आर्थिक तंगी सोडत नसेल पाठ तर, या मंदिरात जाऊन नाणे करा अर्पण

भारतामध्ये अशी अनेक मंदिर आहे ज्याचा चमत्कारांशी संबंधित कथा जगभर प्रसिद्ध आहे. जाणून घेऊ अशाच एका मंदिराबद्दल ज्या मंदिरात गेल्यावर सर्व इच्छा पूर्ण होतात. तसेच अशी मान्यता आहे की या कुबेर मंदिरात गेल्यावर गरिबी नष्ट होते. जाणून घेऊ कुठे आहे ते मंदिर आणि त्याची माहिती.

आर्थिक तंगी सोडत नसेल पाठ तर, या मंदिरात जाऊन नाणे करा अर्पण
Follow us
| Updated on: Jan 12, 2025 | 6:41 PM

भारताला मंदिरांचा देश म्हटले जाते. भारतातील मंदिराची रहस्य आणि चमत्कारांच्या कथा लोकप्रिय आहेत. तर काही श्रद्धा आणि विश्वासामुळे जगभरात लोकप्रिय झाल्या आहे. असेच एक मंदिर धनाचा देव कुबेर यांचे आहे. या मंदिरामध्ये जाऊन दर्शन घेतल्याने माणसाची गरिबी पूर्णपणे नष्ट होते अशी लोकांच्या श्रद्धा आहे. याशिवाय या मंदिरामध्ये नाणे अर्पण करण्यासोबतच इतरही अनेक परंपरा आहे.

कुठे आहे हे मंदिर?

धनाचे देव म्हणून ओळख असलेले कुबेराचे हे मंदिर देवभूमी उत्तराखंड मधील अल्मोडा इथून 40 किलोमीटर अंतरावर आहे. हे मंदिर जागेश्वर धाम म्हणून ओळखले जाते. गरिबीतून मुक्तता मिळवण्यासाठी येथे दररोज लाखो भाविक दर्शनासाठी येत असतात.

मंदिराचा इतिहास

धनाचा देव कुबेराचे हे मंदिर जागेश्वर धाम येथे असलेल्या 125 मंदिर समूहां पैकी एका मध्ये आहे. हे भारतातील आठवे कुबेर मंदिर आहे. हे मंदिर ९ व्या शतकातील असल्याचे सांगितले जाते. कुबेराचे हे मंदिर प्राचीन मंदिर आहे. हे भाविकांच्या श्रद्धेचे मुख्य केंद्र आहे. कुबेर या मंदिरात शिवलिंगामध्ये शक्ती रूपात विराजमान आहेत.

हे सुद्धा वाचा

गरिबी नष्ट होते

एखाद्या व्यक्तीवर कुबेर देवाची कृपा असेल तर त्याला धन, कीर्ती आणि यश हे सर्व प्राप्त होते असे म्हटले जाते. या मंदिरात दररोज लोक आपल्या अनेक इच्छा घेऊन येत असतात आणि पूजा पाठ करतात. अशी मान्यता आहे की या मंदिरात दर्शन केल्याने व्यक्तीला आर्थिक लाभांसोबतच प्रगती होते आणि जीवनातील सर्व अडचणी दूर होतात.

सोने चांदीची नाणी अर्पण करतात

कुबेराच्या मंदिरात दर्शन घेतल्यानंतर लोक सोने किंवा चांदीची नाणी अर्पण करतात आणि पूजा केल्यानंतर ते नाणे पिवळ्या कपड्यात बांधून घरी घेऊन जातात. लोकांचा असा विश्वास आहे की इथे गेल्याने माणसाच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. या ठिकाणी कुबेराला खिरीचा नैवेद्य अर्पण केला जातो.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला
श्रद्धा-सबुरीचा अर्थ समजला नाही त्यांची हालत..., मुख्यमंत्र्यांचा टोला.
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा
'सुरेश धसांना दोन पत्नी...', गुणरत्न सदावर्ते यांचा मोठा दावा.
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?
अमरावतीत 100 हून अधिक महिलांना विषबाधा, नेमकं काय घडलं?.
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल
'रामदास कदमांपासूनच जातीयवादाचा उगम..',ठाकरे गटाच्या नेत्याचा हल्लाबोल.
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा
'तुम्हारे पाँव के नीचे ज़मीन नहीं...', शेरो शायरीतून ठाकरेंवर निशाणा.
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल
पुण्यात चाललंय काय? मद्यधुंद तरूणानं पोलिसांना धुतलं, व्हिडीओ व्हायरल.
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला
'सरडे रंग बदलतात पण एवढ्या वेगानं...', एकनाथ शिंदे यांचा ठाकरेंना टोला.
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात
'संजय राऊत डिप्रेशनमध्ये, त्यांची मानसिकता...'; नारायण राणेंचा घणाघात.
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला
'देवाभाऊ, सापांना जवळ घेऊ नका...', शिवसेना नेत्याचा CM यांना सल्ला.
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल
'सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम...', पंकजा मुंडेंचा हल्लाबोल.