वैवाहिक आयुष्यात सुख, आनंद हवा असेल तर हे उपाय करा, आयुष्य आणखी सुंदर होईल
सुखी वैवाहिक जीवनासाठी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि 'ओम नमो भगवते वासुदेवय नम:' या मंत्राचा जप करा. तसेच आपल्या बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावा.
मुंबई : प्रत्येकाची इच्छा असते की विवाहित जीवन नेहमी आनंदी असावे. अर्थात आपल्याला वैवाहिक जीवनात जोडीदाराची प्रत्येक टप्प्यात चांगली साथ लाभू दे, तिच्याकडून चांगले प्रेम मिळू दे, असे प्रत्येकाला वाटते. आपले आयुष्य हे अधिकांशी प्रेम भावनेवर आधारलेले आहे. म्हणूनच प्रत्येक जण आपल्या वैवाहिक जीवनाची सुरुवात करण्यापूर्वी योग्य जीवनसाथी निवडतो आणि आपल्या कुटुंबासाठी प्रत्येक सोईसुविधांची व्यवस्था करतो, जेणेकरून घरातील आनंद वाढत राहतो. असे म्हटले जाते की कौटुंबिक जीवन कोणत्याही व्यक्तीच्या प्रगतीमध्ये महत्वाची भूमिका बजावते. (If you want happiness and joy in married life, do this astrological remedy)
जर कौटुंबिक जीवन आनंदी असेल तसेच वैवाहिक जीवनात प्रेम व सौहार्द कायम असेल तर व्यक्ती लवकरच प्रगतीच्या दिशेने वाटचाल करते. याच जोरावर व्यक्तीला आयुष्यात सर्वात मोठे यश सहजतेने मिळवता येते. त्याउलट जर कुणाच्याही जीवनात विसंवाद आला तर त्याच्याकडे आहे, तेदेखील गमावण्याची वेळ त्या व्यक्तीवर येते. अशा परिस्थितीत नेमके काय करायचे हेच कळत नसते. कारण व्यक्ती संसाराच्या मोहजालात अडकलेला असतो. जोडीदार तर निवडलेला असतो. मात्र त्याच्याकडून प्रेम व उत्तम साथीची अपेक्षा होत नसते. अनेक जण यातूनच घटस्फोटाचा टोकाचा निर्णय घेतात. पण लक्षात घ्या अशा परिस्थितीतही मार्ग आहे. तुम्हाला आम्ही येथे असे काही ज्योतिषीय उपाय सांगू इच्छितो, जे तुमच्या कुटुंबाच्या आनंदाला वाईट नजर लागण्यापासून वाचवत आणि तुमच्या आयुष्यातील प्रेम व सौहार्दाचे वातावरण कायम राहू शकेल.
1. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमच्या कुटुंबाच्या आनंदावर काही वाईट नजरेचा परिणाम झाला असेल तर तुम्ही तुमच्या संपूर्ण कुटुंबासह पवित्र नदी किंवा तलावामध्ये स्नान करावे. हा उपाय केल्याने तुमच्या कुटुंबाशी संबंधित सर्व वाईट शक्ती नदीच्या पाण्यात वाहून जातील आणि कुटुंब, पती -पत्नीमध्ये प्रेम वाढेल.
2. सुखी वैवाहिक जीवनासाठी तुळशीच्या रोपाला पाणी अर्पण करा आणि ‘ओम नमो भगवते वासुदेवय नम:’ या मंत्राचा जप करा. तसेच आपल्या बेडरूममध्ये राधा-कृष्णाचा फोटो लावा.
3. जर कोणत्याही कारणाशिवाय कुटुंबातील सदस्य किंवा पती-पत्नीमध्ये नेहमीच तणाव असेल तर गुरुवारी केस आणि दाढी-मिशा कापू नका.
4. जर कोणत्याही कारणाशिवाय पती -पत्नीमध्ये भांडण झाले तर त्या पती -पत्नीने लाल रंगाचे कपडे घालणे टाळावे.
5. जर तुम्हाला असे वाटत असेल की तुमचे सुखी वैवाहिक आयुष्य एका स्त्रीमुळे उध्वस्त झाले आहे आणि घरात त्याच कारणावरून नेहमीच विसंवादाचे वातावरण असेल तर त्या स्त्रीमुळे होणारा वाईट नजरेचा दोष दूर करण्यासाठी, चांदीच्या अंगठीमध्ये मूनस्टोन घाला व ती शुक्ल पक्षाच्या सोमवारी बोटात घाला. (If you want happiness and joy in married life, do this astrological remedy)
सावधान! लॉटरी जिंकल्याचा तुम्हाला कॉल किंवा मेसेज आलाय का?, फसवणुकीचे बळी ठरणार#Phonecall #email #messagereceived #fishing https://t.co/Umcdxp7M6n
— TV9 Marathi (@TV9Marathi) October 5, 2021
इतर बातम्या
2022 कॉमनवेल्थ गेम्समधून भारतीय हॉकी संघाची माघार, ‘या’ कारणामुळे घेतलं नाव मागे
महासत्ता अमेरिकाच कर्जाच्या खाईत; भारताला अब्जावधींचे नुकसान होणार