तुमच्या घरात वास्तुदोष आहे हे कसे ओळखाल? जाणून घ्या त्याची लक्षणे
वास्तुशास्त्राचे काही नियम असतात. ते जर पाळले नाही तर घरामध्ये वास्तु दोष येऊ शकतो. वास्तुदोषांमुळे अनेक समस्यांचा सामना करावा लागतो. तुम्हालाही अनेक समस्यांचा सामना करावा लागत असेल तर तुमच्या घरात वास्तू दोष आहे की नाही हे तुम्ही जाणून घेऊ शकता. घरातील वास्तू दोष कसे ओळखायचे हे जाणून घ्या.
Follow us
वास्तूनुसार घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला, शौचालय पूर्व दिशेला असेल, किंवा घर चौकात असेल तर त्यामुळे वास्तु दोष निर्माण होतो.
तुमच्या घरात ठेवलेले तुळशीचे रोप जर अचानक सुकले. त्यानंतर नवीन तुळशीचे रोप लावल्यानंतरही ते सुकत असेल तर ते वास्तुदोषामुळे असू शकते.
तुम्ही कोणत्याही नवीन कामाची सुरुवात करत असाल आणि मेहनत करुन पण अपयश येत असेल तर ते वास्तुदोषाचे लक्षण असू शकते.
घरातील सदस्यांमध्ये सतत वाद विवाद होत असतील त्यामुळे घरातील वातावरण बिघडत असेल तर समजा वास्तु दोषाचे लक्षण आहेत.
जर तुमच्या घरात सतत पैशाची कमतरता भासत असेल, तसेच दररोज आर्थिक संकटाचा सामना करावा लागत असेल तर वास्तु दोषाचे लक्षण असू शकते.
जर घरातील लोकं सतत आजारी पडत असतील. आरोग्याच्या वेगवेगळ्या समस्या येत असतील तर समजा घरात वास्तुदोष आहे.