Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व, उपासना करण्याची पद्धत जाणून घ्या !

हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला परशुराम जयंती साजरी केली जाते.

Parshuram Jayanti 2021 : परशुराम जयंती कधी आहे? शुभ मुहूर्त, महत्त्व, उपासना करण्याची पद्धत जाणून घ्या !
परशुराम जयंती
Follow us
| Updated on: May 09, 2021 | 11:21 AM

मुंबई : हिंदू पंचांगानुसार वैशाख महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या तृतीया तिथीला परशुराम जयंती साजरी केली जाते. यावेळी परशुराम जयंती 14 मे 2021 रोजी आहे. भगवान परशुरामांचा जन्म त्रेता युगात ऋषि जमदग्नि आणि आई रेणुका यांच्यात घरी झाला. भगवान परशुरामांचा जन्म हा भार्गव वंशातील भगवान विष्णूचा सहावा अवतार आहे. या दिवशी व्रत ठेऊन परशुरामांची पूजा केली जाते. चला जाणून घेऊयात परशुराम जयंतीच्या शुभ मुहूर्त, उपासना करण्याची पद्धत आणि महत्त्व (know About parshuram jayanti Importance Story)

परशुराम जयंतीचा शुभ मुहूर्त वैशाख शुक्ल पक्ष तृतीया तिथीपासून सुरू होईल – 14 मे 2021 शुक्रवारी सकाळी 5.40 वाजता वैशाख शुक्ल पक्ष तृतीया तिथी संपेल – 15 मे 2021 शनिवारी सकाळी 08 वाजता

परशुराम जयंतीचे महत्त्व हिंदू धर्माप्रमाणे भगवान परशुरामांचा जन्म ब्राह्मण आणि ऋषिंवर होणारे अत्याचार संपवण्यासाठी झाला होता. असे मानले जाते की, परशुराम जयंतीच्या दिवशी पूजा केल्यास शुभ परिणाम प्राप्त होतात. या दिवशी दान देण्याचे विशेष महत्त्व आहे. ज्या लोकांना मुले नाहीत त्यांनी विशेष करून हे उपवास केला पाहिजे. या दिवशी भगवान विष्णूसोबतच भगवान परशुराम यांचाही आशिर्वाद मिळतो.

वैशाख महिन्याचे महत्त्व

नारदजींच्या म्हणण्यानुसार, भगवान ब्रह्मांनी या महिन्याला सर्वोत्तम महिना सांगितला आहे. या महिन्यात स्नान, दान, यज्ञ, त्याग आणि तपस्या केल्याने सर्व इच्छा पूर्ण होतात. या महिन्यात स्नान करुन आणि दान केल्याने सर्व पाप दूर होतात.

अशी पूजा करा

-हिंदू धर्मात परशुराम जयंती दिन खूप महत्वाचा आहे. या दिवशी सूर्योदयापूर्वी नदीत स्नान करावे. तुमच्या आजूबाजूला नदी नसल्यास पाण्याच्या बादलीत थोडे गंगा जल घालून स्नान करा.

-यानंतर, धूप दीप लावून उपवास करण्याचा संकल्प करा.

-भगवान विष्णूला चंदन लावून परमेश्वराचे नमन करा, मग परमेश्वराला नैवेद्य दाखवा.

-जर आपल्याला शक्य असेल तर परशुरामांच्या मंदिरात जाऊन दर्शन घ्या.

-जे लोक या दिवशी उपवास करतात त्यांना कोणत्याही प्रकारचे अन्न यादिवशी खाऊ नये.

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या : 

जेव्हा भगवान नरसिंहाला शांत करण्यासाठी महादेवाने घेतला सर्वेश्वर अवतार, जाणून घ्या नेमकं काय घडले?

‘रामायणा’त रावणाच्या पायाखाली निळ्या रंगाचा ‘तो’ व्यक्ती नेमका कोण? जाणून घ्या उत्तर…

(know About Parshuram Jayanti Importance Story)

बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप
बीडचे निलंबित पोलीस उपनिरीक्षक रणजित कासलेंचे मुंडेंवर गंभीर आरोप.
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य
कसा झाला दिशाचा मृत्यू? पोस्टमार्टम रिपोर्टमधून समोर आलं खळबळजनक सत्य.
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत
सत्य परेशान हो सकता है, पराजित नहीं - अरविंद सावंत.
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य
'संभाजीराजे बोलले ते 100% चूक', वाघ्यासंदर्भात गुरूजींचं मोठं वक्तव्य.
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
गीतेचा उपदेश याच संविधानात दाखवलेला आहे - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस.
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्...
आव्हाड-राणे विधानभवनाच्या पायऱ्यांवर आमने-सामने, मग हस्तांदोलन अन्....
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप
'...त्याला महाराष्ट्र बाहेर हाकला', कोणत्या मुद्द्यावरून कडूंचा संताप.
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज
वाल्मिक कराडच्या वकिलांनी आरोप मुक्तीसाठी केला अर्ज.
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार
मुंबईत येत्या शनिवारपासून उकाडा तर 'या' महिन्यात धुव्वाधार बरसणार.
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी
'ठाणे, रिक्षा, चश्मा..', पुण्यात कुणाल कामराच्या समर्थनार्थ बॅनरबाजी.