Kawad yatra 2022: या दिवशी सुरू होत आहे श्रावणातील कावड यात्रा; तिथी आणि पौराणिक महत्त्व
यंदा 14 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. त्यामुळे शिवभक्तांसाठी सावन महिना (Shrawan 2022) खूप खास आहे. या महिन्यात केलेली शिवाची पूजा अत्यंत लाभदायक असते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. भगवान महादेवाच्या कृपेने मोठमोठी संकटही दूर होतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने व्रत केल्यास त्याला भगवान शंकराची कृपा प्राप्त […]
यंदा 14 जुलैपासून श्रावण महिना सुरू होत आहे. हा महिना भगवान शिवाला समर्पित मानला जातो. त्यामुळे शिवभक्तांसाठी सावन महिना (Shrawan 2022) खूप खास आहे. या महिन्यात केलेली शिवाची पूजा अत्यंत लाभदायक असते, अशी धार्मिक श्रद्धा आहे. भगवान महादेवाच्या कृपेने मोठमोठी संकटही दूर होतात. श्रावण महिन्यातील प्रत्येक सोमवारी भक्तिभावाने व्रत केल्यास त्याला भगवान शंकराची कृपा प्राप्त होती आणि भक्तांचे सर्व दुःख दूर होतात, अशी मान्यता आहे. भोलेनाथाचा आशीर्वाद घेण्यासाठी भाविक श्रावण महिन्यात कावड यात्रा (Kawad yatra 2022) काढतात. यावेळी 14 जुलैपासून कावड यात्रा सुरू होणार आहे. कावड यात्रा कधी सुरू झाली तसेच तिचे महत्त्व आणि इतिहास काय आहे ते जाणून घेऊया.
काय असते कावड यात्रा-
पवित्र अशा श्रावण महिन्यात भगवान शिवाचे भक्त कावड यात्रा आयोजित करतात. ज्यामध्ये शेकडो भाविक भगवान शंकराचा जलाभिषेक करण्यासाठी हरिद्वार आणि गंगोत्री धाम येथे पायी प्रवास करतात. हरिद्वार आणि गंगोत्री सारख्या पवित्र तीर्थक्षेत्रांचे भरलेले पाणी भगवान शिवाला अर्पण केले जाते. ज्यांना ही यात्रा पायी करणे शक्य नाही ते भाविक वाहनाने प्रवास करतात.
यात्रेची पौराणिक कथा-
पौराणिक कथेनुसार अमृत कलश मिळविण्यासाठी समुद्रमंथन केले असता त्यातून 14 रत्ने प्राप्त झाली. त्या समुद्रमंथनातून हलहल विषही उत्पन्न झाले होते. कोणीही देव ते प्यायला तयार नव्हते, पण ते विष भगवान शिवाने प्यायले जे त्यांच्या घशातून खाली उतरले नाही. त्यामुळे त्याचा घसा निळा झाला. त्यामुळे त्यांना नीलकंठ हे नाव पडले. धार्मिक श्रद्धा अशी आहे की रावण हा भगवान शिवाचा परम भक्त होता आणि तो भगवान शंकराचा जलाभिषेक करत असे, त्यामुळे भोलेनाथला विषाच्या दाहापासून आराम मिळत असे. भगवान शिव अत्यंत दयाळू आहेत. त्यांना दयेचा महासागर म्हणतात. असे मानले जाते की भोलेनाथ आपल्या भक्तांच्या भक्तीने लवकर प्रसन्न होतात. जर एखाद्याने खऱ्या भक्तीने त्यांच्या पिंडीवर तांब्याभर जल जरी अर्पण केले तरी महादेव प्रसन्न होतात आणि भक्ताची इच्छा पूर्ण करतात. यामुळेच दरवर्षी श्रावण महिन्यात शिवभक्तांकडून कावड यात्रा काढली जाते.
(वरील माहिती उपलबध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही,तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)