लग्नात अडचणी येत असतील तर ‘या’ मंत्राचा जप करा, दुर्वास ऋषींनी माता पार्वतीला दिला होता हा विशेष मंत्र!
Marriage, difficulty, mother Parvati, mantra, Durvas Rishi, chanting, लग्न, अडचनी, माता पार्वती, मंत्र, दुर्वास ऋषी, जाप
मुंबई : विवाह हा हिंदू धर्मातील 16 प्रमुख संस्कारांपैकी एक मानला जातो. विवाह हा दोन व्यक्तींच्या नवीन जीवनाचा आधार असतो. या बंधनात बांधले गेल्यावर दोन माणसे आयुष्यभर सुख-दु:खात एकत्र राहतात. पण लग्नासाठी आयुष्याचा जोडीदार (Spouse) आपल्या आवडीचा असावा आणि आपले लग्न वेळेत शक्य झाले पाहिजे, असे प्रत्येकाची अपेक्षा असते. परंतु, आजच्या काळात ते इतके सोपे नाही. मुलींना त्यांच्या आवडत्या व्यक्तीबरोबर लग्न करावे वाटत असले तरी, सगळ्या गोष्टी त्या दृष्टीने जमून येतील आणि प्रत्येक मुलीला पसंतीचा जोडीदार वर म्हणून लाभेल असे शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, जर तुमच्या लग्नाला उशीर (The wedding is late) होत असेल किंवा आवडत्या वराच्या शोधात असेल तर एकदा ‘स्वयंवर पार्वती मंत्र’ चा जप करून पहा. पार्वती स्तोत्रात या मंत्राचा उल्लेख आहे. हा एक अतिशय प्रभावी मंत्र (Effective spells) मानला जातो.
दुर्वास ऋषींनी दिला होता मंत्र
असे मानले जाते की, ‘स्वयंवर पार्वती मंत्र’ ऋषी दुर्वासांनी माता पार्वतीला दिला होता. या मंत्राच्या प्रभावामुळे माता पार्वतीला तिचा आवडता वर म्हणजेच महादेव मिळाला. पार्वती स्तोत्राच्या प्रत्येक श्लोकाचे पहिले अक्षर जोडून हा मंत्र तयार करण्यात आला आहे. हा एक अतिशय प्रभावी मंत्र मानला जातो. असे मानले जाते की, जर एखाद्या मुलीने किंवा पुरुषाने या मंत्राचा पूर्ण भक्तीभावाने जप केला तर तिचे लवकर लग्न होते आणि तिला तिच्या आवडीनुसार जीवनसाथी मिळतो. दुसरीकडे, ज्यांच्या वैवाहिक जीवनात समस्या आहेत, त्यांनी या मंत्राचा नियमित जप केल्यास भांडणे संपतात आणि वैवाहिक जीवन आनंदाने जाते.
108 वेळा करा मंत्राचा जाप
हा मंत्र आहे ह्रीं योगिनी योगेश्वरी योग भयंकर सकल स्थावर जंगमस्य मुख हृदयं मम वासम अकर्षाय अक्षराय नम: शुक्ल पक्षातील कोणत्याही सोमवारी या मंत्राचा जप करा, महादेव आणि माता पार्वतीच्या निमित्त उपवास ठेवा आणि शिवलिंगाचे दर्शन घेऊन जल अर्पण करा. शिवमंदिरात पार्वतीला मिठाई अर्पण करा आणि चुनरी घाला. यानंतर शिवलिंगावर फुले, अक्षत, चंदन, बेलपत्र, धतुरा, धूप, दिवा इत्यादी अर्पण करा. यानंतर महादेव आणि माता पार्वतीला आपल्या मनातील इच्छा सांगून ती पूर्ण करण्यासाठी प्रार्थना करा. त्यानंतर या मंत्राचा सुमारे 108 वेळा जप करा. सोमवारच्या शुक्ल पक्षापासून या मंत्राचा जप सुरू केल्यानंतर दररोज 108 वेळा जप करावा. लवकरच तुमची वैवाहिक इच्छा पूर्ण होईल.
इच्छा पूर्ण झाल्यावर माना आभार
आपल्या आवडत्या जोडीदाराबरोबर, लग्न निश्चित झाल्यावर शुक्ल पक्षाच्या सोमवारी पुन्हा एकदा महादेव आणि माता पार्वतीची पूजा करून व्रत ठेवावे. इच्छा पूर्ण केल्याबद्दल त्याचे आभार माना आणि पुन्हा एकदा मध, फळे इत्यादी देवाला अर्पण करा आणि कोणत्याही गरजूला द्या.