Dream Indication | भयानक स्वप्नांनी रोज दचकून जागे होता? सात उपाय देतील सुखाची निद्रा

दिवसभराचा संपुर्ण थकवा दूर करण्यासाठी आपण झोपतो, पण यावेळी देखील आपल्या विचाऱ्यांचे चक्र सुरुच असते. काही जणांच्या मते आपण दिवसभर जे विचार करतो अवचेतन मन (subconscious mind) साठवून ठेवते आणि झोपल्यानंतर आपल्याला त्या विचारांचा एक संच दिसतो.

Dream Indication | भयानक स्वप्नांनी रोज दचकून जागे होता? सात उपाय देतील सुखाची निद्रा
Bad-Dream-Remedeis
Follow us
| Updated on: Mar 07, 2022 | 12:45 PM

मुंबई : दिवसभराचा संपुर्ण थकवा दूर करण्यासाठी आपण झोपतो, पण यावेळी देखील आपल्या विचाऱ्यांचे चक्र सुरुच असते. काही जणांच्या मते आपण दिवसभर जे विचार करतो अवचेतन मन (subconscious mind) साठवून ठेवते आणि झोपल्यानंतर आपल्याला त्या विचारांचा एक संच दिसतो. त्यामुळेच कदाचित काही स्वप्नाचा (Dream) संदर्भ आपल्याला लागत नाही. अग्निपुराणानुसार आपली स्वप्ने आपल्याला शुभ अशुभ संकेत देत असतात. त्यांचा आपल्या आयुष्यावर खोल परिणाम होतो. आयुष्यात प्रत्येकजण कोणत्या ना कोणत्या क्षणी काहीतरी स्वप्न नक्कीच पाहतो . कधी उघड्या डोळ्यांनी तर कधी बंद डोळ्यांनी. बंद डोळ्यांनी पाहणाऱ्या स्वप्नांवर आपले नियंत्रण नसते. बंद डोळ्यांनी पाहिलेली स्वप्ने कधी चांगली असतात तर कधी वाईट. यातील काही स्वप्ने लक्षात राहतात तर काही विसरली जातात. जर तुम्हीही रात्री येणाऱ्या वाईट स्वप्नांमुळे त्रस्त असाल तर खाली सांगितलेले ज्योतिष (Jyotish)उपाय तुमच्यासाठी फायदेशीर ठरु शकतील.

  1. जर रात्री तुम्हाला वाईट स्वप्न पडत असेल तर ते कल्पनेचे चित्र समजून झोपावे. त्या चित्रांचा तुमच्या आयुष्यावर काहीच परिणाम होत नाही.
  2. झोपण्यापूर्वी सर्व चिंता बाजूला ठेवा आणि भयपट पुस्तके वाचू नका किंवा असे कोणतेही चित्रपट पाहू नका किंवा झोपण्यापूर्वी कोणाशीही अशा गोष्टींची चर्चा करू नका.
  3. जर तुमचा हिंदू धर्मावर विश्वास असेल तर तुम्ही रात्री झोपताना भक्तिभावाने हनुमान चालिसाचे पठण करावे जेणेकरून कोणत्याही प्रकारची भीती दूर होईल आणि भयानक स्वप्ने पडू नयेत.
  4. जर तुम्हाला रात्री झोपताना खूप भयानक स्वप्न पडत असतील तर ते टाळण्यासाठी चाकू, कॅच, नेल कटर किंवा कांदा उशीखाली ठेवा. हा उपाय केल्याने भीतीदायक स्वप्नांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे.
  5. तुम्हाला रात्री भयानक स्वप्न पडू नयेत, असे वाटत असेल, तर तुमच्या बेडरूममध्ये चप्पल आणि शूज बेडजवळ ठेवू नका.
  6. ज्योतिष शास्त्रानुसार, जर तुम्हाला वारंवार वाईट स्वप्ने पडण्याची तक्रार असेल तर यापासून बचाव करण्यासाठी तुम्ही तुमच्या पलंगाच्या डोक्याखाली तीन मोराची पिसे ठेवावीत.
  7. जर तुम्हाला रोज रात्री वाईट स्वप्न पडत असतील तर तुम्ही झोपण्याची जागा आणि दिशा बदलून अशी स्वप्ने टाळण्यासाठी उपाय देखील करू शकता. वास्तूनुसार जर तुम्हाला वाईट स्वप्ने टाळायची असतील तर उत्तर आणि पश्चिम दिशेला डोके ठेवून झोपू नका.

संबंधीत बातम्या :

भगवान शिवाची कृपा व्हावी असं वाटत असेल तर पूजा करताना या सात चुका अजिबात करु नका!

Chanakya Niti | ”घर का भेदी लंका ढाए” अशी परिस्थिती निर्माण होईल , आचार्य चाणक्यांनी सांगितलेल्या या 5 गोष्टी कायम लक्षात ठेवा

कोरोना कमी काय झाला, नंदी दूध पिऊ लागला, कुठे व्हिडीओ व्हायरल झाले, जाणून घ्या काय आहे कारण

'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'
'मंत्रिमंडळात नाव आहे, असं सांगितलं अन् शपथविधीच्या वेळी वगळलं...'.
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया
छगन भुजबळांचा मंत्रिमंडळातून पत्ता कट, मनोज जरांगे पहिली प्रतिक्रिया.
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'
मंत्रिमंडळातून पत्ता कट शिवतारे भडकले, 'आता अडीच वर्षांनी मंत्रिपद...'.
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?
मंत्रिमंडळ विस्तारानंतर नाराजी नाट्य, कोण-कोणत्या नेत्यांमध्ये नाराजी?.
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ
दोघांची दोस्ती अन् विधानभवनाच्या पायऱ्यांवर जमली गट्टी; बघा व्हिडीओ.
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत
बावनकुळेंनंतर भाजप प्रदेशाध्यक्षपदासाठी 'या' दोन नेत्यांची नावं चर्चेत.
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'
मंत्रिपद नाही, नाराज भुजबळ म्हणाले, 'मला डावललं, फेकलं फरक पडत नाही..'.
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्...
मंत्रिपद हुकलं... तानाजी सावंत बॅग पॅक करून नागपुरातून निघाले अन्....
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले..
बिनखात्याचं मंत्रिमंडळ म्हणत संजय राऊतांचा महायुतीवर निशाणा; म्हणाले...
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद
आज महाराष्ट्र बंदची हाक, परभणीत आंबेडकर अनुयायांनी पुकारला जिल्हा बंद.