Holika Dahan 2023: होळीच्या दिवशी अवश्य करा हा प्रयोग, होतील सर्व मनोकामना पुर्ण
या दिवशी सर्व समस्या दूर होतील. रोग, आजार आणि हितशत्रुंपासू सुटका मिळेल. आर्थिक विवंचनेतून सुटका मिळेल. जर तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिवशी तुम्हाला ते सहज मिळू शकते.
मुंबई : होलिका दहन (Holika Dahan Muhurta 2023) हा असा सण आहे, ज्यामध्ये तुम्ही तुमच्या सर्व अडचणी होलिकेच्या अग्नीत जाळून टाकू शकता. तुम्ही तुमच्या सर्व नकारात्मक गोष्टी दूर करू शकता. होलिका दहनाने जीवनात आनंद येऊ लागतो. यावेळी होलिका दहन 6 मार्च रोजी म्हणजे उद्या होणार आहे.
होलिका दहन म्हणजे काय?
भारतीय नवसंवत्सर म्हणजेच हिंदू नववर्ष चैत्र शुक्ल प्रतिपदेच्या पहिल्या तारखेला सुरू होते. त्याच्या आगमनापूर्वी, जुन्या वर्षाला निरोप दिला जातो. जुने संवत संपवण्यासाठी होलिका दहन केले जाते. याला काही ठिकाणी दहन संवत असेही म्हणतात. होलिका दहनात झाडाचे लाकूड जमिनीत गाडले जाते आणि चारही बाजूंनी लाकूड, शेणाची गौरी लाकडाचा भूसा टाकला जातो आणि ठराविक वेळी होळी जाळली जाते.
होलिका दहनाची खासियत
या दिवशी सर्व समस्या दूर होतील. रोग, आजार आणि हितशत्रुंपासू सुटका मिळेल. आर्थिक विवंचनेतून सुटका मिळेल. जर तुम्हाला देवाचा आशीर्वाद मिळवायचा असेल तर या दिवशी तुम्हाला ते सहज मिळू शकते. आगीत वेगवेगळ्या गोष्टी टाकून तुम्ही तुमचे अडथळे दूर करू शकता.
होलिका दहनाच्या दिवशी काय करावे
होलिका दहन सुरू झाल्यावर अग्नीला नमस्कार करा, जमिनीवर पाणी घाला. यानंतर आगीत गव्हाच्या ओंब्या, शेणाची गौरी आणि काळे तीळ टाकावे. नंतर किमान तीन वेळा होळीला प्रदक्षिणा घाला. यानंतर अग्नीला नमन करा आणि तुमची इच्छा सांगा. यानंतर होलिकेच्या अग्नीच्या अंगाऱ्याने स्वतः आणि कुटुंबातील सदस्यांना टिळा लावा.
होलिकेत काय अर्पण करावे
1. उत्तम आरोग्यासाठी होलिकेच्या अग्नीत काळे तीळ टाकावेत.
2. होलिकेच्या अग्नीत हिरवी वेलची आणि कापूर टाकून रोगापासून मुक्ती मिळते.
3. धनप्राप्तीसाठी अग्नीत चंदन टाका.
4. रोजगारासाठी होलिकेच्या अग्नीत मोहरी टाकावी.
5. विवाह आणि वैवाहिक समस्यांसाठी होलिकेच्या अग्नीत हवन साहित्य टाका.
6. नकारात्मक ऊर्जेपासून मुक्ती मिळवण्यासाठी होलिकेच्या अग्नीत काळी मोहरी टाकावी.
होलिका दहन शुभ मुहूर्त
यावेळी होलिका दहन 06 मार्चला होणार असून 7 मार्चला होळी खेळली जाणार आहे. पौर्णिमा 06 मार्च रोजी दुपारी 04.17 वाजता सुरू होईल आणि 07 मार्च रोजी 06.09 वाजता समाप्त होईल. होलिका दहनाचा शुभ मुहूर्त मंगळवार, 06 मार्च रोजी संध्याकाळी 06:24 ते रात्री 08:51 पर्यंत असेल. भद्राकालाची वेळ 06 मार्च रोजी संध्याकाळी 04:48 वाजता सुरू होईल आणि 07 मार्च रोजी पहाटे 05:14 वाजता समाप्त होईल.
(वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)