मुंबई : अन्न, वस्त्र आणि निवारा यांसारख्या जीवनाच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यापासून ते सर्व प्रकारच्या सुखसोयींसाठी पैशांची गरज असते. क्वचितच अशी कोणी व्यक्ती असेल ज्याला पैशांची गरज नसेल. व्यक्ती कुठल्याही परिस्थितीत असला तरी पैसे कमवण्याचा प्रयत्न करतो. आम्ही, तुम्ही सर्वजण अधिकाधिक पैसे कमवण्यासाठी रात्रंदिवस परिश्रम करतात. तेव्हाकुठे आपण आपल्या गरजा भागवण्यासाठी काही पैसे गोळा करु शकतो. परंतु तुम्हाला माहिती आहे का की पैसे कमवण्यापासून ते खर्च करण्यापर्यंत काही धार्मिक नियम आहेत. जीवनाशी निगडीत सर्वात महत्वाची गोष्ट मानला जाणारा पैसा कमावताना आणि खर्च करताना आपण कोणत्या गोष्टींची विशेष काळजी घेतली पाहिजे हे जाणून घेऊया –
संपत्ती आणि धर्म यांच्यातील संबंध
संपत्ती आणि धर्म यांचा खूप जवळचा संबंध आहे, त्यामुळे पैसा कमावताना धर्माला अजिबात विसरता कामा नये कारण संपत्ती हे फूल असेल तर धर्म हा त्याचा सुगंध आहे. धर्माशिवाय कमावलेला पैसा अपूर्ण आहे. त्यामुळे पैसा कमावताना धर्माला अजिबात विसरता कामा नये. कारण, धर्म आपल्याला योग्य आणि अयोग्य यातील फरक सांगतो.
कशे पैसे स्विकारु नये –
आचार्य चाणक्य हे अर्थशास्त्राचे जानकार मानले जात होते. म्हणून त्यांना कौटिल्य असेही म्हटले जाते. आचार्य चाणक्य यांच्या मते पैशांपेक्षा धर्म महत्त्वाचा आहे, त्यामुळे संपत्ती मिळवण्यासाठी धर्माचा विसर पडूनही त्याची बाजू सोडू नये. त्याचप्रमाणे, जेव्हा जेव्हा एखाद्याला पैसा आणि नातेसंबंध यापैकी एक निवडावा लागतो तेव्हा पैशाचा त्याग केला पाहिजे. आचार्य चाणक्य यांच्या मते, कोणत्याही व्यक्तीसाठी त्याचा स्वाभिमान सर्वात महत्वाचा असतो. जो पैशांनेही विकत घेता येत नाही. अशा परिस्थितीत जेव्हा स्वाभिमान येतो तेव्हा पैशांचा त्याग केला पाहिजे.
धर्मामुळे संपत्ती वाढते
संपत्ती आणि धर्मात धर्माला प्रथम प्राधान्य देण्याविषयी सांगताना कबीरदासजी म्हणतात –
धर्म किये धन ना घटे, नदी न घट्ट नीर।
अपनी आखों देखिले, यों कथि कहहिं कबीर।
म्हणजेच वाहत्या नदीचे पाणी ज्याप्रमाणे कमी होत नाही, त्याचप्रमाणे धार्मिक कार्य, इतरांना मदत, सेवा, दान केल्याने संपत्ती कधीच कमी होत नाही.
पैशांबाबतच्या धोरणाचे जाणणारा भर्तहरि सांगतात –
दानं भोगो नाशस्तिस्त्रो गतयो भवन्ति वित्तस्य ।
यो न ददाति न भुङ्क्ते तस्य तृतीया गतिर्भवति ॥
म्हणजेच संपत्तीच्या तीनच गती आहेत – दान, उपभोग आणि विनाश. म्हणजेच जो मनुष्य परोपकारासाठी पैसा दान करत नाही किंवा त्या पैशांचा उपभोग घेत नाही, त्याच्या संपत्तीचा तिसऱ्या गतीने म्हणजे त्याचा नाश होतो.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Friday Lakshmi Mantra | आयुष्य आर्थिक संकटांनी वेढलेलं आहे, देवी लक्ष्मीच्या या मंत्रांचा जप करा
येणाऱ्या नवीन वर्षात या 4 गोष्टी घरी आणा, घरामध्ये सुख समृद्धी नक्की नांदेल