Astro Tips to Get Out of Debt | वाढत्या कर्जाने हैराण झाले आहात ? मग शास्त्रात सांगितलेले काही उपाय करून पाहा
जर तुम्हालाही कर्जाची परतफेड करता येत नसेल, तर हे काही सोपे उपाय आहेत. यांचा वापर करुन तुम्ही कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करु शकता.
मुंबई : आयुष्यातील गरजा पूर्ण करण्यासाठी अपल्याला पैसे कमी पडतात. त्यासाठी आपण कर्ज घेतो. परंतु कमी पैशाच्या अभावी आपण ते परत करू शकत नाही तेव्हा ही परिस्थिती हाताळणे सर्वांनाच जमते असे नाही. कधी-कधी या गोष्टीमुळे लोक इतके अस्वस्थ होतात की ते आत्महत्येचे पाऊलही उचलतात. जर तुम्हालाही कर्जाची परतफेड करता येत नसेल, तर हे काही सोपे उपाय आहेत. यांचा वापर करुन तुम्ही कर्जाची परतफेड करण्याचा प्रयत्न करु शकता.
कर्जमुक्तीसाठी हे आहेत काही उपाय
1. गणपती विघ्नहर्ता मानले जातो. या काळात श्रीगणेशच तुमचा तारण हार बनू शकतो. यासाठी कोणत्याही बुधवारपासून गणेश स्तोत्र या ऋणशब्दाचे पठण सुरू करा. त्यानंतर हे पठण नियमित करावे. तसेच गणपतीला त्याचे आवडते लाडू अर्पण करावेत.
2. हनुमानजींना संकटमोचक असेही म्हणतात. हनुमानजींना प्रसन्न करण्यासाठी मंगळवार आणि शनिवारी त्यांना संदूर अर्पण करा. तसेच ‘ऋणमोचक मंगल स्तोत्र’ या पठणाची सुरुवात करावी. शुक्ल पक्षाच्या मंगळवारपासून प्रत्येक मंगळवारी हा पाठ वाचावा.
3. तुमच्या परिस्थितीला सुधारण्यासाठी तुम्ही भगवान शंकराची ही पूजा करु शकता. यासाठी दर मंगळवारी शिवमंदिरात जाऊन शिवलिंगाला मसूर अर्पण करावा. तसेच गरजूंना अन्नदान करा.
4. रात्रीच्या वेळी एका भांड्यात जव भरून डोक्याजवळ ठेवा आणि सकाळी आंघोळ केल्यानंतर हे जव कोणत्याही गरजूला दान करा. यामुळे हळूहळू तुमच्या घरातील पैशाचे संकट दूर होऊ लागते आणि तुम्ही कोणत्याही प्रकारच्या कर्जापासून मुक्त व्हाल.
5. बुधवारी गायीला चारा खाऊ घाला. यामुळे तुमच्या घराची आर्थिक स्थितीही सुधारेल आणि तुम्ही लवकरच कर्जमुक्त होण्यास मदत होते.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे. TV9 याची पुष्ठी करत नाही.
संबंधित बातम्या :
Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा
Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा
Char Dham | अद्भुत! उत्तराखंडमधील चार धामासंबंधित काही रंजक गोष्टी