कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करा ‘या’ वस्तूंचे दान; लगेचच व्हाल धनवान

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते. दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असली तरी कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दान केल्याने तुम्हाला अनेक फायदे मिळतात.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी करा 'या' वस्तूंचे दान; लगेचच व्हाल धनवान
Follow us
| Updated on: Nov 14, 2024 | 2:16 PM

हिंदू धर्मात पौर्णिमा तिथी अत्यंत शुभ मानली जाते. दर महिन्याला पौर्णिमा तिथी येत असली तरी कार्तिक महिन्याची पौर्णिमा अत्यंत शुभ आणि लाभदायक मानली जाते. कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी देव दीपावलीचा सणही साजरा केला जातो. या दिवशी भगवान विष्णू, माता लक्ष्मी, चंद्र देव, भगवान शिव आणि माता पार्वती यांचीही पूजा केली जाते. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये पूजा आणि स्नानकरण्याबरोबरच दानदेखील करावे. असे मानले जाते की या दिवशी काही गोष्टींचे दान केल्याने व्यक्तीच्या जीवनात सुख-समृद्धी राहते.

कार्तिक पौर्णिमा तिथी

वैदिक दिनदर्शिकेनुसार कार्तिक महिन्याची पौर्णिमा १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ६ वाजून १९ मिनिटांनी सुरू होईल. तर १६ नोव्हेंबरला पहाटे २ वाजून ५८ मिनिटांनी पौर्णिमा संपणार आहे. अशा तऱ्हेने १५ नोव्हेंबरला कार्तिक पौर्णिमा साजरी केली जाणार आहे.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी ‘या’ वस्तूंचे करा दान

आपल्या हिंदू धर्मात अन्नदान हे सर्वोत्तम दान मानले जाते. तसेच कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गरीब आणि गरजूंना अन्नदान करणे अत्यंत शुभ असते. त्याचबरोबर असे मानले जाते कि अन्नपूर्णा माता घरात निवास करते आणि तिचा आशीर्वाद मिळतो. असे केल्याने व्यक्तीच्या घरात अन्नधान्याची कधीच कमतरता भासत नाही,

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी दुधाचे दान करणे अत्यंत शुभ आणि लाभदायक मानले जाते. दूध दान केल्याने कुटुंबातील लोकांच्या व्यवसायात प्रगती होते आणि पैशाची कमतरता कधीही भासत नाही. याशिवाय दूध दान केल्याने देवी लक्ष्मीवर विशेष कृपा प्राप्त होते.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी वस्त्रदान देखील खूप शुभ मानले जाते. शक्य असल्यास जास्तीत जास्त कपडे दान करावेत. यामुळे व्यक्तीची आर्थिक स्थिती मजबूत होते आणि त्याचा दुहेरी फायदा होतो. त्याचबरोबर समाजात मानसन्मानही मिळतो.

कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी गुळाचे दान देखील अत्यंत लाभदायक मानले जाते. गुळाचे दान केल्याने भगवान विष्णू प्रसन्न होतात. गुळाच्या दानाने दारिद्रय दूर होते आणि घरात सुख-समृद्धी राहते. तसेच देवी लक्ष्मीच्या कृपेने जीवनात पैशाची कमतरता भासत नाही.

कार्तिक पौर्णिमेला तिळाचे दान करावे. कारण तिळाचा संबंध भगवान शिव आणि शनिदेव यांच्याशी आहे. या दिवशी तिळाचे दान केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात. याशिवाय शनिदोषापासूनही मुक्तता मिळते.

भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?
भुजबळांची नाराजी,भाजप प्रवेशाचा गेमप्लॅन अन्... दमानिया काय म्हणाल्या?.
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच....
भिवंडी हादरली....निर्जनस्थळी अल्पवयीन मुलीची हत्या, मृतदेह आढळताच.....
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्...
नातवासोबत एकनाथ शिंदेंचा शेतात फेरफटका, शेतीकामात रमले अन्....
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं
शिरसाट मंत्री होताच अॅक्शनमोडवर,कॅमेऱ्यासमोरच महिला अधिकाऱ्यांना झापलं.
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी
'तुमचा संतोष देशमुख करू...', तानाजी सावंत यांच्या दोन पुतण्यांना धमकी.
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल
धनंजय मुंडे अन् वाल्मिक कराडचे संबंध काय? अंजली दमानियांचा हल्लाबोल.
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी
मुख्यमंत्री किंवा दादांनी बीडच पालकमंत्रिपद स्वीकाराव, कोणी केली मागणी.
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार
हिवाळ्यात पावसाळा? 26-27 डिसेंबरला अवकाळी पाऊस, 'या' ठिकाणी कोसळणार.
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना
सिगारेट बट्सपासून 100 कोटींचा व्यवसाय, तरुणाची भन्नाट कल्पना.
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत
बंगल्याच्या वाटपावरून महायुतीत धुसफूस? शिवसेनेच्या मंत्र्यांकडून खंत.