Remedy for happy married life | सुखी वैवाहिक जीवनाच्या शोधात आहात, तर हे उपाय नक्की करुन पाहा
सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतं. पण ही गोष्ट नेहमीच साध्य होत नाही. हिंदू पुराणात यावर काही उपाय सांगण्यात आले आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय. सुखी आनंदी वैवाहिक जीवनासाठी खाली दिलेले उपाय नक्की करा.
मुंबई : सुखी वैवाहिक जीवनासाठी प्रत्येक जण प्रयत्न करत असतं. पण ही गोष्ट नेहमीच साध्य होत नाही. हिंदू पुराणात यावर काही उपाय सांगण्यात आले आहेत चला तर मग जाणून घेऊयात कोणते आहेत हे उपाय. सुखी आनंदी वैवाहिक जीवनासाठी खाली दिलेले उपाय नक्की करा.
सुखी वैवाहिक जीवनासाठी दररोज केळीच्या झाडाची पूजा करावी आणि त्याचवेळी वृद्ध महिलेचा विशेष आशीर्वाद घ्यावा. या उपायाने तुम्हाला वैवाहिक सुख आणि सौभाग्य दोन्ही मिळेल.
असे मानले जाते की, मुलीच्या लग्नानंतर निरोपाच्या वेळी चिमूटभर हळद, एक रुपयाचे नाणे आणि गंगाजल पाण्याच्या भांड्यात टाकून ते वधूच्या डोक्यावर अकरा वेळा ओधून तिच्यासमोर ठेवले तर तिचे वैवाहिक जीवन सदैव आनंदी राहते.
लग्नाच्या चार दिवस अगोदर सात गाठी हळद, सात पितळेची नाणी, थोडेसे केशर, गूळ, हरभरा डाळ इत्यादी पिवळ्या कपड्यात बांधून मुलीला सासरच्या घरी ठेवल्यास मुलीचे वैवाहिक जीवन सुखी होते.
असे मानले जाते की जर एखाद्या विवाहित स्त्रीने दररोज दुर्गा चालिसाचा पाठ केला आणि माँ दुर्गेच्या 108 नावांचा जप केला तर तिचे वैवाहिक जीवन सुखी राहते.
जर एखाद्या स्त्रीने हातात पिवळ्या बांगड्या घातल्या तर त्याच्या शुभ प्रभावाने वैवाहिक जीवनातील अडचणी दूर होतात आणि परस्पर प्रेम आबादीत राहते.
तुमच्या वैवाहिक जीवनात कोणत्याही प्रकारची अडचण येत असेल आणि अनेक प्रयत्न करूनही तुमचे नाते सुधारत नसेल, तर तुम्ही लाल कापडाच्या पिशवीत पिवळी मोहरी असलेले दोन ऊर्जावान गोमती चक्र ठेवा. हा उपाय केल्याने वैवाहिक जीवनात प्रेम आणि विश्वास वाढतो.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
संबंधित बातम्या :
Easy Vastu Tips | हे सोपे उपाय करा, घरातील वास्तू दोष दूर होतील
PHOTO | Vastu Tips : वास्तुशास्त्रानुसार घरात लावा ‘ही’ 5 झाडे, मिळेल सुख-समृद्धी