Shri Ram Raksha Stotra : जीवनातील प्रत्येक आपत्ती, दु:खातून वाचवतो श्री राम रक्षा स्तोत्र, जाणून घ्या याचा उपाय
भगवान श्री रामाच्या (Shri Ram) उपासनेत त्यांच्या महिमेची स्तुती करणाऱ्यांसाठी श्री राम रक्षा स्तोत्र (Shri Ram Raksha Stotra) हे एखाद्या ढालसारखे कार्य करतात. याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते.
मुंबई : भगवान श्री रामाच्या (Shri Ram) उपासनेत त्यांच्या महिमेची स्तुती करणाऱ्यांसाठी श्री राम रक्षा स्तोत्र (Shri Ram Raksha Stotra) हे एखाद्या ढालसारखे कार्य करतात. याचे रोज पठण केल्याने व्यक्तीच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात आणि त्याला सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. असे मानले जाते की जो कोणी पूर्ण भक्ती आणि श्रद्धेने श्री रामरक्षा स्तोत्राचा पठण करतो, त्याला भगवान रामाच्या कृपेने आणि आशीर्वादाने मोठी संकटे आणि आजार देखील स्पर्श करु शकत नाहीत.
हे स्तोत्र बुधकौशिक ऋषींनी लिहिले
श्री रामरक्षा स्तोत्रात 38 श्लोक आहेत, त्यापैकी बहुतेक अनुष्टुप् श्लोकांमध्ये आहेत आणि त्यामुळे ते लवकर लक्षात राहतात. या स्तोत्राची कीलक श्री हनुमानजी आहेत आणि हे चमत्कारिक स्तोत्र बुधकौशिक ऋषींकडून प्राप्त झाले आहे. असे मानले जाते की, भगवान शंकराने त्यांना हे कल्याणकारी स्तोत्र स्वप्नात उपदेशाच्या रुपात सांगितले होते.
रामरक्षा स्तोत्राचे चमत्कारिक फायदे
असे मानले जाते की रामरक्षा स्तोत्र सिद्ध केल्यावर खूप फायदा होतो. उदाहरणार्थ, त्याच्या शुभ प्रभावामुळे, एखाद्या व्यक्तीला आयुष्यात कधीही ज्ञात अज्ञात शत्रूची भीती वाटत नाही. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सिद्ध झालेल्या रामरक्षा स्तोत्राचा फायदा दुसर्या व्यक्तीला संकटातून सोडवण्यासाठी वापरला जाऊ शकतो. असे मानले जाते की दररोज श्री राम रक्षा स्तोत्राचे पठण केल्याने साधक सर्व प्रकारचे अपघात, आकस्मिक संकट आणि इतर सर्व प्रकारच्या संकटांपासून सुरक्षित राहतो.
श्री रामरक्षा स्तोत्रासाठी निश्चित उपाय
तुमच्यावर अचानक एखादे मोठे संकट आले तर त्यावर मात करण्यासाठी श्री रामरक्षा स्तोत्राचा उपाय खूप फायदेशीर ठरेल. अचानक आलेल्या संकटावर मात करण्यासाठी 31 दिवसांत 3,100 श्री रामरक्षा स्तोत्राचे पठण करा किंवा ब्राह्मणाकडून करवून घ्या. यासाठी दररोज 111 पाठ करावे लागणार आहेत. हा उपाय करत असताना शेवटच्या दिवशी या स्तोत्राचा प्रत्येक श्लोकाचे पठण करुन हवन करा. हवनानंतर कन्या आणि बटूक खाऊ घाला आणि योग्यतेनुसार दक्षिणा देऊन त्यांना निरोप द्या. श्री रामरक्षा स्तोत्राचा हा उपाय केल्याने सर्व संकटे दूर होऊन सुख-समृद्धी प्राप्त होते.
Chanakya Niti | हातात पैसा टिकत नाही, देवी लक्ष्मीला प्रसन्न ठेवायचंय? , तर चाणक्य नीतीमध्ये सांगितलेल्या 3 गोष्टी आत्मसात कराhttps://t.co/ilqwuiXIiw#AcharyaChanakya | #ChanakyaNiti | #money | #godluxmi
— TV9 Marathi (@TV9Marathi) November 17, 2021
टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…
संबंधित बातम्या :