सोपं नसतं महिला नागा साधू होणं, द्याव्या लागतात अनेक कठीण परीक्षा, तब्बल 12 वर्ष करावं लागतं या व्रताचं पालन

पुरुष नागा साधूंबद्दल अजूनही अनेक रहस्य हे रहस्यच आहेत, त्याबद्दल कोणालाही माहिती मिळू शकलेली नाही. त्याच प्रमाणे महिला नागा साधू देखील आपलं संपूर्ण आयुष्य अशाच पद्धतीनं जगतात.

सोपं नसतं महिला नागा साधू होणं, द्याव्या लागतात अनेक कठीण परीक्षा, तब्बल 12 वर्ष करावं लागतं या व्रताचं पालन
Follow us
| Updated on: Dec 09, 2024 | 9:57 PM

प्रयागराजमध्ये पुढील वर्षी महाकुंभ मेळा होणार आहे. कुंभ मेळ्यामध्ये नागा साधू हे मुख्य आकर्षण असतात. तुम्ही देखील कुंभ मेळ्यामध्ये नागा साधूंना पाहीलं असेल, त्यांच्याबद्दल ऐकलं किंवा वाचलं असेल. मात्र महिला देखील नागा साधू असतात याबद्दल फार थोड्या लोकांना माहिती आहे.जसं पुरुष नागा साधू असतात, तशाच महिला देखील नागा साधू असतात. पुरुषांप्रमाणेच महिला देखील नागा साधू बनतात. महिला देखील नागा साधू बनवून आपलं पूर्ण आयुष्य ईश्वराच्या सेवेत समर्पित करतात.

पुरुष नागा साधूंबद्दल अजूनही अनेक रहस्य हे रहस्यच आहेत, त्याबद्दल कोणालाही माहिती मिळू शकलेली नाही. त्याच प्रमाणे महिला नागा साधू देखील आपलं संपूर्ण आयुष्य अशाच पद्धतीनं जगतात. त्यामुळे त्यांची जीवन पद्धती जाणून घेण्याबाबत फक्त कुंभ मेळ्यातच दिसणाऱ्या या महिला नागा साधू नंतर कुठे जातात याबाबत अनेकांच्या मनात प्रचंड कुतुहल असतं. त्यामुळे महिला या नागा साधू कशा बनतात, त्यांचं जीवन कसं असतं, त्यांची दिनचर्या कशी असते याबाबत आज आपण जाणून घेऊयात.

असं म्हटलं जात की महिला नागा साधू बनणं हे सोपं काम नाही. महिला नागा साधू बनण्याची प्रक्रिया ही खूप कठीण असते. महिला नागा साधूंना त्यासाठी खूप कडक तपस्या करावी लागते. महिला नागा साधू या आपलं संपूर्ण आयुष्य देवाच्या सेवेत समर्पित करतात. महिला नागा साधू या कधीही कुंभ मेळाव्या व्यतिरिक्त बाहेरच्या जगात फारशा दिसत नाहीत. महिला नागा साधू या जंगलामध्ये किंवा आखाड्यात राहातात.

या नियमांचं करावं लागत पालन

जर एखाद्या महिलेच्या मनात नागा साधू बनण्याची इच्छा निर्माण झाली तर तिला पहिल्यांदा कमीत कमी 6 ते 12 वर्ष ब्रम्हचर्याचं पालन करावं लागतं.जी महिला हे व्रत पूर्ण करण्यात यशस्वी होते. त्या महिलेला तिच्या गुरु कडून नागा साधू बनण्याची परवानगी मिळते. ज्या महिलेला नागा साधू व्हायचं आहे त्या महिलेच्या आधीच्या जीवनाबाबत तिच्या गुरुकडून संपूर्ण माहिती घेतली जाते. तसेच आपण नागा साधू बनण्यासाठीच्या योग्यतेचे झालो आहोत, याबद्दल देखील या महिलेला आपल्या गुरुला विश्वास द्यावा लागतो. ज्या महिलेला नागा साधू व्हायचे आहे त्या महिलेला आपल्याच हातानं आपलं पिंडदान करावं लागतं.पिंडदान केल्यानंतर या महिलेचा बाहेरील जगाशी संबंध संपूर्णरित्या तुटतो, असं मानलं जातं. पुरुष नागा साधू हे अंगावर कोणतेही वस्त्र घालत नाहीत, मात्र महिला नागा साधूंना अंगावर वस्त्र घालण्याची परवानगी असते, ते आपल्या अंगावर भगवे वस्त्र घालतता. तसेच अंगाला भस्म लावतात.

( डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?
पंतप्रधान मोदी मुंबईत अन् मंत्री धनंजय मुंडे परळीत... नेमकं कारण काय?.
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?
Saif Ali Khan | अभिनेता सैफ अली खानवर चाकू हल्ला, अपडेट्स काय ?.
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?
'...म्हणून सरपंच देशमुख यांची हत्या', CIDन कोर्टात काय केला मोठा दावा?.
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्..
कराडच्या गावात महिलांचं समर्थनार्थ आंदोलन, थेट रस्त्यावर झोपल्या अन्...
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ
वाल्मिक कराडला कोठडी अन् समर्थकांचा कोर्टाबाहेर एकच गोंधळ.
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी
संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोठी अपडेट, कराडला 7 दिवस पोलीस कोठडी.
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा
कराडविरोधात पुरावा नाही, हत्येचा गुन्हा कसा? आरोपीच्या वकिलांचा दावा.
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या...
सुरेश धसांकडून पुन्हा मुन्नीचा उल्लेख, आता म्हणाले, राष्ट्रवादीच्या....
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर
Beed Case : 'ती' वेळ मिळती-जुळती, कराडच्या गुन्ह्यांची कुंडली समोर.
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला
'...अन्यथा इज्जतीचा पंचनामा होईल', धसांचा अजित पवारांना खोचक टोला.