जाणून घ्या काय आहे पौष महिन्याचे महत्व आणि सूर्य देवाची पूजा करण्याची विधी
हिंदू धर्मातील दहावा महिना म्हणजे पौष महिना आहे. या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने चांगली फळ प्राप्ती होते. पौष महिन्यात सकाळी स्नान करून सूर्याला अर्घ्य द्या. यानंतर ‘ओम आदित्यय नमः या मंत्राचा जप करा. पौष महिन्यात मध्यरात्री पूजा केल्यास लवकर फळ मिळते. या महिन्यात उबदार कपडे आणि नवीन कपडे दान करणे शुभ आहे.
हिंदू महिन्यातील पौष हा दहावा महिना आहे. यावेळी पौष महिना 16 डिसेंबर ते 13 जानेवारी पर्यंत आहे. पौष महिन्यामध्ये हेमंत ऋतुचा प्रभाव असतो. त्यामुळे थंडी वाढण्याची शक्यता सांगण्यात आली आहे. पौष महिन्यामध्ये सूर्याचा विशेष प्रभाव राहतो. त्यामुळे या महिन्यात सूर्याची उपासना केल्याने चांगली फळ प्राप्ती होते. या महिन्यात सूर्य 11000 हजार किरणांसह व्यक्तीला ऊर्जा प्रदान करत असतो आणि आरोग्य देत असतो. सूर्याची उपासना केल्यास व्यक्ती वर्षभर निरोगी आणि समृद्ध राहते अशी मान्यता आहे.
पौष महिन्याचे महत्व पौष महिन्यामध्ये उबदार कपडे आणि अन्न पदार्थ दान करणे चांगले मानले जाते. या महिन्यात लाल आणि पिवळ्या रंगाचे कपडे परिधान केल्यास भाग्य उजळते. त्यासोबतच पौष महिन्यामध्ये घरात कापुराचा वापर केल्याने आरोग्य चांगले राहते. या महिन्यात मध्यरात्री पूजा केल्यास लवकर फलप्राप्ती होते.
पूजा कशी करावी? पौष महिन्यात दररोज सकाळी लवकर उठून स्नान करून सूर्याला अर्घ्य अर्पण करावे. तांब्याच्या भांड्यातून सूर्याला अर्घ्य देणे अत्यंत शुभ मानले जाते. सूर्याला अर्घ्य अर्पण करताना त्यात तांदूळ आणि लाल फुले टाकावे. त्यानंतर ‘ओम आदित्यय नमः’ या सूर्य मंत्राचा जप करा आणि या महिन्यात मिठाचे सेवन कमी करा.
खाण्याच्या सवयींची काळजी घ्या पौष महिन्यात आहारात सुकामेवा आणि चरबी युक्त पदार्थांचा समावेश करणे फायदेशीर ठरेल. या महिन्यात साखरे ऐवजी गुळाचे सेवन करा. त्यासोबतच ओवा, लवंगा आणि आले याचे सेवन करणे फायदेशीर ठरेल. अनियमित अंघोळ आणि जास्त खाणे धोकादायक ठरू शकते. जास्त तेलकट आणि तूपकट खाणे देखील या महिन्यात टाळा.
या मंत्रांचा जप करा ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय सहस्रकिरणराय मनोवांछित फलम् देहि देहि स्वाहा।। ॐ ह्रीं घृणिः सूर्य आदित्यः क्लीं ॐ ह्रीं ह्रीं सूर्याय नमः। ॐ सूर्याय नम: ॐ घृणि सूर्याय नम: ॐ हृां मित्राय नम:
डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)