Holi 2023 : होळीच्या दिवशी हनुमानाच्या पुजेला आहे विशेष महत्व, होतील सर्व बाधा दुर
या दिवशी हनुमान चालीसाचे पठण अत्यंत फलदायी मानले जाते. तसे, आपण दररोज हनुमान चालीसाचे पठण करू शकता परंतु होळीच्या दिवशी नक्कीच करा.
मुंबई : अन्यायावर न्यायाचा विजय म्हणून साजरी होणाऱ्या होळीला धार्मिक दृष्टिकोनातून खूप महत्त्व आहे. धार्मिक मान्यतेनुसार रंगांच्या या सणात हनुमानाची पूजा (Hanuman Puja) करणे देखील शुभ मानले जाते. जर तुमच्या घरात नेहमी अशांतता असेल किंवा तुम्हाला वाटत असेल की, घरात कोणत्याही प्रकारची नकारात्मकता आहे तर या दिवशी हनुमानाची पूजा केल्याने ती दूर होते. असे मानले जाते की होळीच्या दिवशी हनुमानजीची पूजा केल्याने भक्तांचे सर्व संकट दूर होतात आणि त्यांना जीवनात यश मिळते. पंचांगानुसार, यावेळी होळी (Holi 2023) 8 मार्च रोजी साजरी केली जाईल. चला जाणून घेऊया होळी पूजेची शुभ तिथी आणि हनुमान पूजेची पद्धत.
पूजेची तारीख
पंचांग नुसार, या वर्षी फाल्गुन महिन्याची पौर्णिमा 06 मार्च 2023 रोजी दुपारी 04:17 वाजता सुरू होईल आणि 07 मार्च 2023 रोजी संध्याकाळी 06:09 वाजता समाप्त होईल. अशा परिस्थितीत होलिका दहन 07 मार्च 2023 रोजी होणार आहे. तर, 08 मार्च 2023 रोजी रंग खेळला जाईल. मात्र, या खास दिवशी अनेक ठिकाणी फुलांनी होळीही खेळली जाते.
हनुमान उपासना पद्धत
- या दिवशी सर्वप्रथम सकाळी स्नान करून मग हनुमानजींचे ध्यान करून व्रताचा संकल्प करावा.
- यानंतर, घराच्या स्वच्छ ठिकाणी एक पाट ठेवा ज्यावर पिवळे किंवा लाल कापड टाका. या पाटावर हनुमानाची मूर्ती स्थापित करा.
- यानंतर हनुमानजींच्या मूर्तीसमोर फळे, फुले आणि हार अर्पण करा.
- हनुमानाची उपासना करताना हे लक्षात ठेवा की त्यांना फक्त आपल्या अनामिकानेच टिका लावा. शेवटी हनुमानजींची आरती करावी.
हनुमान चालीसा पठण
या दिवशी हनुमान चालीसाचे पठण अत्यंत फलदायी मानले जाते. तसे, आपण दररोज हनुमान चालीसाचे पठण करू शकता परंतु होळीच्या दिवशी नक्कीच करा. यासाठी सकाळी अंघोळ केल्यावर मंदिरात आसनावर बसून हनुमान चालीसा वाचा. हे आपले मन शांत करेल आणि सर्व वाईट विचार आपल्या मनापासून दूर होतील.
सुंदर कांड पठण
सुंदरकांडचे पठण केल्यास आपला रागदेखील मात करता येतो. दिवसाच्या दोन्ही वेळी सुंदर कांडचे पठण करा आणि विधिपूर्वक पद्धतीने पूजा केल्यास तुम्हाला फायदा होईल.
हनुमाननाला लाल चोला अर्पण करा
बजरंगबलीला सिंदुरी चोला अर्पण केल्यास सहज प्रसन्न होऊ शकतात आणि त्यांची कृपा प्राप्त होऊ शकते. मंगळवारी त्यांना चोला चढवून फक्त रागावर ताबाच नाही मिळवू शकता बलकी इतर त्रासही जीवनातून दूर करता येतात.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)