Conch Shell Remedies | विष्णूच्या आवडत्या शंखाची उत्पत्ती नेमकी झाली तरी कशी ? जाणून घ्या शंखासंबंधीत रहस्य
शंखाच्या पवित्र नादाने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सर्व काही शुभ होते. अशी मान्यता आहे. चला तर मग धर्म आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने शंखाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात.
मुंबई (मृणाल पाटील) : हिंदू परंपरेत (Hindu Religion) शंखाला खूप महत्त्व आहे. अनेक देवी-देवतांनी हातात आपल्याला शंख पाहायला मिळतात. अनेक संत प्राचीन काळापासून देवाची पूजा (Puja) आणि उपासना करण्यासाठी शंखाचा (Shankh) वापर करतात. पण या पवित्र शंखाची उत्पत्ती कशी झाली आणि विविध प्रकारच्या शंखांचे महत्त्व काय आहे. धार्मिक-अध्यात्मिक व्यवहारात वापरल्या जाणार्या शंखाची उत्पत्ती समुद्रमंथनाच्या वेळी झाल्याचे मानले जाते. त्यानंतर ते प्रथम भगवान विष्णूंनी परिधान केला होते. समुद्रमंथन हे देखील देवी लक्ष्मीचेच रूप असल्याने शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. वास्तुशास्त्रातसुद्धा शंख खूप शुभ मानला जातो.आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये शंख असते. पूजेमध्ये वापरण्यात येणारे शंख हे घराच्या प्रगतीसाठी शुभ मानले जाते. शंखाच्या पवित्र नादाने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सर्व काही शुभ होते. अशी मान्यता आहे. चला तर मग धर्म आणि ज्योतिष शास्त्राच्या दृष्टीने शंखाचे महत्त्व काय आहे हे जाणून घेऊयात.
शंखांचे प्रकार 1 गणेश शंख पूजेत वापरल्या जाणार्या गणेश शंखाचा आकार गणपतीसारखा असतो म्हणूनच त्याला गणेश शंख म्हणतात. या शंखाचा पूजेत त्याचा उपयोग केल्याने मनोकामना पूर्ण होते अशी मान्यता आहे.
2 दक्षिणावर्ती शंख विविध प्रकारच्या शंखांमध्ये दक्षिणावर्ती शंखाला खूप महत्त्व आहे. ज्या घरात दक्षिणावर्ती शंख असते त्या घरात लक्ष्मीचा वास असतो अशी मान्यता आहे. जर तुम्हाला आर्थिक अडचणींवर मात करायची असेल तर तुमच्या घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित करणे उत्तम मानले जाते.
शंखाचा उगम देवपूजेत वापरण्यात येणारा शंख अत्यंत पवित्र मानला जातो. जर तुम्ही योग्य निरीक्षण केले असेल तर हिंदू धर्माशी संबंधित सर्व देवी-देवतांनी शंख आपल्या हातात धरला आहे. शंखाशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतात की, ज्या घरात रोज पूजेत शंख वाजविला जातो, त्या घरातून सर्व दुःख, दारिद्र्य आणि अडथळे दूर होतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य यांचे निवासस्थान राहते. समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेल्या 14 रत्नांपासून शंखाची उत्पत्ती झाली असे मानले जाते. यामुळेच याला रत्न असेही म्हणतात, जे केवळ खेळण्यासाठीच नाही तर परिधान करण्यासाठी देखील वापरले जाते. माता लक्ष्मीचाही जन्म समुद्रमंथनातून झाला असल्याने शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. यामुळेच ज्या घरात शंख असतो, त्या घरात लक्ष्मीचा वास नेहमी राहतो
शंखाचे धार्मिक-आध्यात्मिक फायदे
- असे मानले जाते की ज्या घरात शंख ठेवला जातो आणि तो दररोज वाजविला जातो, तेथे धनाची देवी लक्ष्मीचा वास राहतो.
- शंखध्वनीमुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते .
- शंख फुंकल्याने फुफ्फुस मजबूत होतात. त्याचप्रमाणे शंख फुंकल्याने योगाच्या तीन क्रिया – पूरक, कुंभक आणि प्राणायाम एकाच वेळी पूर्ण होतात. त्यामुळे असे मानले जाते की जो शंख फुंकतो त्याला दीर्घायुष्य लाभते.
- जर तुम्ही आर्थिक अडचणीतून जात असाल आणि खूप प्रयत्न करूनही धनदेवतेचा आशीर्वाद मिळत नसेल तर तुम्ही घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित करून त्याची रोज पूजा करावी. असे मानले जाते की ज्या घरात दक्षिणावर्ती शंख राहतो त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास असतो.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
संबंधीत बातम्या :
Chanakya Niti | आचार्यांच्या मते या 5 गोष्टी करा, बिघडलेल्या गोष्टीपण चुटकीसरशी सुधारतील
28 January 2022 Panchang | 28 जानेवारी 2022, शुक्रवारचे पंचांग, जाणून घ्या शुभ मुहूर्त आणि राहुकाळ