Hanuman Jayanti 2025: हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार करा ‘हे’ उपाय, तुमचं नशिब चमकेल
hanuman jayanti upay: देशभरात हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. या दिवशी, मंदिरांमध्ये योग्य विधींसह भगवान राम, माता सीता आणि बजरंगबली यांची पूजा केली जाते. तसेच, या दिवशी रामचरितमानसाचे पठण करणे देखील शुभ मानले जाते. ज्योतिषशास्त्रानुसार, हनुमान जयंतीच्या दिवशी राशीनुसार काही उपाय केल्यास व्यक्तीला सौभाग्य मिळू शकते.

अनेकदा तुमच्या जीवनामध्ये अनेक अडथळे येतात. जीवनातील अजथळे दूर करण्यासाठी हनुमानाची आणि शनिची पूजा करण्यास सांगितले जाते. यंदा 2025 मध्ये हनुमान जयंती 12 एप्रिल म्हणजेच शनिवारी येत आहे. शनिवार हा दिवस हनुमानाला समर्पित आहे. या दिवशी हनुमानाची पूजा केल्यामुळे तुमच्या जीवनातील सर्व समस्या दूर होण्यास मदत होते. यासोबतच, यदाच्या हनुमान जयंतीला इतर अनेक अतिशय शुभ योगायोग घडत आहेत. जसे पंचग्रही योग 57 वर्षांनी तयार होत आहे. यावेळी हस्त नक्षत्रात मीन राशीत पंचग्रही योग तयार होत आहे. 57 वर्षांनंतर, हनुमान जयंतीला, मीन राशीत 5 ग्रह एकत्र असतील.
हनुमान जयंतीच्या दिवशी बुध, शुक्र, शनि, राहू आणि सूर्य मीन राशीत असतील आणि चंद्र आणि केतू कन्या राशीत असतील. असाच एक योगायोग 1968 मध्ये घडला होता. यासोबतच मीन राशीमध्ये बुधादित्य, शक्रादित्य, लक्ष्मी नारायण आणि मालव्य राजयोग यांचा दुर्मिळ संयोग तयार होत आहे. पंचांगानुसार रवी, जय, हस्त आणि चित्रा नक्षत्रात हनुमान जयंती साजरी होईल. अशा परिस्थितीत, राशीनुसार उपाय करून, प्रत्येकाच्या बंद नशिबाचे कुलूप उघडता येतात, कसे ते जाणून घ्या.
वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांसाठी उपाय – वृषभ आणि तूळ राशीच्या लोकांनी मंदिरात जाऊन सुंदरकांडाचे पठण करावे आणि माकडांना मिठाई खाऊ घालावी. असे केल्याने त्यांचा शुक्र ग्रह बलवान होईल.
मेष आणि वृश्चिक राशीच्या लोकांसाठी उपाय – हनुमान आणि वृश्चिक राशीच्या लोकांनी हनुमान अष्टकचे पठण करावे. त्यांनी हनुमान मंदिरात जाऊन बुंदीचा प्रसाद वाटावा. यामुळे त्यांचा अधिपती ग्रह मंगळ बळकट होईल.
मिथुन आणि कन्या राशीच्या लोकांसाठी उपाय – या दोन्ही राशीच्या लोकांनी हनुमान जयंतीला अरण्य कांडाचे पठण करावे आणि बजरंगबलीला लवंगासह तुपाचा दिवा आणि पान अर्पण करावे. यामुळे त्यांचा बुध ग्रह बलवान होईल.
कर्क राशीच्या लोकांसाठी उपाय – कर्क राशीचा स्वामी चंद्र आहे, म्हणून या राशीच्या लोकांनी भगवान हनुमानाला चांदीची गदा अर्पण करावी आणि ती त्यांच्या गळ्यात घालावी. हनुमान चालीसा पाठ करा. यामुळे त्यांचा चंद्र अधिक मजबूत होईल.
सिंह राशीच्या लोकांसाठी उपाय – सिंह राशीच्या लोकांनी मंदिरात जाऊन गोड पदार्थांचे दान करावे. त्यांनी तिथे बसून बालकांड पठण करावे. असे केल्याने, त्यांच्या ग्रहाचा स्वामी सूर्य देखील प्रसन्न होईल.
धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी उपाय – धनु आणि मीन राशीच्या लोकांसाठी गुरु ग्रह धनु आणि मीन राशीचा स्वामी आहे. त्यांना शक्ती देण्यासाठी, अयोध्या कांडाचे पठण करा. आणि हनुमानजींना पिवळी फुले, फळे आणि पिवळी मिठाई अर्पण करा.
मकर आणि कुंभ राशीच्या लोकांसाठी उपाय – मकर आणि कुंभ राशीच्या लोकांनी रामचरितमानसाचे पठण करावे. बजरंग बलीला एका भांड्यात काळी उडदाची डाळ अर्पण करा आणि नंतर त्यात पाणी घाला. असे केल्याने शनि तुम्हाला आशीर्वाद देईल.
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही.