मुंबई : अवकाशातील प्रत्येक ग्रह खूप महत्त्वाचा असतो. या सर्वांचा परिणाम माणसाच्या आयुष्यावर होत असतो अशी मान्यता आहे. अशातच ज्योतिषशास्त्रानुसार संपूर्ण जगाच्या ऊर्जेचे केंद्र असलेल्या भगवान सूर्याची उपासना केल्याने जीवनाशी संबंधित सर्व संकटे दूर होतातच शिवाय सुख, समृद्धी, सौभाग्य आणि आरोग्यही मिळते अशी मान्यता आहे. ज्योतिषशास्त्रात सूर्याला खूप महत्त्व प्राप्त आहे. जर आपण मनोभावाना सूर्याची आराधना केली तर सूर्याच्या कृपेना आपल्याला आयुष्यात सर्व काही मिळाते. पण या उपासनेमध्ये कोणताही प्रकारची कमतरता राहू नये यासाठी पुढील उपाय योजना नक्की करा.
सूर्य उपासनेचा उत्तम उपाय
जर तुम्हाला कुंडलीत सूर्यदेवाची शुभ स्थळी नसेल आणि तुम्हाला तुमच्या कामात सर्व प्रकारच्या अडथळ्यांचा सामना करावा लागतो. असेल वेळी शत्रू तुमच्यावर वर्चस्व गाजवू शकतील. यावर उपाय म्हणून रोज सकाळी सूर्यदेवाला अर्घ्य अर्पण केल्यानंतर पूर्ण भक्तिभावाने आदित्य हृदय स्तोत्राचे पठण करावे. आदित्य हृदय स्तोत्राचे पठण केल्याने यश लवकर प्राप्त होते. भगवान सूर्याच्या कृपेनेने जीवनात लवकरच सकारात्मक बदल पाहायला मिळतात.
सूर्य देवाल प्रसन्न करण्यासाठीचे उपाय
सूर्याची मंगलमयता प्राप्त करण्यासाठी दररोज सूर्योदयापूर्वी पाण्यातमध्ये लाल फुलं टाकून पूर्व दिशेने सूर्याला अर्घ्य द्यावे.
काही कारणास्तव सकाळी सूर्योदयापूर्वी उठता येत नसेल तर सूर्योदयानंतर तांब्याच्या भांड्यात अक्षता ठेवून अर्घ्य वाहावे
सूर्यदेवाला प्रसन्न करण्यासाठी कोणत्याही गरजू व्यक्तीना गूळ, गहू, लाल वस्त्र, तांबे इत्यादी दान करावे.
नेहमी आपल्या वडिलांचा आदर करा आणि त्यांना प्रसन्न ठेवा.
संबंधित बातम्या :
Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील
PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी