Astro Remedy | गणपतीला प्रिय असलेल्या दुर्वाचे चमत्कारिक उपाय, दूर होतील सर्व दु:ख
हिंदू परंपरेत दुर्वांना खूप जास्त महत्त्व आहे. दुर्वा या शब्दाचा उत्पत्ती 'दुहू' आणि 'अवम' या दोन शब्दांपासून झाली आहे. दुर्वामध्ये तीन भाग असतात, जे गणपती, शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जातात.
मुंबई : हिंदू परंपरेत दुर्वांना खूप जास्त महत्त्व आहे. दुर्वा या शब्दाचा उत्पत्ती ‘दुहू’ आणि ‘अवम’ या दोन शब्दांपासून झाली आहे. दुर्वामध्ये तीन भाग असतात, जे गणपती, शक्ती आणि शिव यांचे प्रतीक मानले जातात. दुर्वांची उगम समुद्रमंथनाच्या वेळी झाला असे म्हटले जाते. समुद्रमंथनानंतर जेव्हा असुरांकडून अमृत घेऊन जात होते, तेव्हा त्याचे काही थेंब दुर्वावर पडले. त्यामुळे ते पवित्र आणि अमर झाले आणि कधीही नाश पावत नाही. दुर्वांना अमृता, अनंता, महाऔषधी म्हणून ओळखली जाते. दुर्वा केवळ माणसांसाठीच नाही तर प्राण्यांना सुद्धा प्रिय असतात.
शुभ कार्यात वापर
हिंदू परंपरेत कोणत्याही शुभ कार्यात दुर्वा वापरल्या जात नाहीत. फक्त गणपतीच्या पूजेमध्ये दुर्वा वापरतात. दुर्वाशिवाय गणपतीची पूजा अपूर्ण मानली जाते. लग्नाच्या शुभ विधींमध्ये दुर्वांचा वापर केला जातो.
बुध ग्रहाच्या उत्तम उपाय
जर तुमच्या कुंडलीत बुध ग्रह कमजोर असेल तर दर बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा. हा उपाय केल्याने बुध ग्रहाशी संबंधित अडथळे दूर होतात. त्याचप्रमाणे जर तुम्ही बुधवारी गाईला हिरवे गवत खाऊ घातले तर त्यामुळे देखील घरातील कलह दूर होतात.
दुर्वावांचा उपाय
जर तुम्ही आर्थिक संकटातून जात असाल, तर गणपतीच्या पूजेमध्ये पाच दूर्वामध्ये 11 गाठी अर्पण करा आणि ते करताना ‘श्री गणेशाय नमः दुर्वांकुरण समर्पयामि’ या मंत्राचा जप करा.हा उपाय केल्याने तुमचे सर्व अडथळे दूर होतील आणि तुम्हाला सुख-समृद्धी मिळेल.
(येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
इतर बातम्या :
Astro tips for house | घर बांधताय? मग वास्तुशास्त्राचे 5 नियम नक्की वाचा, भरभराट नक्की होणार