Kartik Maas 2021| कार्तिक मासात 5 नियमांचे पालन करा, रोग – शोक जवळ फिरकणार ही नाही
कार्तिक महिन्याला हिंदू धर्मामध्ये विषेश महत्व देण्यात आले आहे. याच काळात भगवान विष्णू योग निद्रामधून उठतात, या महिन्यात त्यांचा तुळशीशी विवाह होतो. त्यामुळेच कार्तिक महिन्यात तुळशी पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. कार्तिक महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो.
मुंबई : कार्तिक महिन्याला हिंदू धर्मामध्ये विषेश महत्व देण्यात आले आहे. याच काळात भगवान विष्णू योग निद्रामधून उठतात, या महिन्यात त्यांचा तुळशीशी विवाह होतो. त्यामुळेच कार्तिक महिन्यात तुळशी पूजेला विशेष महत्त्व मानले जाते. कार्तिक महिना भगवान विष्णूच्या उपासनेसाठी समर्पित मानला जातो. शास्त्रांमध्ये कार्तिक महिन्याचे वर्णन सर्वोत्तम महिना म्हणून केले गेले आहे.कार्तिक महिन्यात भगवान विष्णू त्याच्या निद्रमुद्रेतून बाहेर पडतात. त्यानंतर त्याचे विवाह तुळशीसोबत करण्यात आला.असे मानले जाते की कार्तिक महिन्यात भगवान विष्णू आणि तुलसीची पूजा करून आणि पुण्यकर्म केल्याने माणसाची सर्व पापे कापली जातात. शास्त्रात सुद्धा तुळशीचे वर्णन मोक्ष असे केले आहे.
कार्तिक महिन्यात या 5 नियमांचे पालन करा
1. रोज संध्याकाळी तुळशीखाली दिवा लावा. असे मानले जाते या काळात तुळशीचा सेवा केल्यास ती सेवा तुळशीच्या मध्यमातून विष्णूला पोहतचे
2. उडीद, मूग, मसूर, हरभरा, मटार, मोहरी इत्यादी कार्तिक महिन्यात खाऊ नयेत. तसेच, लसूण, कांदा, मांसाहारी आणि अल्कोहोलचा वापर सोडून द्या. तसेच जमिनीवर झोपावे. या महिन्यात पूर्णपणे सात्विक जीवन जगले पाहिजे.
3. कार्तिक महिन्यात, इंद्रियवर संयम मिळवणे गरजेचे असते. कारण सात्विक जीवन केवळ शरीरातूनच नव्हे तर मनापासून देखील केले पाहिजे. अशा स्थितीत व्यक्तीने ब्रह्मचर्य पाळले पाहिजे. त्याचबरोबर माणसांवर टीका करणे, निंदा करणे, वाद घालणे, अन्नाशी आसक्ती, जास्त झोप इ. ची सवय सोडली पाहिजे.
4. कार्तिक महिन्यात गंगेत स्नान करणे देखील खूप महत्वाचे मानले जाते. पण जर तुमच्यासाठी हे शक्य नसेल, तर तुम्ही रोज आंघोळ करताना बादलीत थोडे गंगेचे पाणी टाकून स्नान करू शकता.
5. .या काळात भगवान विष्णूची पूजा करावी. यासाठी भगवान विष्णूच्या मंत्रांचा जप, विष्णू सहस्त्रनाम, गीता आणि यज्ञ इत्यादींचे पठण करावे. याशिवाय कार्तिक महिना हा परमार्थाचा महिना मानला जातो. अशा परिस्थितीत तुम्ही तुमच्या क्षमतेनुसार जे काही दान देऊ शकता
(टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…)
इतर बातम्या:
Deepawali 2021 : ग्रहांचे दोष दूर करण्यासाठी या दिवाळीला करा औषध स्नान
या 4 राशीचे लोक असतात शब्दाचे पक्के, आश्वासन देऊन मागे हटणे यांच्या स्वभावात नाही!