देवासमोर दिवा का लावला जातो? जाणून घ्या यामागील कारण आणि फायदे
लहानपणापासून आपण सर्वजण आपल्या आईला पूजा करताना, दिवा लावताना पाहिले असेलच. घराच्या वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घरात दररोज दिवा लावावा. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी राहते. पण तुम्हाला माहिती आहे का दिवा का लावला जातो? त्याचे फायदे काय आहेत (Hindu Mythology Why Should We Light Deepak During Puja Know The Reason).
मुंबई : हिंदू धर्मात पूजा किंवा कोणतेही शुभ कार्य करण्यापूर्वी दीप प्रज्वलित केला (Hindu MythologyHindu MythologyHindu MythologyHindu Mythology) जातो. लहानपणापासून आपण सर्वजण आपल्या आईला पूजा करताना, दिवा लावताना पाहिले असेलच. घराच्या वडीलधाऱ्यांच्या म्हणण्यानुसार घरात दररोज दिवा लावावा. यामुळे घरात आनंद आणि समृद्धी राहते. पण तुम्हाला माहिती आहे का दिवा का लावला जातो? त्याचे फायदे काय आहेत (Hindu Mythology Why Should We Light Deepak During Puja Know The Reason).
मान्यता आहे की, अग्निदेव यांना साक्षीदार मानून जी कामं केली जातात तर ती यशस्वी होतात. आपल्या शरीराच्या निर्मितीला मदत करणाऱ्या पाच घटकांपैकी एक अग्नि देखील आहे. याशिवाय अग्नि हा भगवान सूर्याचा रुप आहे. दिवा ज्ञानाचे प्रतीक मानला जातो. मान्यता आहे की देवासमोर दिवा लावल्याने सकारात्मक ऊर्जा विकसित होते. काही लोकांच्या मते मंदिरात दिवा लावल्याने देव आपल्या मनाला प्रकाशाकडे नेते.
ज्योतिषशास्त्रानुसार घरातील सदस्यांना भीती आणि शत्रूंपासून वाचवण्यासाठी दर सोमवारी आणि शनिवारी दिवा लावावा. याशिवाय, घरात भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावावा.
शनि ग्रह दोषांपासून मुक्तता मिळते –
कुंडलीतील राहू-केतुचे दोष दूर करण्यासाठी घराच्या मंदिरात अलसीच्या तेलाचा दिवा लावावा. याशिवाय शनिवारी मोहरीच्या तेलाचा दिवा लावल्यास शनि ग्रहापासून मुक्तता मिळते.
आर्थिक समस्या दूर होते –
जर आपण आर्थिक अडचणीत असाल तर देवी लक्ष्मीसमोर सात दिवे लावा. यामुळे आपले सर्व त्रास दूर होईल. ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक समस्येवर मात करण्यासाठी हा उपाय केला जाऊ शकतो. देवी सरस्वतीला प्रसन्न करण्यासाठी तुम्ही दोन दिवे लावावेत. उत्पन्न वाढवण्यासाठी बुधवारी गणेशासमोर तीनमुखी तुपाचा दिवा लावा.
आनंद आणि समृद्धीसाठी –
गुरुवारी भगवान विष्णूसमोर तुपाचा दिवा लावल्याने कुटुंबात आनंद आणि समृद्धी येते.
Swapna Shastra : तुमचं संपूर्ण आयुष्य बदलू शकतात ही 2 स्वप्नं, यांच्याकडे दुर्लक्ष करु नकाhttps://t.co/SBHFTIeR1V#SwapnaShastra #Dreams #LuckyDreams
— TV9 Marathi (@TV9Marathi) June 17, 2021
Hindu Mythology Why Should We Light Deepak During Puja Know The Reason
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
एक असं महायज्ञ, ज्यामुळे सापांचं अस्तित्व धोक्यात आलं होतं…
Dhumavati Jayanti 2021 | देवी धुमावतीची विधवा स्वरुपात पूजा का केली जाते? जाणून घ्या…