Gangajal | जर तुम्हीही घरात गंगाजल ठेवत असाल तर या चुका करणे टाळा, अन्यथा समस्यांना आमंत्रण द्याल

सनातन धर्मात गंगा नदीला देवीचे रुप मानले जाते. गंगाजल सर्वात पवित्र मानले जाते. या काळात देवी गंगा यांना पापतारिणी असेही म्हणतात. घरातील कोणत्याही शुभ कार्यासाठी गंगाजलाचा वापर नक्कीच केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार देवी गंगा मोक्ष देते. दररोज कित्येक लोक गंगेत स्नान करतात. गंगेप्रती लोकांची मोठी श्रद्धा पाहायला मिळते.

Gangajal | जर तुम्हीही घरात गंगाजल ठेवत असाल तर या चुका करणे टाळा, अन्यथा समस्यांना आमंत्रण द्याल
gangajal
Follow us
| Updated on: Oct 29, 2021 | 12:19 PM

मुंबई : सनातन धर्मात गंगा नदीला देवीचे रुप मानले जाते. गंगाजल सर्वात पवित्र मानले जाते. या काळात देवी गंगा यांना पापतारिणी असेही म्हणतात. घरातील कोणत्याही शुभ कार्यासाठी गंगाजलाचा वापर नक्कीच केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार देवी गंगा मोक्ष देते. दररोज कित्येक लोक गंगेत स्नान करतात. गंगेप्रती लोकांची मोठी श्रद्धा पाहायला मिळते.

लोक आपल्या घरात गंगाजल नक्कीच ठेवतात. गंगाजल घरात ठेवणे शुभ मानले जाते. असे म्हणतात की गंगाजल घरात ठेवल्यास तुमच्या घरात सकारात्मकता कायम राहते. अशा परिस्थितीत लोक सहसा पूर्ण भक्तीभावाने गंगाजल आपल्या घरात ठेवतात, परंतु जर ते घरात ठेवताना काही गोष्टींची काळजी घेतली नाही तर तुम्हाला समस्यांना सामोरे जावे लागू शकते.

गंगाजल कोणत्या पात्रात ठेवू नये

साधारणपणे असे दिसून येते की लोक गंगाजल प्लॅस्टिकच्या बाटलीत किंवा किंवा एखाद्या डब्यात ठेवतात. पण, प्लास्टिकच्या बाटलीत चुकूनही गंगाजल ठेवू नये, कारण प्लास्टिक शुद्ध मानले जात नाही. अशा परिस्थितीत गंगाजल शक्यतो तांबा, पितळ, माती किंवा चांदीच्या पात्रात ठेवावे.

चुकूनही ही कामं करु नका

घरामध्ये गंगाजल ठेवल्यास प्रत्येक परिस्थितीत सात्विकता आणि स्वच्छतेची पूर्ण काळजी घ्यावी. नेहमी लक्षात ठेवा की गंगाजल ठेवलेल्या ठिकाणी तामसिक वस्तूंचे सेवन करु नये, असे केल्यास गंगाजल स्वयंपाकघर इत्यादीपासून दूर ठेवावे.

अशा ठिकाणी गंगाजल ठेवू नये

गंगाजल आयुष्यात पवित्रता प्रदान करते, त्यामुळे अंधार असलेल्या ठिकाणी गंगाजल कधीही ठेवू नये. कारण गंगाजल पवित्र आहे. मग ते ठेवताना याची काळजी घ्या की जिथे गंगाजल ठेवले जाते तिथे कोणत्याही प्रकारची घाण नसावी.

अशा प्रकारे दोष लागतो

गंगेच्या पाण्याला स्पर्श करण्यापूर्वीही काही गोष्टींची काळजी घ्यायला हवी. स्पर्श करण्यापूर्वी आपले हात स्वच्छ धुवावेत, गंगाजलला घाणेरड्या हातांनी स्पर्श कधीही करु नये. गंगेच्या पाण्याला घाणेरड्या हातांनी किंवा अपवित्र अवस्थेत स्पर्श केल्यास दोष लागतो.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Dhanteras 2021 : ‘या’ 7 गोष्टी घरात आणतात सुख-समृद्धी, धनत्रयोदशीच्या दिवशी आणायला विसरू नका !

काय सांगता! घरातील फर्निचरसुद्धा ठरु शकतं वास्तू दोषाचे कारण, 8 गोष्टी कधीही करु नका

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.