामांसाठी हा योग शुभ असला, तरी या दिवशी विवाह करत नाहीत. कारण पुष्य नक्षत्र विवाहास वर्ज्य मानले आहे. गुरुपुष्यामृत योग वारंवार येत नाही.

ज्या गुरुवारी पुष्य नक्षत्र येते, त्या दिवशी गुरुपुष्यामृत योग असतो. गुरुवारी धार्मिक कार्ये करणे उत्तम मानले गेले आहे. पुष्य नक्षत्र सर्व प्रकारांच्या कार्यांसाठी अत्यंत शुभ मानले गेले आहे. गुरुपुष्य योगदिनी गुरुमंत्र घेणे उत्तम असते. गुंतवणुकीसाठी हा योग फायदेशीर मानला गेला आहे. या दिवशी लक्ष्मी देवीची पूजा केली जाते. या दिवशी केलेले लक्ष्मी पूजन अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. या गुरुपुष्यामृत योगाचे फार महत्त्व आहे. या दिवशी हाती घेतलेल्या कामांमध्ये यश मिळवायचे असल्यास आपल्या कुलदेवतेची मनोभावे पूजा करणे शुभ फलदायक असते, असे सांगितले जाते. गुरुपुष्यामृत योग पूजा, मंत्र-तंत्र, संकल्प, साधना, जप करण्यासाठी उत्तम आहे.

हे सुद्धा वाचा

पुष्यनक्षत्राचे महत्त्व

पुष्यचा अर्थ आहे पोषण करणारा, शक्ती देणारा, ऊर्जा देणारा. पुष्याचे आधीचे नाव तिष्य असे. त्याचा अर्थ शुभ, सुंदर, सुख संपदा देणारा असा आहे. जाणकारांच्या मते, पुष्य नक्षत्र अतिशय शुभ आणि कल्याणकारी आहे. ऋग्वेदात पुष्याला तिष्य म्हणजे मंगलदायी किंवा मांगलिक तारा, असेही म्हणतात. पुष्य नक्षत्राचा स्वामी ग्रह शनी आहे.

लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?
सैफवर चाकूने 6 वार पण 12 व्या मजल्यावरच्या घरात चोराची एन्ट्री कशी?.
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्...
कराडला कोठडी अन् वकिलांमध्येच जुंपली, कोर्टाबाहेर एकच गदारोळ अन्....
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?
वाल्मिक कराडच्या समर्थकांच्या आलं अंगात, महिलांमध्ये घुमतंय कोण?.
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.