Happy Bhai Dooj 2023 : भाऊबीज निमित्त पाठवा बेस्ट एसएमएस, शायरी आणि व्हॉट्सअप स्टेट्स
देशभरात दिवाळीचा जल्लोष सुरू आहे. फटाके फोडून लोक दिवाळीचा आनंद साजरा करत आहेत. अनेक जण तर दिवाळीच्या फराळावर ताव मारत गाण्यांच्या भेंड्यांचा आनंद लुटत आहे. अनेक कुटुंबात हे चित्र दिसत आहे. माहेरवाशीण मुली घरी आल्याने घरच्यांच्या आनंदाचा पारावार राहिलेला नाही. त्यामुळे सर्वांनीच भाऊबीज सणही दणक्यात साजरा करण्याची तयारी सुरू केली आहे.

मुंबई | 13 नोव्हेंबर 2023 : भाऊबीज हा बहीण आणि भावाच्या नात्याचा सण आहे. रक्षाबंधन सारखाच हा सण आहे. प्रत्येक दिवाळीत हा सण येत असतो. यावेळी बहीण आणि भाऊ एकमेकांच्या दीर्घायुष्याची कामना करत असतात. भावासाठी बहीण पूजा करत असते. पूजेनंतर बहीण भावाला ओवाळत असते. यावेळी भावाकडून बहिणीला भेटवस्तू दिल्या जातात. सर्वजण एकमेकांना शुभेच्छा देत असतात. तुम्हालाही तुमच्या बहिणी किंवा भावाला भाऊबीजेच्या दिवशी खास शुभेच्छा पाठवायच्या असतील तर खालील संदेश नक्कीच वाचा. तुम्हाला हे संदेश आवडतील. एवढेच नव्हे तर तुम्ही हे संदेश व्हॉट्सअपवर स्टेट्स म्हणूनही ठेवू शकता.
शुभेच्छा संदेश…
1.
भाऊबीजेचा हा सण आणतो गोडवा,
असाच राहू दे आपल्या नात्यात गोडवा,
भाऊबीजेच्या असंख्य शुभेच्छा…
2.
नाते बहीण भावाचे,
प्रेम आणि विश्वासाचे
बंध हे आपुलकीचे, आपुलकीने जपण्याचे…
हॅपी भाऊबीज !!
3.
रक्षणाचे वचन, प्रेमाचे बंधन, घेऊ आला हा सण,
लाख लाख शुभेच्छा तुम्हाला,
आज आहे बहीण भावाचा पवित्र सण !!
4.
जपावे या बंधनास निरामय भावनेने,
जसे जपले हळूवार मुक्ताई-ज्ञानेश्वराने !!
5.
कोणत्याच नात्यात नसेल,
अशी ही ओढ आहे,
म्हणूनच बहीण-भावाचं हे नातं,
खूप खूप गोड आहे !!
6.
सण प्रेमाचा, सण मायेचा,
सण बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा
भाऊबीजेच्या अनंत शुभेच्छा !!
7.
हा आनंदाचा उत्सव
हा निखळ मैत्रीचा उत्सव
हा पवित्र नात्याचा उत्सव
हा बहीण-भावाचा उत्सव !!
8.
तूच ताई, तूच आई,
तूच दायी, तूच माई
तुझ्यासारखी कोणीच नाही,
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा !!
9.
माझ्या दादाला लाभू दे
उदंड आयुष्य,
आई जगंदबे मागणे हेच माझं !!
10.
कधी निरागस, कधी भाबडी.
खूप चंचल, खूप आनंदी,
खूप नाजूक माझी बहीण !!
11.
सोनियाच्या ताटी उजळल्या ज्योती,
ओवाळीते भाऊराया रे,
वेड्या बहिणीची रे वेडी माया !!
12.
दिव्यांचा लखलखाट घरी आला
आज माझा भाऊराया आला
भाऊबीजेच्या मनापासून शुभेच्छा !!
13.
आईसारखी काळजी घेतेस
बाबांसारखी धाक दाखवतेस,
सतत माझी पाठराखण करतेस,
ताई तुला खूप खूप शुभेच्छा !!