Paush Purnima 2022 | जाणून घ्या पौष पौर्णिमेचे महत्व, पूजा विधी आणि मुहूर्त
पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पुजा केली जाते. असे केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया पौष महिन्याची पौर्णिमा तिथी, पूजा पद्धती
मुंबई : प्रत्येक महिन्याचे दोन भाग करण्यात आले आहेत. प्रत्येक महिन्यात (Month) 15 दिवसांचे दोन भाग असतात. त्यातील पहिल्या भागास शुक्ल पक्ष आणि त्यानंतरच्या भागास कृष्ण पक्ष म्हणतात. शुक्ल पक्षाच्या शेवटच्या दिवसाला पौर्णिमा (Purnima)असे संबोधले जाते. धर्मग्रंथात शुक्ल पक्षाला देवांचा काळ म्हटले आहे. दुसरीकडे, पौर्णिमा दिवस विशेष मानला जातो. या दिवशी चंद्रासोबत भगवान विष्णूची पूजा केली जाते. याशिवाय स्नान आणि दान यांचे विशेष महत्त्व आहे. पौष महिन्यात (Paush Month) येणाऱ्या पौर्णिमेला शाकंभरी पौर्णिमा म्हटलं जातं. संपूर्ण जगाची अधिष्ठात्री असणार्या दुर्गेचं एक रूप म्हणजे शाकंभरी देवी होय. देवीच्या दुर्गेच्या (Durga)रुपाला तिला हजारो डोळे होते म्हणून शाकंभरी असे नाव पडलं.पौष पौर्णिमेला शाकंभरी पैर्णिमा देखील म्हटले जाते. या दिवशी देवीच्या शक्ती पिठांवर देवीचा जागर घातला जातो.
पौष पौर्णिमेला (Paush Purnima 2022) पौर्णमासी देखील म्हटले जाते. हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. पौष महिन्याची पौर्णिमा ही वर्षातील पहिली पौर्णिमा असते. यामुळेच या पोर्णिमेला खूप महत्त्व प्राप्त झाले आहे. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा विधीनुसार केली जाते. पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मी यांचा पुजा केली जाते. असे केल्यास आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होतात अशी मान्यता आहे. चला तर मग जाणून घेऊया पौष महिन्याची पौर्णिमा तिथी, पूजा पद्धती.
पूजेची वेळ- पौर्णिमा तिथी सुरू होईल – 17 जानेवारी 2022 सकाळी 03:18 वाजता पौर्णिमा तिथी समाप्त होईल – 18 जानेवारी 2022 सकाळी 05:17 वाजता
पौष पौर्णिमा स्नान- धार्मिक मान्यतेनुसार माघ महिन्यातील दुसरे प्रमुख स्नान पौष पौर्णिमा हिंदू कॅलेंडरनुसार, पौर्णिमा 16 जानेवारी, रविवारी दुपारी 2:40 वाजता असेल, जी 17 जानेवारीला पहाटे 4:30 पर्यंत राहील. त्यामुळे 17 तारखेला पौर्णिमा साजरी होणार असून या दिवशी स्नान करणे शुभ मानले जाईल.
पौष महिन्याच्या पूजेची पद्धत- पौर्णिमेच्या दिवशी सकाळी ब्रह्म मुहूर्तावर स्नान करावे. या दिवशी गंगेत स्नान करण्याचे विशेष महत्त्व आहे. गंगेत स्नान करता येत नसेल तर बादलीतच गंगाजल टाकून स्नान करावे आणि देवाचे स्मरण करावे. त्यानंतर भगवान विष्णूसमोर दीप प्रज्वलित करून उपासनेचे व्रत घ्या आणि उपासनेचे स्मरण करा. भगवान विष्णूसह देवी लक्ष्मीची पूजा करा. नंतर शक्तीनुसार भगवंताला भोग अर्पण करा, काही झाले नाही तर तुळशीलाच अर्पण करा. शेवटी भगवान विष्णू आणि देवी लक्ष्मीची पूजा करा. यानंतर कुवतीनुसार गरजूंना दान करा. यानंतर तुमच्या मनोकामना पूर्ण करण्यासाठी देवाला प्रार्थना करा.
टीप- येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, यासाठी कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. सर्वसामान्यांचे हित लक्षात घेऊन ते येथे मांडले आहे.
Kalubai | काळूबाईच्या नावानं चांगभलं! आज होणार मांढरदेवच्या काळूबाईचा जागर , जाणून घ्या रंजक माहिती
Gupt Navratri 2022 | माघ गुप्त नवरात्र म्हणजे नक्की काय? जाणून घ्या तिचे महत्त्व