Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती किती दिवस घरात ठेवावी? जाणून घ्या सविस्तर
Ganesh Chaturthi 2024: गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती भक्तीभावाने किती दिवस घरात ठेवावी? कधीआहे गणेश चतुर्थी पूजा मुहूर्त, जाणून घ्या सविस्तर... देशात सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण झालं आहे...
Ganesh Chaturthi 2024: देशात सध्या सर्वत्र भक्तीमय वातावरण आहे. कारण काही दिवसांत लाडक्या गणरायातं आगमन होणार आहे. अनेकांच्या घरात, सार्वजनिक मंडळांमध्ये गणरायाची स्थापना होणार आहे. हिंदू धर्मात श्रीगणेशाची आद्य देवता म्हणून पूजा केली जाते. कोणत्याही कार्यक्रमात सर्वात आधी गणरायाची पूजा होते. गणरायाच्या पूजेनंतर इतर गोष्टींची सुरुवात केली जाते… अशी देखील मान्यता आहे. अशात गणेश चतुर्थीच्या सणालाही श्रीगणेशाच्या पूजेचे विशेष महत्त्व आहे.
गणेश चतुर्थीच्या शुभमुहूर्तावर भाविक घरोघरी गणपतीची मूर्तीची स्थापना करतात आणि दहा दिवस त्यांची पूजा करतात. परंतु काही लोक 5 ते 7 दिवसांनी मूर्तीचं विसर्जन करतात. अशात गणेशोत्सवात गणपतीची मूर्ती किती दिवस घरात ठेवावी? असा प्रश्न देखील अनेकांना पडलेला असतो. त्यामुळे गणपतीची मुर्ती किती दिवस बसवावी जाणून घेऊ…
ज्योतिषीय दिनदर्शिकेनुसार, यंदाचा गणेशोत्सव 7 सप्टेंबर 2024, शनिवारपासून सुरू होत आहे. गणपती पूर्ण 10 दिवस घरात ठेवला जातो. आणि दहाव्या दिवशी त्याचे विसर्जन केलं जातं. परंतु भक्तीनुसार, लोक त्याला 1, 3, 5 किंवा 7 दिवस घरी ठेवून निरोप घेऊ शकतात. अनंत चतुर्दशीच्या दिवशी बहुतेक भक्त गणेशमूर्तीचे विधीवत पूजा करून बाप्पाला निरोप देऊन विसर्जन करतात. यावर्षी, अनंत चतुर्थी 17 सप्टेंबर 2024, रोजी आहे. तेव्हा अनेक जण बाप्पाला निरोप देतील.
गणेश चतुर्थी पूजा मुहूर्त…
वैदिक पंचागानुसार, भाद्रपद शुक्ल पक्षाची चतुर्थी तिथी 6 सप्टेंबर रोजी दुपारी 3.05 वाजता सुरू होईल आणि 7 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5.40 वाजता संपेल. अशा परिस्थितीत शनिवार, 7 सप्टेंबर 2024 रोजी गणेश चतुर्थी साजरी होणार आहे. या दिवशी पूजेची योग्य वेळ सकाळी 11:00 ते दुपारी 1:36 पर्यंत आहे. या विशेष दिवशी ब्रह्म योग देखील आहे जो रात्री 11:17 पर्यंत राहील.
( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)