Numerology: जाणून घ्या अंकशास्त्रानुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस; ‘हा’ भाग्यांक असणाऱ्या जातकांच्या आयुष्यात येणार नवे वळण

अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल.

Numerology: जाणून घ्या अंकशास्त्रानुसार कसा असेल तुमचा आजचा दिवस; 'हा' भाग्यांक असणाऱ्या जातकांच्या आयुष्यात येणार नवे वळण
Follow us
| Updated on: Jun 01, 2022 | 8:22 PM

अंकशास्त्रानुसार (Numerology) , एखाद्या व्यक्तीचा मूलांक हा त्या व्यक्तीच्या तारखेची बेरीज असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्या व्यक्तीचा जन्म 23 एप्रिल रोजी झाला असेल, तर त्याच्या जन्मतारखेच्या अंकांची बेरीज 2+3=5 आहे. म्हणजेच 5 या अंकाला त्या व्यक्तीचे मूलांक म्हटले जाईल. जर एखाद्याची जन्मतारीख दोन अंकी म्हणजेच ११ असेल तर त्याची मूलांकिका 1 + 1 = 2 असेल. तर एकूण जन्मतारीख, जन्म महिना आणि जन्म वर्ष याला भाग्यांक (lucky number) म्हणतात. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 22-04-1996 रोजी झाला असेल तर या सर्व संख्यांच्या बेरजेला भाग्यांक म्हणतात. 2+2+0+4+1+9+9+6=33=6 म्हणजे त्याचा भाग्यांक 6 आहे. अंकशास्त्राच्या मदतीने तुम्ही तुमच्या दैनंदिन योजना यशस्वी करू शकता. अंकशास्त्राच्या आधारे तुमचे ग्रह तुमच्यासाठी अनुकूल आहेत की नाही हे दैनिक अंकशास्त्रानुसार तुम्हाला कळू शकेल. आज तुम्हाला कोणत्या आव्हानांचा सामना करावा लागू शकतो किंवा तुम्हाला कोणत्या प्रकारच्या संधी मिळू शकतात. दैनिक अंकशास्त्र अंदाज वाचून, तुम्ही दोघेही परिस्थितीसाठी तयार होऊ शकता. चला तर मग अंकशास्त्राद्वारे जाणून घेऊया तुमचा मूलांक, शुभ अंक आणि भाग्यशाली रंग कोणता आहे.

  1. अंक  1 आज तुम्ही स्वतःला बंधनमुक्त अनुभववाल. व्यवसायात प्रगती होण्याची शक्यता आहे.  कुठलाही मोठा आर्थिक निर्णय घेण्याआधी  तज्ञाचा सल्ला घ्यावा. यामुळे भविष्यातील हानी टळेल. सरकारी कामे रखडू शकतात. संभ्रमाची स्थिती राहील.  जोडीदारासोबत शाब्दिक चकमक उडू शकते. शुभ अंक – 10 शुभ रंग- लाल
  2. अंक 2 आज तुम्ही तुमच्या  जोडीदारासाठी भेटवस्तू खरेदी करू शकता. विवाह ईच्छुकांना चांगली बातमी मिळू शकते. जुन्या समस्या मार्गी लागू शकतात. तुम्ही तुमच्या जोडीदारासोबत रोमँटिक क्षण घालवाल. शुभ अंक – 2 शुभ रंग – पिवळा
  3. अंक 3 तुमच्या वैयक्तिक समस्यांमुळे तुमची मनःशांती बिघडू शकते. मानसिक दडपण टाळण्यासाठी योगा करा. तुमच्या आणि तुमच्या प्रिय व्यक्तीमध्ये मतभेद निर्माण होऊ शकतात. तुमची व्यवसाय क्षमता वाढवून करिअरचे नवीन मार्ग उघडू शकतात . शुभ अंक – 14 शुभ रंग – जांभळा
  4. अंक 4 आज एखाद्या मोठ्या व्यक्तीची साथ तुम्हाला उच्च शिखरावर नेण्यासाठी उपयुक्त ठरेल. कोणावरही अंधविश्वास ठेवू नका अन्यथा फसवणूक होऊ शकते. सट्टा, जुगार इत्यादींपासून दूर राहा. जोडीदारासोबत आनंदात वेळ घालवाल. तुमचे प्रेमळ वागणे तुमच्या आजूबाजूच्या लोकांना आनंदित करेल. शुभ अंक – 2 शुभ रंग –  नारंगी
  5. हे सुद्धा वाचा
  6.   अंक 5  तुम्ही तुमच्या तत्वांशी एकनिष्ठ राहाल. आर्थिक परिस्थिती सामान्य असेल आणि तुम्ही नियोजनबद्ध पद्धतीने काम कराल. कामाच्या ठिकाणी तुमची वागणूक तुम्हाला प्रसिद्धी देईल. प्रवासात काळजी घ्या. आज तुम्हाला तुमच्या जोडीदाराच्या नाराजीचा सामना करावा लागू शकतो. शुभ अंक – 10

    शुभ रंग- हिरवा

  7. अंक 6   कामाच्या ठिकाणी तुम्हाला खूप मेहनत करावी लागू शकते. उत्पन्नात अडथळे येतील. कोणतेही नवीन आणि महत्त्वाचे काम आताच सुरू करू नका, अन्यथा नुकसान सहन करावे लागेल. मुलांकडून चांगली बातमी मिळू शकते. प्रेमसंबंधात अडथळे येतील. संयम राख. शुभ संख्या – 2 शुभ रंग – राखाडी
  8. अंक 7 आज बोलण्यावर नियंत्रण ठेवावे. प्रियजनांशी मतभेद होऊन संबंध बिघडू शकतात. सरकारी कामात आणि खटल्यातही तुम्हाला वादाला सामोरे जावे लागू शकते. आज व्यवसायातील समस्या सुटण्याची शक्यता आहे. नोकरीत ध्येयपूर्तीसाठी दबाव राहील. प्रेम-संबंध तुमची निंदा आणि अपयशाचे कारण बनू शकतात. शुभ अंक – 12 शुभ रंग – पिवळा
  9. अंक 8  अचानक झालेल्या खर्चामुळे तुमचा आर्थिक बोजा वाढू शकतो. सहकारी आणि वरिष्ठांचे सहकार्य लाभल्याने तुमचा उत्साह वाढेल. जीवनात एक नवीन वळण येऊ शकते जे प्रेम संबंधांना एक नवीन मार्ग देईल. मान-सन्मान वाढेल. सर्वच क्षेत्रातील विद्यार्थ्यांसाठी हा उत्तुंग यशाचा काळ असेल. शुभ अंक – 3

    शुभ रंग- तपकिरी

  10. अंक 9  आज तुमच्यामध्ये शारीरिक आणि भावनिकदृष्ट्या मोठा बदल होऊ शकतो. आर्थिक अडचणी येतील. काहीतरी चांगले मिळविण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम कराल. पालकांशी संबंध सुधारतील. मानसिक तणाव आणि शारीरिक कमजोरीची समस्या राहील. व्यावसायिक धोरणांवर पुनर्विचार कराल. जोडीदाराची भावनिक जोड सार्थ ठरेल. शुभ अंक – 23 शुभ रंग – पिवळा
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'
कराडच्या पत्नीकडे 'ते' व्हिडीओ, सुरेश धस स्पष्ट म्हणाले; ' मी लई...'.
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचा फोटो समोर, आरोपीची ओळख पटली?.
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले...
सैफच्या हल्ल्यावर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले....
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात
सैफवर हल्ला करणाऱ्या 'त्या' व्यक्तीचं लोकेशन ट्रेस, मुंबईच्या या भागात.
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध
सैफचा जीव घ्यायचा होता? बॉलिवूडच्या खलनायकाकडून हल्ल्याचा निषेध.
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?
लाडकी बहीण योजना महिलांना आमिष दाखवण्यासाठी... सरकारनं काय म्हटलं?.
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?
'बारामतीत दरमहिन्याला बोलवत जा कारण...', मुंडे दादांना काय म्हणाल्या?.
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी
ट्रेन रिकामी, सीटवर पाय; विशेष लोकलमध्ये रेल्वे कर्मचाऱ्यांची दादागिरी.
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?
...म्हणून सैफ टार्गेटवर, शरद पवार गटाच्या बड्या नेत्याला कोणावर संशय?.
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?
सैफची प्रकृती सध्या कशी? 'लिलावती'कडून निवेदन जारी, नेमकं काय म्हटलंय?.