लग्न जमवताना किती गुण जुळणे आवश्यक, जाणून घ्या ज्योतिषांकडून

हिंदू धार्मिक ग्रंथानुसार मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नानंतर भविष्यातील समस्या टाळण्यासाठी त्यांची कुंडली बघितल्या जाते. कुंडलित मंगळ दोष, गुण दोष, नाडी दोष पहिले जातात.

लग्न जमवताना किती गुण जुळणे आवश्यक, जाणून घ्या ज्योतिषांकडून
Follow us
| Updated on: Nov 19, 2024 | 3:13 PM

हिंदू धर्मात लग्नासाठी मुलगा आणि मुलगी यांच्या कुंडली बघितल्या जातात. भविष्यातील दुःख, त्रास आणि अडथळे टाळण्यासाठी कुंडली जुळवण्याला प्राधान्य दिले जाते. हिंदू धार्मिक ग्रंथानुसार मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नानंतर भविष्यातील समस्या टाळण्याचा एकमेव मार्ग म्हणजे त्यांची कुंडली जुळवणे. दोघांच्या कुंडली जुळवताना गुणांची कमाल जुळणी, मंगळ दोष, नाडी दोष इत्यादी प्रामुख्याने दिसतात.

लग्नापूर्वी कुंडली जुळवणे का गरजेचे आहे?

ज्योतिष शास्त्रानुसार एखाद्याच्या कुंडलित नाडी दोष, मंगळ दोष, गुण दोष इत्यादी असतील तर त्याचे निराकरण करणे आवश्यक आहे. असे केले नाही तर वधू-वरांच्या आयुष्यात दुःख आणि समस्या येत राहतात. कुंडली मध्ये मंगळदोष, नाडीदोष आणि गुण दोष जुळले पाहिजेत असे ज्योतिषी सांगतात. ही जुळवा जुळव झाली नाही तर मुला मुलींचे आयुष्य दुःखाने आणि संकटांनी भरलेली असतात. एवढेच नाही तर त्यांचे लग्न देखील तुटू शकते. ज्योतिष शास्त्रानुसार असे घडते कारण त्यांच्या कुंडलित मंगळ दोष, नाडी दोष आणि गुण दोष असू शकतात.

लग्नासाठी किती गुण जुळणे शुभ ?

मुलगा आणि मुलगी यांच्या लग्नापूर्वी कुंडलीत प्रामुख्याने मंगळ दोष, नाडी दोष आणि गुण दोष दिसतात. कुंडलीत एकूण 36 गुण आहेत. जर मुलगा आणि मुलीचे 32 ते 36 गुण जुळले तर ती सर्वोत्कृष्ट कुंडली जुळली आहे असे मानले जाते.

लग्नासाठी किमान किती गुण जुळणे आवश्यक ?

लग्नासाठी किमान 18 गुण जुळणे आवश्यक मानले जाते. जर एखाद्या मुलाचे किंवा मुलीचे गुण 18 पेक्षा कमी असतील तर त्यांना लग्नानंतर दुःख आणि समस्यांना सामोरे जावे लागू शकते. तसेच हे लग्न लवकर तुटण्याची शक्यता असल्याचं मानलं जातं. लग्न करायचं असेल तर मुलगा आणि मुलगी यांचा मंगळ दोष आधी पाहिला जातो.

मुलाच्या किंवा मुलीच्या कुंडलीत पहिल्या, चौथ्या, सातव्या, आठव्या आणि 12 व्या घरात मंगळाची दशा किंवा महादशा असेल तर त्यानुसार मुलगा आणि मुलीची कुंडली बघितल्या जाते. यामध्ये प्रामुख्याने गुणदोष, नाडीदोष यांचा मेळ साधला जातो. हे जुळवून लग्न केले तर आयुष्यात अडचणी येत नाहीत असे मानले जाते.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ
भाजपाचे केवळ ७७ आमदार निवडून आलेत, आमदाराच्या स्फोटक दाव्यांनी खळबळ.
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा
आवक जादा झाल्याने संत्र्‍यांचे भाव कोसळले, शेतकऱ्यांना मोठा तोटा.
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस
बीड हत्या प्रकरण : अंजली दमानिया यांना गुन्हे शाखेची नोटीस.
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी
संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीच्या महिला पदाधिकाऱ्याची CID चौकशी.
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार
'मुख्य आरोपीला वाचवण्यासाठी मोहरे...,' काय म्हणाले विजय वडेट्टीवार.
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य
'...यानंतर लाडकी बहीण योजना बंद..,' ठाकरे गटाच्या नेत्याचं वक्तव्य.
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
' तर चॅट भाषणाआधीच व्हायरल केला असता...,' काय म्हणाले जितेंद्र आव्हाड.
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत
जिल्ह्यातील लोकांनी भूमिका घ्यायला हवी होती, संतोषच्या बंधूंची खंत.
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल
तुमच्य़ा राजकारणात आम्हा कलाकारांना का ओढता? प्राजक्ता माळी यांचा सवाल.
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती
'...यातून न्याय मिळाला नाहीत तर...,' काय म्हणाले संभाजीराजे छत्रपती.