Dip Amavasya: एकाच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग आणि दीप अमावस्या, त्यानंतर सुरु होतोय मराठी लोकांचा श्रावण महिना

चातुर्मासातील पहिली आणि आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला दीप अमावस्या (Dip Amavasya) म्हणतात.  श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्य येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी […]

Dip Amavasya: एकाच दिवशी आहे गुरुपुष्यामृत योग आणि दीप अमावस्या, त्यानंतर सुरु होतोय मराठी लोकांचा श्रावण महिना
Follow us
| Updated on: Jul 23, 2022 | 4:47 PM

चातुर्मासातील पहिली आणि आषाढ महिन्याच्या शेवटी येणाऱ्या अमावास्येला दीप अमावस्या (Dip Amavasya) म्हणतात.  श्रावण महिना सुरु होण्याच्या आदल्या दिवशी ही अमावास्य येत असल्याने सर्व देवांची दिवे लावून पूजा केली जाते. भगवान शंकर, पार्वती, गणपती आणि कार्तिकेय यांची दीप अमावस्येदिवशी पूजा केली जाते. या दिवशी पूर्वजांचे स्मरण केले जाते आणि दिवा लावला जातो. दीप अमावस्येच्या दिवशी पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचेही विशेष महत्त्व आहे. योगायोगाने दीप अमावास्या आणि गुरुपुष्यामृतयोग एकाच दिवशी आले आहेत. त्यामुळे या दिवसाचं महत्त्व आणखी वाढलं आहे. पंचांगानुसार, या वर्षी अमावस्या तिथी शनिवार, 27 जुलैपासून रात्री 9 वाजून 11 मिनिटांनी सुरू होईल. जी 28 जुलै रोजी रात्री 11 वाजून 24 मिनिटापर्यंत राहील. तर गुरुपुष्यामृतयोग 28 जुलै रोजी सकाळी 7 वाजून 4 मिनिटांनी सुरु होईल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 6 वाजून 16 मिनिटांपर्यंत असेल.

दीप अमावस्या महत्त्व

भाद्रपद महिन्याच्या कृष्ण पक्षात पितरांचं स्मरण करून पिंडदान केलं जातं. मात्र आषाढ महिन्यातील अमावस्येला काही ठिकाणी पितृ तर्पण दिलं जातं. पितरांना तर्पण देऊन पुरणाचा नैवेद्य दाखवतात. पितरांच्या स्मरणार्थ दीप प्रज्ज्वलित करतात. अमावस्येला हा विधी केल्याने पितरांन मुक्ती मिळते आणि ते पुढील पिढीला आशीर्वाद देतात, असं मानलं जातं.

गुरुपुष्यामृत योग

ज्योतिषशास्त्रात 27 नक्षत्रांचा उल्लेख असून पुष्य नक्षत्राचे खास महत्त्व आहे. जेव्हा हे नक्षत्र गुरुवारी येते तेव्हा त्याला गुरुपुष्यामृत योग म्हटलं जातं. हा सर्वात दुर्मिळ आणि सर्वोत्कृष्ट योग मानला जातो. गुरुवारी भगवान विष्णूंसोबत बृहस्पती देवाची पूजा केली जाते. या नक्षत्राचे स्वामी शनिदेव आहेत. म्हणून शनिदेव आणि बृहस्पती या दोघांचा गुरुपुष्य योगावर प्रभाव आहे.

हे सुद्धा वाचा
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.