Lord Vishnu Birth | भगवान विष्णूंचा जन्म कसा झाला, गुरुवारी नारायणाची पूजा कशी करावी जाणून घ्या

हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवार हा दिवस खूप खास मानला जातो. मान्यता आहे की भगवान विष्णूची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्ती जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्त होतो

Lord Vishnu Birth | भगवान विष्णूंचा जन्म कसा झाला, गुरुवारी नारायणाची पूजा कशी करावी जाणून घ्या
lord vishnu
Follow us
| Updated on: Jul 15, 2021 | 3:01 PM

मुंबई : हिंदू धर्मात भगवान विष्णूच्या पूजेसाठी गुरुवार हा दिवस खूप खास मानला जातो. मान्यता आहे की भगवान विष्णूची खऱ्या मनाने पूजा करणाऱ्या भक्तांच्या सर्व इच्छा पूर्ण होतात. हिंदू धर्मग्रंथानुसार गुरुवारी भगवान विष्णूची पूजा केल्यास व्यक्ती जीवनातील सर्व त्रासांपासून मुक्त होतो (Know The Story Behind Lord Vishnu Birth And How To Worship Vishnu).

भगवान विष्णूला जगाचे पालनकर्ता मानले जाते. मान्यता आहे की जर भाविकांनी गुरुवारी विष्णूची विधीवत पूजा केली आणि गुरुवारी काही उपाय केले तर त्यांच्या जीवनात कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवत नाही. भगवान विष्णूची उत्पत्ती कशी झाली आणि त्यांची पूजा कशी करावी हे जाणून घ्या –

विष्णूची पूजा कशी करावी?

? सर्वप्रथम गुरुवारी सूर्योदय होण्यापूर्वी सकाळी लवकर उठा. त्यानंतर आंघोळ करा आणि स्वच्छ कपडे घाला.

? एका पाटावर स्वच्छ कपडा घाला आणि त्यावर भगवान विष्णूची मूर्ती स्थापित करा.

? विष्णूजींना पिवळ्या गोष्टी खूप प्रिय आहेत. म्हणून भगवान विष्णूला पिवळे फुले आणि पिवळी फळे अर्पण करा.

? यानंतर भगवान विष्णूला धूप आणि दीप दाखवा. विष्णूजींची आरती करा.

? गुरुवारी केळीच्या झाडाच्या पूजेचंही विशेष महत्त्व आहे. म्हणून या दिवशी केळीच्या झाडाची पूजा करावी.

विष्णूची उत्पत्ती कशी झाली?

शिव पुराणानुसार भगवान शिव यांनीच भगवान विष्णूंची निर्मिती केली. एकदा शिवने पार्वतीला सांगितले की एक माणूस असावा जो विश्वाची देखभाल करेल. शक्तीच्या सामर्थ्याने विष्णू प्रकट झाले. ते अद्वितीय होते. ते कमळांसारखे नेत्र, चतुर्भुजी आणि कौस्तुकामणीने सुशोभित होते. सर्वत्र व्यापक असल्यामुळे त्यांचे नाव विष्णू पडले. पौराणिक कथेनुसार, भगवान शंकर म्हणाले की, मी तुम्हाला फक्त लोकांना आनंद देण्यासाठीच निर्माण केले आहे. कार्य सिद्धीसाठी तुम्ही तपश्चर्या करा.

विष्णूजींनी तपश्चर्या केली. पण, शंकरजींचे दर्शन झाले नाही. त्यांनी पुन्हा तपश्चर्या केली, तेव्हा त्यांनी पाहिलं की त्याच्या शरीरातून पाण्याचे अनेक प्रवाह वाहात होते. सर्वत्र पाणी-पाणी झाले होते. तेव्हा त्यांचे एक नाव नारायण पडले. सर्व घटक त्याच्यापासून उत्पन्न झाले. पौराणिक कथेनुसार, प्रथम निसर्गाचा उगम झाला. त्यानंतर सत, रज आणि तम हे तीन गुण आले. यानंतर, शब्द, स्पर्श, रुप, रस आणि गंध यांचा उगम झाला. मग पंचभूताचा जन्म झाला.

Know The Story Behind Lord Vishnu Birth And How To Worship Vishnu

टीप – या लेखात देण्यात आलेली माहिती, सूचना आणि मान्यता ही उपलब्ध सामान्य माहितीवर आधारित आहे. कुठलाही उपाय करण्यापूर्वी ज्योतिष विषयातील जाणकारांशी संपर्क करा…

संबंधित बातम्या :

Skanda Sashti 2021 : आषाढ महिन्यातील स्कंद षष्ठी, जाणून घ्या शुभ मुहूर्त, पूजेची पद्धत आणि महत्व

मनुष्यच नाही तर देवी-देवताही चुका करतात, ती कुठली चूक होती ज्यामुळे यमराजला पृथ्वीवर जन्म घ्यावा लागला होता

Non Stop LIVE Update
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या...
बटेंगे तो कटेंगेच्या वक्तव्यावरून पंकजा मुंडेंचा यू-टर्न? म्हणाल्या....
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?
'पंकजाताईंनी मोठ मन केल म्हणून मी...', सभेतून धनंजय मुंडे काय म्हणाले?.
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला
चित्रपटात काम केलं असत.., सदा सरवणकरांच्या मुलीचा अमित ठाकरेंना टोला.
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका
'रामदास कदम सरपटणारा साप, निवडणुकीनंतर...',ठाकरे गटाच्या नेत्याची टीका.
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका
'राणे पिता-पुत्र हे गाडग्यासारखे..', ठाकरे गटाच्या बड्या नेत्याची टीका.
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं..
भाजपच्या किती जागा येणार?,कोण होणार CM?; विनोद तावडेंनी थेट सांगितलं...
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद
डोंबिवलीत भाजपचं कार्यालय फोडल, कोणी केल्ला हल्ला? घटना CCTV मध्ये कैद.
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्
एकनाथ शिंदेंच्या आमदारानं पैसे वाटले? विधानसभेच्या तोंडावर अडचणी वाढल्.
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?
पंकजा मुंडेंकडून भाऊ धनंजय मुंडेंना खास गिफ्ट, सभेतून काय केली घोषणा?.
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य
पवार कुटुंबातील कटुता भविष्यात दूर होणार? अजित पवारांचं मोठं वक्तव्य.