यशाच्या शोधात आहात? मग आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या 2 गोष्टी आत्मसात करा
आचार्य चाणक्य यांना प्रत्येक क्षेत्राचे सखोल ज्ञान होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळात अगदी अचूक ठरताना दिसतात. आचार्य चाणक्य सांगतात की , एखाद्या व्यक्तीची कृती त्याला यशस्वी आणि अयशस्वी दोन्ही बनवते.
मुंबई : आचार्य चाणक्य यांना प्रत्येक क्षेत्राचे सखोल ज्ञान होते. त्यांनी सांगितलेल्या गोष्टी आजच्या काळात अगदी अचूक ठरताना दिसतात. आचार्य चाणक्य सांगतात की , एखाद्या व्यक्तीची कृती त्याला यशस्वी आणि अयशस्वी दोन्ही बनवते. आपण जसे वागतो त्या प्रमाणेच आपले भविष्य घडत असते. जो आपल्या जबाबदाऱ्या पूर्ण शिस्तीने आणि प्रामाणिकपणे पार पाडतो तोच सर्वोत्तम व्यक्ती बनतो. असे चाणक्यांनी सांगितले होते.
चाणक्य नुसार, ज्या व्यक्तीला हे करण्यात यश मिळते, त्यांच्यावर माता लक्ष्मी आणि माता सरस्वती यांचा आशीर्वाद कायम राहतो. शास्त्रामध्ये लक्ष्मीला धन, सुख, समृद्धी आणि वैभवाची देवी मानले जाते. यासोबतच कलियुगात देखील लक्ष्मीजींना विशेष स्थान देण्यात आले आहे, देवी लक्ष्मीचा आशीर्वाद दुःख दूर करण्यात सहायक आहे. तर माता सरस्वतीला विद्येची देवी म्हटले जाते. चाणक्य नुसार ज्यांना लक्ष्मी आणि माता सरस्वती यांचा आशीर्वाद मिळतो त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण होतात. अशा परिस्थितीत ज्ञान आणि पैसा या दोन्ही गोष्टी जीवनात महत्त्वाच्या आहेत, पण त्यासोबत आणखी काही गोष्टी आहेत, ज्यांची काळजी घ्यायला हवी-
मोठ्यांचा आदर करा
चाणक्य नीतीमध्ये सांगण्यात आले आहे की, जीवनात नेहमी ज्येष्ठांचा आदर केला पाहिजे. आपण आपल्या अहंकाराच्या पुढे जावून कोणत्याही व्यक्तीचा आदर करायला हवा. ज्येष्ठ व्यक्तींच्या आशीर्वादाने जीवनातील आत्मविश्वास वाढतो. असं असलं तरी, प्रत्येक काम पूर्ण करण्यासाठी सर्वप्रथम गरज असते ती म्हणजे आत्मविश्वास. जर तुमच्यावर आत्मविश्वास नसेल तर तुम्ही आयुष्यात काहीही साध्य करू शकत नाही.
लहान मुलांशी प्रेमाने वागा
चाणक्य म्हणतात की मोठ्यांचा आशीर्वाद मिळण्याबरोबरच आणखी एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे ती म्हणजे लहानांना म्हणजे त्यांच्या चुलत भावांनाही आपुलकीच्या भावनेने प्रेम दिले पाहीजे. मोठ्यांचा आशीर्वाद आणि लहानग्यांचे प्रेम याच गोष्टींमुळे जीवनात यश मिळते. ज्या व्यक्तीस या दोन्ही गोष्टी मिळतात त्या व्यक्तीसाठी आयुष्यात कोणतीच गोष्ट असाध्य नसते. अशा लोकांना सर्वत्र मान-सन्मान मिळतो.
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :
Kartik Purnima 2021 | कार्तिक पौर्णिमेला 5 गोष्टी नक्की करा, आयुष्यातील सर्व दु:ख दूर होतील
निवडणूकीच्या काळात नेत्यांची रीघ, 4 मंदिरात गेल्याने राजकारणात यश हमखास मिळते https://t.co/SXQvQaTupz#ElectionWinningTemples| #KamakhyaTemple| #MaaPitambara | #Mahakal| #Vindhyavasini
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2021