Shankh Remedies : सुख-समृद्धीच्या शोधात असाल तर शंखशी संबंधित हे उपाय निश्चितपणे करा
वास्तुशास्त्रात अनेक पवित्र गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवल्याने घराची भरभराट होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये शंख असते. पूजेमध्ये वापरण्यात येणारे शंख हे घराच्या प्रगतीसाठी शुभ मानले जाते.
मुंबई : वास्तुशास्त्रात अनेक पवित्र गोष्टी आहेत, ज्या घरात ठेवल्याने घराची भरभराट होते. आपल्यापैकी बऱ्याच जणांच्या घरामध्ये शंख असते. पूजेमध्ये वापरण्यात येणारे शंख हे घराच्या प्रगतीसाठी शुभ मानले जाते. शंखाच्या पवित्र नादाने आयुष्यातील सर्व संकटे दूर होतात आणि जीवनात सर्व काही शुभ होते.
?समुद्रमंथनातून झाला जन्म
देवपूजेत वापरण्यात येणारा शंख अत्यंत पवित्र मानला जातो. जर तुम्ही योग्य निरीक्षण केले असेल तर हिंदू धर्माशी संबंधित सर्व देवी-देवतांनी शंख आपल्या हातात धरला आहे. शंखाशिवाय भगवान विष्णूची पूजा अपूर्ण मानली जाते. असे म्हणतात की, ज्या घरात रोज पूजेत शंख वाजविला जातो, त्या घरातून सर्व दुःख, दारिद्र्य आणि अडथळे दूर होतात आणि सुख, समृद्धी आणि सौभाग्य यांचे निवासस्थान राहते.
असे मानले जाते की समुद्रमंथनाच्या वेळी बाहेर पडलेल्या 14 रत्नांपासून शंखाची उत्पत्ती झाली. यामुळेच याला रत्न असेही म्हणतात, जे केवळ खेळण्यासाठीच नाही तर परिधान करण्यासाठी देखील वापरले जाते. माता लक्ष्मीचाही जन्म समुद्रमंथनातून झाला असल्याने शंख हा लक्ष्मीचा भाऊ मानला जातो. यामुळेच ज्या घरात शंख असतो, त्या घरात लक्ष्मीचा वास नेहमी राहतो. चला जाणून घेऊया शंखशी संबंधित काही सोपे आणि प्रभावी उपाय.
?लक्ष्मीचा आशीर्वाद मिळावा
जर तुम्ही आर्थिक अडचणीतून जात असाल आणि खूप प्रयत्न करूनही धनदेवतेचा आशीर्वाद मिळत नसेल तर तुम्ही घरामध्ये दक्षिणावर्ती शंख स्थापित करून त्याची रोज पूजा करावी. असे मानले जाते की ज्या घरात दक्षिणावर्ती शंख राहतो त्या घरात लक्ष्मीचा स्थायी वास असतो. हा उपाय केल्याने तुम्हाला कधीही संकटांना समोरे जावे लागणार नाही.
?दुष्ट आत्म्यांना दूर ठेवण्यासाठी
शंखाचा आवाज खूप शुभ आहे. असे मानले जाते की ज्या घरात शंख आहे, तिथे वरच्या बाधा किंवा भूत वगैरे नसते. दररोज शंख फुंकल्याने दारिद्र्य आणि दुःख दूर होतात.
?दीर्घायुष्य आणि आरोग्यासाठी
असे मानले जाते की शंख फुंकल्याने फुफ्फुस मजबूत होतात. त्याचप्रमाणे शंख फुंकल्याने योगाच्या तीन क्रिया – पूरक, कुंभक आणि प्राणायाम एकाच वेळी पूर्ण होतात. त्यामुळे असे मानले जाते की जो शंख फुंकतो त्याला दीर्घायुष्य लाभते.
(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांची आवड लक्षात घेऊन ती येथे सादर केली आहे.)
इतर बातम्या
Alangudi Jupiter Temple | चमत्कारांनी भरलंय अलंगुडीचे बृहस्पती मंदिर, तेथील रहस्य काय?
मार्गशीर्ष महिन्यातील अमावास्येलाच होणार वर्षाचे शेवटचे सूर्यग्रहण, या दिवशी 3 गोष्टी कराच
Last Solar Eclipse of 2021 | सूर्य ग्रहण काळात गर्भवती महिलांनो ‘या’ गोष्टी चुकूनही करू नका