Garuda Purana : जीवनात अडचणी वाढवतात, या 6 सवयी; प्रगती करायची असेल तर या सवयी सोडा

व्यक्तीने योग्य आणि अयोग्य कृतींमधील फरक समजून घ्यावा व त्या कृती कराव्यात. अशा कृती त्या व्यक्तीला मोक्षाकडे घेऊन जातात. गरुड पुराणात नमूद केलेल्या गोष्टींचे पालन केल्याने कोणतीही व्यक्ती सर्व संकटांपासून आपले जीवन वाचवू शकते.

Garuda Purana : जीवनात अडचणी वाढवतात, या 6 सवयी; प्रगती करायची असेल तर या सवयी सोडा
नेहमी त्या व्यक्तीपासून दूर रहा जो तुमचा द्वेष करतो आणि तुमचे नुकसान करण्याचा प्रयत्न करतो. अशा वेळी सावधगिरी बाळगणे आणि संयम बाळगणे आवश्यक आहे.
Follow us
| Updated on: Oct 12, 2021 | 3:09 PM

मुंबई : कोणतेही पुस्तक एखाद्या व्यक्तीचे जीवन सुधारते. त्या व्यक्तीला धर्माच्या मार्गावर नेण्यासाठी उपयुक्त असते. गरुड पुराणदेखील महत्वाच्या धार्मिक ग्रंथांपैकी एक आहे. त्याला महापुराण म्हटले जाते. कारण ते जन्मापासून मृत्यूपर्यंत आणि मृत्यूनंतरही व्यक्तीची परिस्थिती काय असू शकेल याचे वर्णन करते. त्याचबरोबर गरुड पुराणामध्ये हेदेखील स्पष्ट केले गेले आहे की कोणत्या प्रकारची कृती पाप मानली जाते आणि कोणती कृती पुण्य मानली जाते? तसेच कोणत्या प्रकारच्या कर्मामुळे मृत्यूनंतर व्यक्तीची स्थिती काय असते? या सर्व गोष्टींचा गरुड पुराणामध्ये उल्लेख असल्यामुळे या महापुराणाला अधिक महत्व आहे. (Increases difficulties in life, these 6 habits; Give up these habits if you want to make progress)

व्यक्तीने योग्य आणि अयोग्य कृतींमधील फरक समजून घ्यावा व त्या कृती कराव्यात. अशा कृती त्या व्यक्तीला मोक्षाकडे घेऊन जातात. गरुड पुराणात नमूद केलेल्या गोष्टींचे पालन केल्याने कोणतीही व्यक्ती सर्व संकटांपासून आपले जीवन वाचवू शकते. चला तर मग आपण येथे त्या 6 सवयींविषयी जाणून घेऊया, ज्या सवयी व्यक्तीसाठी फक्त अडचणी वाढवण्याचे काम करतात.

काळजी

गरुड पुराणात चिंतेचे वर्णन ‘एक चिखल’ असे केले आहे. काळजी व्यक्तीला आतून पोकळ बनवते. काळजी करून परिस्थितीत काहीही बदल होऊ शकत नाही. तरीही व्यक्ती काळजी करीत बसत. जर तुम्हाला खरोखर परिस्थिती बदलायची असेल तर विचार करा, समस्या सोडवा आणि तुमचे काम करा.

भीती

तुम्हाला एखाद्या गोष्टीची जितकी भीती वाटते, तितकी ती गोष्ट तुम्हाला अधिक घाबरवेल. म्हणून भीतीवर मात करा. भीती न बाळगता जीवनातील समस्या सोडवा.

मत्सर

मत्सर करणाऱ्या व्यक्तीच्या आयुष्यात पश्चातापाशिवाय दुसरे काहीच उरत नाही. ज्या व्यक्तीला हेवा वाटतो, तो स्वतःसाठी काहीही करू शकत नाही. ती व्यक्ती नेहमी इतरांच्या यशाचा हेवा करते आणि त्यांना अपमानित करण्यासाठी चुकीच्या गोष्टी करते.

राग

राग हा माणसाचा सर्वात मोठा शत्रू असल्याचे म्हटले जाते. कारण रागाच्या वेळी माणसाचे मन भ्रष्ट होते. अशा परिस्थितीत तो कधीही कोणताही निर्णय नीट घेऊ शकत नाही. त्याच्या रागातून अतिरेकी कृत्य घडते. म्हणून व्यक्तीने नेहमी आपले मन शांत ठेवण्याचा प्रयत्न केला पाहिजे.

आळस

तुम्ही कितीही हुशार असलात तरी, पण जर तुम्हाला आळशीपणाची सवय असेल तर तुम्ही तुमचा अमूल्य वेळ वाया घालवता. अशा परिस्थितीत तुमची स्वप्ने अर्धवट राहतात. तुम्ही त्या स्वप्नांपर्यंत पोचू शकत नाही. आळशीपणातून येणाऱ्या नैराश्याचा तुमच्या आरोग्यावरही परिणाम होतो.

नकारात्मक विचार

नकारात्मक विचार माणसाला उत्साहाने काहीही करू देत नाही. जर तुम्हाला खरोखर कोणतेही काम यशस्वीरित्या पूर्ण करायचे असेल तर तुम्हाला तुमचा विचार सकारात्मक बनवावा लागेल. जर तुम्ही नकारात्मक विचार ठेवलात तर तुमच्या हातून चुकाच अधिक घडू शकतात. अशा परिस्थितीत तुम्ही स्वतःच तुमच्या समस्यांचे कारण व्हाल. (Increases difficulties in life, these 6 habits; Give up these habits if you want to make progress)

इतर बातम्या

Gold price: सोनियाच्या उंबऱ्यात नाशिकमध्ये स्वस्ताई

अवघ्या 4 रुपयांचा शेअर पोहोचला 787 रुपयांवर, 163 पट रिटर्न्स; लखपती झाले करोडपती

'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण
'साई भक्तांच्या भावना दुखावल्या हे मान्य, पण...', विखेंचं स्पष्टीकरण.
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट
'खासदराची चड्डी जागेवर राहणार नाही', पोलीस अधिकाऱ्याची वादग्रस्त पोस्ट.
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ
संजय गायकवाड मतदारांवर भडकले, मतदारांवर बोलताना घसरली जीभ.
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?
'तुम्ही माझे मालक नाही...', भर कार्यक्रमात अजितदादा कोणावर संतापले?.
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये
संतोष देशमुख हत्या प्रकरणातील अरोपींचा मुक्काम भिवंडीनंतर गुजरातमध्ये.
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल
'...तर ते इतके दिवस गप्प का?', चाकणकरांचा धसांवर हल्लाबोल अन् थेट सवाल.
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?
'अजितदादा तुझ्या पाया पडतो...', सुरेश धस जाहीरपणे काय बोलून गेले?.
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?
'आकाचा आका कोण? मुंडेंनासुद्धा फाशी झाली पाहिजे', कोणाचा आक्रमक सवाल?.
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'
'शिर्डीतलं मोफत जेवण बंद करा, सगळे महाराष्ट्रातील भिकारी इथे गोळा...'.
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा
'SIT मध्ये असलेला अधिकारी कराडच्या जवळचा...', सोनावणेंचा आणखी एक दावा.