लवकरच येणार वर्षातील सर्वात छोटा दिवस, काय असेल खास? जाणून घ्या
या दिवशी सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात आपल्या शिखर बिंदूवर पोहोचलेला असतो. ज्यामुळे या दिवशी पृथ्वी झुकलेल्या अक्षावर फिरणार आहे. याच कारणामुळे दिवस सगळ्यात लहान असणार आहे.
प्रत्येक वर्षी हिवाळ्याच्या दिवसामध्ये असा एक दिवस येतो, ज्या दिवशी दिवस सर्वात लहान असतो आणि रात्र मात्र मोठी असते. या दिवसाला इंग्रजीत याला विंटर सॉल्स्टीस असे म्हणतात. वर्षातील सर्वात लहान दिवस डिसेंबरमध्ये येतो. 21 किंवा 22 डिसेंबरला हा दिवस सर्वात लहान असल्याचं म्हटलं जातं. या दिवशी सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात आपल्या शिखर बिंदूवर पोहोचलेला असतो. ज्यामुळे या दिवशी पृथ्वी झुकलेल्या अक्षावर फिरणार आहे. याच कारणामुळे दिवस सगळ्यात लहान असणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार वर्षातील सर्वात लहान दिवसापर्यंत सूर्याने धनु राशीत प्रवेश केला आहे. यावेळी सूर्य दक्षिणायनातून उत्तरायणाकडे जाण्याच्या तयारीत आहेत.
हिवाळी संक्रांत म्हणूनही ओळख
ज्योतिषशास्त्रानुसार हा दिवस काही ठिकाणी हिवाळी संक्रांत म्हणूनही ओळखला जातो. हा “वर्षातील सर्वात लहान दिवस” म्हणून चिन्हांकित केला गेला आहे . तसेच ज्योतिषशास्त्रानुसार मकर संक्रांत ही भगवान सूर्याच्या उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. उत्तरायण हा सकारात्मक ऊर्जेचा काळ असून सूर्य हा आपल्या जीवनाचा घटक मानला जातो. वर्षातील सर्वात लहान दिवशी सूर्याची ऊर्जा खूप कमी मानली जाते. ज्योतिषशास्त्रानुसार कमकुवत सूर्याचा प्रभाव हा माणसाच्या आत्मसन्मानावर आणि आरोग्यावर पडत असतो. मात्र, अध्यात्म आणि ज्ञान या दोन्ही दृष्टीने हा काळ चांगला आहे. कारण या वेळेपर्यंत सूर्य धनु राशीत भ्रमण करत असून ही राशी गुरूच्या प्रभावाखाली राहते.
लहान दिवशी काय करालं?
वर्षातील सर्वात लहान दिवस अंधारातून प्रकाशाकडे जाण्याचे प्रतीक मानले जाते. म्हणजेच अंधारावर मात करत प्रकाशाकडे जाण्याचा हा प्रवास आहे. अशा वेळी आपण आपल्या जीवनातील सगळ्या नकारात्मक ऊर्जा, वाईट सवयी सोडून जीवनात नवे संकल्प करावेत. वर्षातील सर्वात लहान दिवशी ही देणगी दिली जाते. धार्मिक मान्यतेनुसार या दिवशी अन्न, वस्त्र आणि धनदान करणे शुभ असते. दुर्बल सूर्याला शक्ती देण्यासाठी ‘ॐ सूर्याय नम:’ या मंत्राचा जप करावा. यासोबतच गायत्री मंत्राचा जपही आपल्या आरोग्यासाठी तसेच जीवनासाठी फायदेशीर ठरतो. आयुर्वेदानुसार वर्षातील सर्वात कमी दिवशी शारीरिक शुद्धता आणि येणारी थंडी टाळण्याची चिन्हे देखील आहेत. सूर्य कमकुवत झाल्यामुळे शरीरातील ऊर्जा कमी होऊ शकते. त्यामुळे या दिवशी केवळ सात्विक आहारच घ्यावा. ज्याने तुमचे शरीराला आतून ऊर्जा मिळते.
दरवर्षीप्रमाणे यंदाही वर्षातील सर्वात लहान दिवस जवळ आलेला आहे. डिसेंबर महिन्यात हा दिवस पाहायला मिळतो. या दिवशी सूर्य पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धात आपल्या शिखर बिंदूवर असतो. ज्योतिषशास्त्रात या घटनेला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले असून प्रत्येक ठिकाणी या दिवसाला वेगवेगळ्या नावांनी ओळखले जाते. तसेच या दिवशी आपल्या आरोग्याची देखील काळजी घेणे महत्वाचे आहे.