Hawan Benefits : राहत्या घरात का करावे हवन? अनेकाना नाही माहिती हे आश्चर्यकारक फायदे
Hawan Benefits प्राचीन काळी हवनाद्वारे देवाला प्रसन्न केले जात होते, ज्याला यज्ञ ही संज्ञा दिली जात होती. वेदांमध्ये याला अग्निहोत्र मानले जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी हवन करावे असे सांगितले आहे.
मुंबई : सनातन धर्मात हवनाचे आणि यज्ञाचे विशेष महत्त्व (Hawan Benefits) सांगण्यात आले आहे कारण हा पर्यावरणाच्या शुद्धीकरणासाठी एक महत्त्वाचा विधी आहे. प्राचीन काळी हवनाद्वारे देवाला प्रसन्न केले जात होते, ज्याला यज्ञ ही संज्ञा दिली जात होती. वेदांमध्ये याला अग्निहोत्र मानले जाते आणि कोणत्याही शुभ कार्यापूर्वी हवन करावे असे सांगितले आहे. आपल्या धर्मग्रंथात सांगितलेल्या 16 संस्कारांपैकी एकही संस्कार हवन क्रियेशिवाय पूर्ण मानला जात नाही. यागोष्टीचे वर्णन वेदांमध्ये अशा प्रकारे केले आहे की, माणसाला जगण्यासाठी जशी पाण्याची गरज आहे, त्याचप्रमाणे अग्निहोत्राचीही गरज आहे.
म्हणूनच जुन्या काळी दोन वेळा अग्निहोत्र हा त्यांच्या दैनंदिन व्यवहाराचा अविभाज्य भाग होता. अग्निहोत्राचे वर्णन आहे की, कोणत्याही पदार्थाला अग्नी दिल्यास त्याची व्याप्ती जसजशी वाढत जाते, तसतसे त्यात असलेले गुण वाढत जातात.
हवन आणि यज्ञ यात फरक
हवन आणि यज्ञ यात फरक एवढाच आहे की हवन हा लहान प्रमाणात केला जातो, तो कोणत्याही पूजेनंतर किंवा जपानंतर अग्नीला अर्पण केला जातो. तर यज्ञ मोठ्या प्रमाणावर देवतेला प्रसन्न करण्याच्या उद्देशाने केला जातो.
हवनासाठी कोणते साहित्य लागतात?
हवनकुंड, गंगाजल, कापूस, कापूर, तेल, धूप, दर्भ, दुर्वा, सुपारी, तीळ, जव, तांदूळ, साखर, फळ, पंचामृत, आंब्याचे लाकूड, शेंदूर, मोळी, हळद, कुंकू, वेलची, केशर, फळ, नैवेद्य. लवंगा, चंदन, तुळशी, फुलांच्या माळा, नवग्रह समिधा इत्यादी बाकीच्या वस्तूही ज्या देवता किंवा देवतेसाठी हवन केले जात आहेत त्यावर अवलंबून असतात.
हवनाचा लाभ
1. घरात असलेले सर्व जंतू आणि बॅक्टेरिया नष्ट होऊन घर शुद्ध होते. 2. हवन केल्याने शरीरातील सर्व रोग नष्ट होतात. 3. वातावरणातील ऑक्सिजनचे प्रमाण वाढते. 4. आत्म्याच्या शुद्धीसाठी हवन खूप फायदेशीर आहे. 5. मन आणि मेंदूमध्ये सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. 6. वायू प्रदूषणापासून मुक्ती मिळवण्यासाठीही हवन फायदेशीर आहे. 7. वाईटापासून बचाव करण्यासाठी आणि इच्छित परिणाम प्राप्त करण्यासाठी हे शुभ आहे.
हवनाचे प्रकार
हिंदू परंपरेत हवन किंवा यज्ञाचे पाच प्रकार सांगितले आहेत.
1. ब्रह्म यज्ञ 2. देव यज्ञ 3. पितृ यज्ञ 4. विश्व यज्ञ 5. अतिथी यज्ञ
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे.याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)