Goddess Lakshmi | धन-संपत्ती, सुखी वैवाहिक जीवन हवं असेल, तर घरात देवी लक्ष्मीची अशी मूर्ती स्थापन करा

शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. असे मानले जाते की (Worship Goddess Lakshmi Statue), घरात शांती आणि समृद्धी राखण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे.

Goddess Lakshmi | धन-संपत्ती, सुखी वैवाहिक जीवन हवं असेल, तर घरात देवी लक्ष्मीची अशी मूर्ती स्थापन करा
Goddess Laxmi
Follow us
| Updated on: Apr 23, 2021 | 1:11 PM

मुंबई : शुक्रवारचा दिवस हा देवी लक्ष्मीला समर्पित आहे. असे मानले जाते की (Worship Goddess Lakshmi Statue), घरात शांती आणि समृद्धी राखण्यासाठी या दिवशी देवी लक्ष्मीची पूजा केली पाहिजे. यामुळे आर्थिक समस्या दूर होतात आणि वैवाहिक जीवन आनंदी राहते. पण, अनेकदा पूजा केली तरी घरात आर्थिक समस्या असते. याचे कारण म्हणजे बर्‍याच वेळा लोक जाणीवपूर्वक किंवा नकळत अशा काही चुका करतात ज्यामुळे त्यांना पूजेचे फळ मिळत नाही (How To Worship Goddess Lakshmi Statue For Happiness And Wealth).

अनेक वेळा देवी लक्ष्मीच्या मूर्तीबाबत असे घडते. म्हणून देवी लक्ष्मीच्या मूर्तीशी संबंधित काही विशेष गोष्टी लक्षात घेतल्या पाहिजेत, जेणेकरुन आपली पूजा विफल होऊ नये आणि देवीची कृपा राहावी.

देवीची मूर्ती किती उंच असावी

असे म्हणतात की घरात अंगठ्याच्या उंचीइतकीच लक्ष्मीजींची मूर्ती स्थापित करावी. जर आपण घरात त्यापेक्षा उंच मूर्ती स्थापित केली तर तिच्या पूजेचे नियम देखील कठोर बनतात आणि नंतर ते पूर्ण न केल्यास मूर्ती दोष लागतो.

देवी लक्ष्मीच्या मूर्तीविषयी हे देखील लक्षात घ्यावे, की देवी लक्ष्मी नेहमीच गणपतीच्या उजव्या बाजूला विराजमान असतात. अशा स्थितीत देवीची मूर्ती घरात विराजमान करताना देखील उजव्या बाजूला ठेवली पाहिजे.

उभी मूर्ती नसावी

लक्षात ठेवा की देवी लक्ष्मीची उभी असलेली मूर्ती किंवा छायाचित्र घरात कधीही ठेवू नये. जेव्हा तुम्ही लक्ष्मी देवीची मूर्ती स्थापित कराल तेव्हा ती नेहमी बसलेल्या मुद्रेत असावी.

मूर्ती भिंतीवर चिकटून ठेवू नका

घरात जेव्हा लक्ष्मीची मूर्ती घरात ठेवली जाते, तेव्हा ती कधीही भिंतीला चिकटून ठेवू नये. आईच्या मूर्तीमध्ये आणि भिंतीत किमान एक इंच अंतर असले पाहिजे.

स्वतंत्रपणे विराजमान करा

सर्वतोपरी प्रयत्न करा की गणेश आणि देवी लक्ष्मी यांची मूर्ती एकत्रित विराजमान करण्याऐवजी त्यांच्या स्वतंत्र मूर्ती बसवाव्यात.

हे देखील लक्षात ठेवा

तसेच, घुबडवर स्वार असलेल्या देवी लक्ष्मीची प्रतिमा किंवा फोटो घरात स्थापित करु नये. असे मानले जाते की यामुळे घरात आर्तिक अस्थिरता होते.

म्हणूनच देवी लक्ष्मीची उपासना महत्त्वपूर्ण

शुक्रवार हा देवी लक्ष्मीचा दिवस मानला जातो. जी धन-संपत्तीची देवी आहे. मान्यता आहे की, प्रत्येक शुक्रवारी देवीची पूजा संपूर्ण विधीवत केली तर आर्थिक भरभराट होते. असे मानले जाते की शुक्रवारच्या उपासनेने यशाची प्राप्त होते.

How To Worship Goddess Lakshmi Statue For Happiness And Wealth

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Kamada Ekadashi 2021 | कामदा एकादशी तिथी, वेळ, महत्त्व आणि कथा, जाणून घ्या…

असं काय झालं की भगवान रामाने प्रिय हनुमानाला मृत्यूदंड सुनावला? जाणून घ्या देव-भक्ताच्या या अनोख्या कहाणीबद्दल

खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?
खातेवाटपानंतर मंत्र्यांना बंगल्यांचे वाटप, बघा कोणाला कोणता बंगला?.
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?
...म्हणून सोमनाथ सूर्यवंशीची हत्या, राहुल गांधींचा मोठा आरोप काय?.
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर
'साहेब म्हणतील ते तोरण अन् साहेब...', भुजबळांच्या समर्थनार्थ बॅनर.
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल
म्हणून भुजबळ फडणवीसांकडे गेले? भाजपच्या बड्या नेत्यानं स्पष्टच सांगितल.
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले
काँग्रेसच्या बड्या नेत्यानं काढली अशोक चव्हाण यांची लायकी, काय म्हणाले.
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्...
भुजबळांच्या नाराजीवर अखेर अजित पवार बोलले, 8 दिवसांनी घेतली दखल अन्....
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे
दादांना सोडून भाजपमध्ये जाणार? फडणवीसांच्या भेटीनंतर भुजबळांचे खुलासे.
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये
सनी लिओनी घेतेय सरकारी योजनेचा लाभ, दर महिन्याला खात्यात 'इतके' रूपये.
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला
लाथा-बुक्के अन् दगडानं मारहाण, भाजपच्या ज्येष्ठ नेत्यावर जीवघेणा हल्ला.
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज
सबसे कातील गौतमी पाटील नव्या वर्षात चाहत्यांना देणार मोठं सरप्राईज.