मुलांचे अभ्यासात मन लागत नसेल तर हे उपाय अवश्य करा; वास्तुशास्त्राचे नियम जाणून घ्या
मुलांच्या अभ्यासाशी संबंधित पुस्तके, कप्पे इत्यादी खोलीच्या दक्षिण, पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिम ठिकाणी असावेत. म्हणजे, मुलांच्या वह्या-पुस्तक ठेवण्यासाठी नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला व्यवस्था केलेली असेल.
मुंबई : पालकांना मुलांच्या शिक्षणाबद्दल खूप काळजी असते. सध्याच्या कोरोना महामारीच्या काळात तर मुलांच्या अभ्यासावर खूप परिणाम झाला आहे. करिअरबाबत स्पर्धेचे वातावरण असल्याने प्रत्येक मुलाला चांगले गुण मिळवण्याचे आव्हान आणखी वाढले आहे. जर तुमच्या मुलाला इच्छा असूनही अभ्यास करायला आवडत नसेल, तर तुम्ही एकदा त्याच्या अभ्यासाची खोली जरूर बघा. कारण चुकीच्या दिशेने केलेले प्रयत्न किंवा चुकीच्या दिशेने बनवलेला अभ्यास कक्ष या दोन्ही गोष्टी मुलांसाठी नुकसानकारक ठरू शकतात. तुमच्या मुलाच्या अभ्यासाची खोली वास्तुशास्त्रानुसार कशी असावी हे आपण याठिकाणी विस्ताराने जाणून घेऊया. (If the children are not interested in their studies, they must do it; know the rules of architecture)
1. मुलांनी नेहमी उत्तर-पूर्व, उत्तर किंवा पूर्व दिशेला तोंड करून अभ्यास करणे चांगले असते. मुलांचे टेबल आणि खुर्चीची अशाप्रकारे व्यवस्था ठेवा की त्यांचे चेहरे नेहमी याच दिशांना असतील.
2. मुलांच्या अभ्यासाशी संबंधित पुस्तके, कप्पे इत्यादी खोलीच्या दक्षिण, पश्चिम किंवा दक्षिण-पश्चिम ठिकाणी असावेत. म्हणजे, मुलांच्या वह्या-पुस्तक ठेवण्यासाठी नेहमी दक्षिण किंवा पश्चिम दिशेला व्यवस्था केलेली असेल.
3. अभ्यासाच्या खोलीमध्ये पश्चिम, उत्तर आणि पूर्व दिशेला एक खिडकी अवश्य बनवा. जेणेकरून या खोलीत पूर्ण प्रकाश येईल.
4. अभ्यासाच्या खोलीचे कपाट कधीही उघडे ठेवू नका. कारण हा वास्तुदोषाचा एक प्रकार आहे. तुमची इच्छा असल्यास तुम्ही त्यात एक साधा काचेचा दरवाजा बसवू शकता, जेणेकरून आतील सर्व वह्या-पुस्तके तुम्ही पाहू शकाल.
5. तुमची इच्छा असल्यास तुम्ही उत्तर दिशेने मुलांसाठी स्टेशनरीशी संबंधित लहान रॅक बनवू शकता.
6. अभ्यासाच्या खोलीच्या भिंतींवर दक्षिण किंवा दक्षिण दिशेला कलात्मक चित्रे आणि छायाचित्रे लावा.
7. संगणक हे एक विद्युत उपकरण आहे. ते आग्नेय बाजूला पूर्व दिशेने ठेवावे, जेणेकरून काम करताना तुमचा चेहरा पूर्व दिशेला राहील.
8. मुलांच्या खोलीत जर तुम्हाला कोणत्याही देव-देवतेचा फोटो लावायचा असेल तर तो ईशान्य दिशेला ठेवा. अभ्यासाची खोलीमध्ये देवी सरस्वतीचा फोटो अवश्य लावला पाहिजे. मुलांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही याच दिशेला करा. (If the children are not interested in their studies, they must do it; know the rules of architecture)
VIDEO | डॉगीने किचनमधून जेवण चोरण्यासाठी लढवली भन्नाट शक्कल; तुम्हीही व्हिडीओ पाहून थक्क व्हालhttps://t.co/kBI1XGraeG#Dog |#ViralVideo |#SocialMedia |#Kitchen |#Meal
— TV9 Marathi (@TV9Marathi) August 23, 2021
इतर बातम्या