Hanuman Ji Puja Tips | हनुमानजींची पूजा करताना नेहमी दिशांचे नियम पाळा, जाणून घ्या कुठल्या दिशेने कुठले चित्र लावावे
मंगळवारचा दिवस हा पवनपुत्र श्री हनुमानजींच्या पूजेचा सर्वात पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान हनुमानाची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताला आनंदी जीवनाचा आशीर्वाद देतात. हनुमान जी संकटमोचन आहेत, संकटाच्या वेळी त्यांचे स्मरण केल्याने ते सर्व समस्या सोडवतात.
मुंबई : मंगळवारचा दिवस हा पवनपुत्र श्री हनुमानजींच्या पूजेचा सर्वात पवित्र दिवस आहे. या दिवशी भगवान हनुमानाची पूजा केल्याने ते लवकर प्रसन्न होतात आणि भक्ताला आनंदी जीवनाचा आशीर्वाद देतात. हनुमान जी संकटमोचन आहेत, संकटाच्या वेळी त्यांचे स्मरण केल्याने ते सर्व समस्या सोडवतात. या मंगळवारी हनुमान, अंजनीसुत, वायुपुत्र, महाबली, रमेष्ट, फाल्गुनसखा, पिंगाक्ष, अमितविक्रम, उद्धिक्रमण, सीताशोकविनाशन, लक्ष्मणप्राणदाता आणि दशग्रीवदर्पहाच्या 12 नामांचा फक्त जप केल्याने सर्व दुःखांपासून मुक्ती मिळते.
गोस्वामी तुलसीदासांनी असेही म्हटले जाते की, ‘कलियुग केवल नाम अधारा. सुमिरि सुमिरि नर उतरहिं पारा.’ याचा अर्थ असा की तुम्ही कोणत्याही पद्धतीने, देश, काळ, परिस्थितीत करु शकता. श्री हनुमानजींच्या नावाचा जप केल्याने तुमच्या आयुष्यात सर्व शुभ होते. हनुमानजींचे कोणते चित्र कोणत्या दिशेला लावावे, त्याने कोणते फळ मिळते हे जाणून घेऊया –
दक्षिण दिशेला लावा असे चित्र
वास्तुनुसार, हनुमानजींची पूजा करण्यासाठी त्यांचे चित्र दक्षिण दिशेला लावणे अत्यंत शुभ मानले जाते. कारण, बजरंगबलीने या दिशेने आपला सर्वाधिक प्रभाव दाखवला आहे. हनुमानजींचे चित्र येथे लावल्यावर दक्षिण दिशेने येणारी प्रत्येक वाईट शक्ती बजरंग बलीचे चित्र पाहून परत जाते आणि यामुळे घरात सुख आणि शांती राहते.
बजरंगीचा फोटो चुकूनही येथे लावू नका
हनुमानजी हे बाल ब्रह्मचारी असल्याने बजरंगबलींचे चित्र कधीही बेडरुममध्ये ठेवू नये. बेडरुममध्ये हनुमानजींऐवजी तुम्ही राधा-कृष्णाचे चित्र लावू शकता.
भीती दूर करण्यासाठी असे चित्र लावा
जर तुम्हाला बऱ्याचदा भूत, प्रेत किंवा अशाप्रकारच्या अडथळ्यांची भीती वाटत असेल तर तुम्ही पंचमुखी हनुमानजी किंवा पहाड हातात उचललेले हनुमानजी यांचा फोटो तुमच्या घरात लावावा. वास्तुनुसार, ज्या घरात पंचमुखी हनुमानजींची मूर्ती किंवा फोटो असेल, तिथे प्रगतीच्या मार्गातील अडथळे दूर होतात आणि सुख-समृद्धी प्राप्त होते.
तेव्हा हनुमानजींचे उडतानाचे चित्र लावावे
श्री हनुमानजींचे असे चित्र लावल्याने तुमची प्रगती जलद होते. हनुमानाच्या कृपेने तुमच्यामध्ये उत्साह आणि धैर्य निर्माण होते आणि तुम्ही दिवसेंदिवस यशाच्या मार्गावर पुढे जाता.
5 श्रावणी सोमवार, महाराष्ट्रातील 5 ज्योतिर्लिंग : ज्योतिर्लिंग परळी वैद्यनाथ, जाणून घ्या या जागृत देवस्थानाची माहितीhttps://t.co/wKAX7aXuEB#ShravanSomvar2021 #Jyotirlinga #LordShiva #ParliVaijnath
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 9, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Shravan 2021 : श्रावण महिन्यात भगवान शंकराची फोटो लावताना ‘हे’ नियम पाळा
भगवान शिवशंकरांनी आपल्या गळ्यात नाग का धारण केला? जाणून घ्या यामागील कारण