Holashtak 2021 : ‘होलाष्टक’ला आजपासून सुरुवात, हे उपाय करा, दूर होतील सर्व संकट…

होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ हा शब्द तयार झाला आहे (Holashtak 2021 Special Upay).

Holashtak 2021 : 'होलाष्टक'ला आजपासून सुरुवात, हे उपाय करा, दूर होतील सर्व संकट...
Holashtak
Follow us
| Updated on: Mar 22, 2021 | 8:52 AM

मुंबई : होळी आणि अष्टक या दोन शब्दापासून ‘होलाष्टक’ हा शब्द तयार झाला आहे (Holashtak 2021 Special Upay). म्हणजेच होळीच्या आठ दिवस आधीच्या काळाला ‘होलाष्टक’ असे म्हणतात. या वेळी होलाष्टक 22 मार्च म्हणजेच आजपासून सुरु होईल आणि 28 मार्चपर्यंत राहील. हिंदू धर्मग्रंथांनुसार, होलाष्टक दरम्यान नवीन घरात प्रवेश, लग्न, दाढी करणे, मुंडण करणे इत्यादी शुभ क्रिया करण्यास मनाई आहे (Holashtak 2021 Special Upay To Get Rid Of All Your Problems In Life ).

होलाष्टकसंबंधीची आख्यायिका

असे म्हटले जाते की, हिरण्यकश्यपने आपल्या मुलाच्या हत्येच्या उद्देशाने त्याचा आठ दिवस अनन्वित छळ केला. परंतु, भगवान विष्णूची भक्त प्रल्हादवर इतकी कृपा होती की, प्रत्येक वेळी त्याचा या संकटातून बचाव झाला. आठव्या दिवशी प्रल्हादची आत्या होलिका ही तिच्या मांडीवर प्रल्हादला घेऊन अग्नीत बसण्याचं ठरलं.

होलिकेला अग्नी देवाने न जळण्याचा आशीर्वाद दिला होता. परंतु, भगवान विष्णूच्या कृपेने प्रल्हादचे प्राण पुन्हा वाचले आणि होलिका त्या अग्नीत जळून भस्मसात झाली. तेव्हापासून दरवर्षी होळीच्या आठ दिवस आधी होलाष्टकच्या वेळेस कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. पण होलिका दहन झाल्यावर अर्थात वाईटावर चांगल्याने विजय मिळवल्याचा आनंद साजरा केला जातो. तथापि, ही वेळ भगवान विष्णूची पूजा करण्याची खास वेळ मानली जाते (Holashtak and Holi 2021).

या दिवसांमध्ये तुम्ही तुमच्या इच्छापूर्ण करण्यासाठी होलाष्टक दरम्यान विशेष पूजा आणि काही उपाय करावे –

1. जर तुम्हाला संतानप्राप्तीची इच्छा असेल तर या दिवसांदरम्यान भगवान श्रीकृष्णांच्या लड्डू गोपाल स्वरुपाची पूजा करा. त्यांना लोणी-शर्कऱ्याचं नैवेद्य दाखवा. शिवाय, गोपाल सहस्त्रनाम किंवा संतान गोपाल मंत्राचा जप करा.

2. तुमच्या आयुष्यातील संकटे दूर होत नसतील तर तुम्ही होलाष्टक दरम्यान दान-पुण्य करा. यामुळे जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्तता मिळेल. तसेच, हनुमान आणि नरसिंहाची पूजा करावी.

3. जर तुम्ही नेहमी आजारी राहात असाल तर महामृत्युंजय मंत्राचा जप करावा. तसेच गुग्गलने घरी हवन करा. यामुळे घरातील नकारात्मकता दूर होईल आणि लवकरच आपले आरोग्य सुधारण्यास सुरवात होईल.

4. एखाद्या विशिष्ट कार्यात आपल्याला यश मिळवायचे असेल तर आदित्य हृदय स्तोत्र, सुंदरकंद किंवा बागुलमुखी मंत्राचा जप करावा.

5. जर आर्थिक संकट असेल किंवा आपण कर्जापासून मुक्त होऊ शकत नसाल तर होलाष्टक दरम्यान श्रीसुक्त आणि मंगल ऋण मोचन स्तोत्र वाचा.

6. इच्छित नोकरी, व्यवसायात यश मिळविण्यासाठी हवन करा. तुमचा व्यवसाय असल्यास हे हवन कामाच्या ठिकाणी करा. हे हवन जव, तीळ आणि साखरने करा. हवन दरम्यान हळदकुंड, पिवळी मोहरी, गूळ आणि कनेराची फुले नक्की वापरा.

7. कुटुंबात सुख-समृद्धी कायम ठेवण्यासाठी रामरक्षस्तोत्र, विष्णू सहस्त्रनाम किंवा हनुमान चालीसा नियमितपणे वाचा.

यंदाच्या होळीला तब्बल 499 वर्षानंतर दुर्मिळ योग

यावेळची होळी खूप खास असणार आहे. तब्बल 499 वर्षांनंतर होळीच्या निमित्ताने अत्यंत दुर्मिळ योग तयार होणार आहे. 29 मार्चच्या पौर्णिमेच्या दिवशी चंद्र कन्या राशीत विराजमान होईल, तर शनि ग्रह स्वतःच्या राशीमध्ये राहील. असा ग्रह योगायोग 3 मार्च 1521 रोजी झाला होता. त्याशिवाय या वेळी सर्वार्थसिद्धि योगात होळी साजरी करण्यात येणार आहे, त्याचप्रमाणे अमृतासिद्धी योगही या दिवशी येणार आहे (Holashtak 2021 Special Upay To Get Rid Of All Your Problems In Life).

हा आहे शुभ काळ

होलिका दहनचा दिवस : 28 मार्च 2021

रंगपंचमी दिवस : 29 मार्च 2021

होलिका दहनचा शुभ मुहूर्त : संध्याकाळी 6:37 वाजल्यापासून ते रात्री 8:56 वाजेपर्यंत

पौर्णिमेची तिथी प्रारंभ : 28 मार्च सकाळी 3:27 वाजता

पौर्णिमेची तिथी समाप्ती : 29 मार्च 12:17 वाजता.

Holashtak 2021 Special Upay To Get Rid Of All Your Problems In Life

संबंधित बातम्या :

Holashtak and Holi 2021 | का साजरी केली जाते होळी? जाणून घ्या होलाष्टक ते होळीपर्यंतची संपूर्ण माहिती

18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?
18 दिवसांनंतरही आरोपींना अटक नाही, पोलीस करतायत तरी काय ?.
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती
आणखी एका सरपंचावर जीवघेणा हल्ला, तुळजापुरात बीडची पुनरावृत्ती.
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल
माझा संतोष देशमुख होण्याची वाट बघताय का ? कोणी केला सवाल.
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली
अभिनेते अनुपम खेर यांची माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांना श्रद्धांजली.
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप
बीड प्रकरणात आरोपीला वाचवण्यात गृहमंत्र्यांचा हात - संजय राऊतांचा आरोप.
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा
माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, देशात 7 दिवसांचा दुखवटा.
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली
डॉ. मनमोहन सिंह यांचं निधन, शरद पवार यांनी वाहिली श्रद्धांजली.
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व
देशाच्या अर्थव्यवस्थेला बळकट करणारं नेतृत्व.
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया
महाराष्ट्रातल्या सर्व शस्र परवान्यांची चौकशी लावा - अंजली दमानिया.
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?
99 अपराध यांनी पचवले, संतोष देशमुख 100 वा होता, काय म्हणाले सुरेश धस?.