Jyotish Tips:स्वप्नात ‘या’ गोष्टी पाहाल, तर मालामाल व्हाल; वाचा भविष्य काय सांगतं
तुमच्या स्वप्नात या गोष्टी येताता का? तर तुम्हाला धनसंपत्तीचा लाभ नक्की होणार आहे. याकोणत्या गोष्टी आहेत जाणून घ्या.
धनाची देवता (Dhan Laxmi) जीवनात येण्याचे अनेक संकेत असतात. हे संकेत तुम्हालाही होतात का. असं संकेत होतात तेव्हा लवकरच धनसंपत्त मिळणार आहे असं मानलं जातं. कोणते आहेत हे संकेत जाणून घेऊया. तुम्हालाही असे संकेत होतात का.
हिंदू धर्मात चांगली स्वप्न पडणं ही खास बाब सांगितली गेली आहे. शास्रानुसार स्वप्नात जे दिसतं, त्याला चांगले किंवा वाईट परिणाम जोडले गेलेले असतात. काही गोष्टी जर स्वप्नात दिसल्या, तर जीवनात सुख शांती तर येतेच त्याच बरोबर धनसंपत्तीची समस्या असेल तर ती ही सुटते. धनसंपत्तीचा लाभ होणं हे लक्ष्मी (Mata Laxmi worship) मातेशी अवलंबून असतं. हिंदू धर्मात (Hindu Dharma) लक्ष्मी मातेच्या आठ स्वरूपांचे विश्लेषण केलं गेलं आहे. ज्यापैकी एक रूप हे धनाची देवता लक्ष्मी असं आहे. लक्ष्मी मातेची कृपा जर एखाद्या व्यक्तीवर झाली, तर त्या व्यक्तीला जीवनात कधीच धनसंपत्तीशी निगडीत समस्या येत नाहीत. पण, जर लक्ष्मी माता कोणावर कोपली तर, त्या व्यक्तीच्या जीवनात कलह आणि दारिद्रय येऊ शकतात. लोक धनाचा लाभ झाला तर घरात लक्ष्मी मातेचं आगमन झालं असं ही म्हणतात.
धनाची देवता जीवनात येणं किंवा घरात येण्याशी अनेक संकेत जोडले गेले आहेत. हे संकेत घडले तर धनसंपत्तीचा लवकरच लाभ होणार असं मानलं जातं. स्वप्नात काही गोष्टी येणं हे देखील धनसंपत्ती मिळण्याचे संकेत मानले गेले आहेत. जाणून घेऊया हे संकेत कोणते आहेत ते.
धनसंपत्ती मिळण्याचे संकेत
- ज्योतिषशास्त्रानुसार आणि हिंदू मान्यतांनुसार जर स्वप्नात मधमाशीचं पोळ दिसलं, तर हे एक प्रकारचं धन लाभाचं संकेत मानलं गेलं आहे. स्वप्नात मधाचं पोळं दिसल्यावर लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्याचे उपाय करा.
- स्वप्नात देवी देवता येणं हे शुभ मानलं जातं. जर तुम्हाला झोपताना लक्ष्मी माता दिसत असेल. तर समजुन जा धनसंपत्तीशी निगडीत तुमच्या समस्या लवकरच दूर होणार आहेत. देवी देवता स्वप्नात आल्याने तुम्हाला जीवनातील इतर लाभ ही मिळतात.
- स्वप्नात उंदीर दिसणं शुभ मानलं जातं. उंदीर हे गणपती बाप्पाचं वाहन मानलं गेलं आहे. उंदीर स्वप्नात आला तर धनसंपत्ती बरोबर जीवनात सुख आणि समृद्धी येते. स्वप्नात उंदीर आले तर नंतर उंदरांना बाहेर जाऊन खायला घाला.
- स्वप्नात जर सापाचं बीळ दिसलं तर हे देखील धनसंपत्ती मिळण्याचा संकेत आहे. पण, असं स्वप्न पडलं तर तुम्ही एकदा पंडीत किंवा ज्योतिषाशी बोलून योग्य सल्ला घ्या.
(दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे. याबाबत आम्ही कोणताही दावा करत नाही.)