Remedies | खूप प्रयत्नांनंतरही नोकरी मिळत नाही? ज्योतिशास्त्राने सुचवलेले 5 उपाय
कोरोना काळामध्ये आपल्या पैकी अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळल्या. सध्याच्या काळात रोजगार मिळणे किंवा त्यात यश मिळवणे हे सोपे काम नाही. त्यासाठी हे काही उपाय
मुंबई : कोरोना काळामध्ये आपल्या पैकी अनेकांच्या नोकऱ्या गेलेल्या आपल्याला पाहायला मिळल्या. सध्याच्या काळात रोजगार मिळणे किंवा त्यात यश मिळवणे हे सोपे काम नाही. अनेक वेळा नोकरी शोधण्याच्या प्रयत्नात असलेल्या लोकांना सर्व प्रकारच्या अडचणींना तोंड द्यावे लागते. तुम्हालाही अशीच काही समस्या असेल तर तुम्ही ज्योतिषशास्त्राचे हे उपाय एकदा करून बघा.
नारळ
जर तुम्हाला तुमच्या नोकरीची फार चिंता वाटत असेल तर गुरुवारी कोरडे नारळ घेऊन पवित्र नदी किंवा कालव्यात टाका. यासोबतच कुत्र्यांना अन्नदान करा.
पक्ष्यांना अन्नदान करा
नोकरीचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी पक्ष्यांना रोज सकाळी सात प्रकारची धान्ये खायला घाला. असे मानले जाते की पक्ष्यांना खायला देण्याची ही पद्धत केल्याने लवकरच नोकरी किंवा व्यवसायात अपेक्षित यश मिळते. त्यात प्रमाणे मुक्या जनावरांना अन्न देखाल मिळेत.
गाईच्या भाकरीचा चारा द्या
जर तुम्हाला तुमच्या नोकरीत काही अडचणी येत असतील तर रोज उगवत्या सूर्याला अर्घ्य द्यावे आणि रोज काळ्या किंवा पिवळ्या गाईला भाकरी खाऊ घालावी. घरातील स्वयंपाकघरात बनवलेली पहिली भाकरीच गायीला खायला द्या. हा उपाय केल्याने तुम्हाला लवकरच सकारात्मक परिणाम दिसून येतील.
तुळशीची पूजा उपाय
जर तुम्हाला तुमच्या नोकरीची खूप काळजी वाटत असेल तर या समस्येवर उपाय मिळवण्यासाठी कोणत्याही बुधवारी घरात तुळशीचे रोप आणा आणि कुंडीत किंवा बागेत लावा. रोप लावताना एक रुपयाचे नाणे मातीत दाबावे आणि त्यानंतर रोज तुळशीच्या रोपाची पूजा करावी.
शिवाची उपासना करण्याचा उपाय
सनातन परंपरेत रोजगार आणि संपत्तीची देवी लक्ष्मी प्राप्तीसाठी अनेक मार्ग सांगण्यात आले आहेत. भगवान शिवाशी संबंधित या सोप्या उपायाने तुम्ही या दिशेने केलेल्या प्रयत्नांमध्ये यश मिळवू शकता. यासाठी तुम्हाला रोज एखाद्या शिवलिंगावर जाऊन जलाभिषेकासह शिवलिंगाला तांदूळ अर्पण करा.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या :
Remedy for evil eye | कोणतंच काम होत नाहीय?, कामात अडथळे येतात ? मग हे उपाय करून पाहा
Vastu Tips | बक्कळ पैसा हवाय ? मग वास्तुशास्त्रात चमत्कारी मानले जाणाऱ्या कासवाची योग्य दिशा निवडा
Char Dham | अद्भुत! उत्तराखंडमधील चार धामासंबंधित काही रंजक गोष्टी