Last Solar Eclipse of 2021 | सावधान! सूर्यग्रहणाचा शरीरावर होणार वाईट परिणाम, या गोष्टी करणं टाळाच

असे मानले जाते की सूर्यग्रहण दरम्यान, नकारात्मक किरण वातावरणात असतात, ज्यामुळे व्यक्तीच्या आरोग्यावर देखील परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात या काळात काय काळजी घ्यावी 

Last Solar Eclipse of 2021 | सावधान! सूर्यग्रहणाचा शरीरावर होणार वाईट परिणाम, या गोष्टी करणं टाळाच
Last Solar Eclipse of 2021
Follow us
| Updated on: Dec 02, 2021 | 9:24 AM

मुंबई : अवकाशात होणाऱ्या घटनांचा मनावी आयुष्यावर खूप परिणाम होत असतो. अशीच एक खगोलीय घटना म्हणजे ग्रहण. या गोष्टील पुराणांमध्ये खूप महत्त्वप्राप्त आहे. वैज्ञानिकदृष्ट्या ही फक्त एक खगोलीय घटना आहे. पण शास्त्रांमध्ये या संदर्भात अनेक गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. अशीच एक गोष्ट म्हणजे सूर्यग्रहणाचा प्रभाव चंद्रग्रहणापेक्षा जास्त मानला जातो. 2021 सालातील शेवटचे सूर्यग्रहण शनिवार, 4 डिसेंबर रोजी होणार आहे. भारतीय वेळेनुसार, हे ग्रहण सकाळी 11 वाजता सुरू होईल आणि दुपारी 03:07 वाजता संपेल. असेही मानले जाते की सूर्यग्रहणाचा आपल्या आरोग्यावर अनेक प्रकारे परिणाम होतो. चला तर मग जाणून घेऊयात या दिवशी तुम्ही कोणता काळजी घ्याल.

पचनक्रियेवर परिणाम पुरांणामध्ये सूर्यग्रहण काळात खाणे किंवा पिणे वर्ज केले आहे. असे मानले जाते की ग्रहण काळात वातावरणात खूप नकारात्मकता असते. हे अन्नाद्वारे आपल्या शरीरात पोहोचते, ज्यामुळे आपल्या पचनसंस्थेवर परिणाम होतो. अशा स्थितीत जरी अन्न खावे लागत असेल तर अन्न खाण्यापुर्वी तुळशीचे पान खावे. तुळशीमध्ये पारा असतो, पारावर कोणत्याही प्रकारच्या किरणांचा प्रभाव पडत नाही.

डोळ्यांना हानिकारक बहुतेकांना ग्रहण पाहण्याची उत्सुक्ता असते. पण ते उघड्या डोळ्यांनी कधीही पाहू नये. या दरम्यान, सूर्यप्रकाशातील किरणांचा डोळ्यांवर वाईट परिणाम होतो. यामुळे तुम्हाला अंधत्व देखील येऊ शकते. त्यामुळे जर तुम्हाला ग्रहण पाहायचेच असले तर चश्मा घालून पाहा.

गर्भवती महिलेच्या बाळांसाठी धोक्याचे ग्रहण काळात महिलांनी घराबाहेर पडू नये, असेही सांगितले आहे. बाहेरील वातावरणाचा बाळाचा जन्म परीणाम होऊ शकतो. पण या गोष्टीला कोणताही वैज्ञानिक पुरावा नाही. पण सावधगिरी बाळगणे केव्हाही चांगले.

नकारात्मकतेत वाढ असेही मानले जाते की ग्रहण काळात सूर्याच्या नकारात्मक किरणांचा मानसिक क्षमतेवरही परिणाम होतो. त्यामुळे या काळात मन शांत ठेवा कोणताही निर्णय घेण्या आधी विचार करा.

भारतात ग्रहणाचा कोणताही प्रभाव नाही हे सूर्यग्रहण भारतात दिसणार नसल्याने इथे त्याचा परिणाम होणार नाही.अंटार्क्टिका, दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका येथे हे ग्रहण पाहता येईल.

(येथे दिलेली माहिती ही धार्मिक श्रद्धा आणि लोकश्रद्धेवर आधारित आहे, याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही.)

इतर बातम्या

चमत्कारिक तुळशीचे पाणी, नोकरी-व्यवसायात प्रगती, आजारातून मुक्त होण्यास होईल मदत

Ketu Temple | आश्चर्य..! या मंदिरात चढवलेलं दूध निळं पडतं, जाणून घ्या केरळातील या रहस्यमयी मंदिराबाबत

मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट
मुंडेंचं मंत्रिपद वाचणार की जाणार? दादांनी घेतली दिल्लीत शहांची भेट.
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?
महाराष्ट्रातील असं एक गाव जिथं माणसं आपोआप होतात टकले, नेमक काय घडतय?.
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य
शकुनी-कंस मामाला लाजवेल असा कलीयुगातला मामा, भाचीच्या लग्नात असं कृत्य.
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप
'चुकीच्या पद्धतीने...', धसांचा धनंजय मुंडेंनंतर पंकजा मुंडेंवर आरोप.
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली
पुरुष वेश्या.. मुंडेंच्या राजीनाम्यावर बोलताना 'या' आमदाराची जीभ घसरली.
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला
'मनगटात दम असेल तर कामाने मोठे व्हा', जानकरांना महिला नेत्याचा सल्ला.
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट
'शरद पवार गटाकडून दादांना मिसकॉल येतात', NCP च्या आमदाराचा गौप्यस्फोट.
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?
'बाप-लेकीला सोडा अन्...', शरद पवारांच्या खासदारांना कोणाचा प्रस्ताव?.
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक
दादर स्टेशनवर तरूणीचे कापले केस, काढला पळ; माथेफिरूला पोलिसांकडून अटक.
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला
फेसबूक अन् इंस्टाग्राम वापरताय? आता होणार मोठा बदल, झुकेरबर्ग म्हणाला.