Chandra Grahan: 2024 मधील शेवटचे चंद्रग्रहण सुरु, या काळात श्राद्ध करावे का?
18 सप्टेंबर 2024 पासून पितृ पक्ष सुरू होत आहे. याच दिवशी चंद्रग्रहणही होत आहे. हिंदू धर्मात चंद्रग्रहण सकारात्मक नसून अशुभ मानले जाते. चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा थेट परिणाम होणार नाही. हे ग्रहण पितृ पक्षातील पहिल्या श्राद्धाला होत असल्याने त्याचे महत्त्व वाढत आहे.
Lunar Eclipse in Pitra Paksha: सन 2024 मधील दुसरे सूर्यग्रहण बुधवारी सकाळी 6 वाजून 11 मिनिटांनी सुरु झाले. आजपासून पितृ पक्षही सुरू झाला आहे. ज्योतिष शास्त्रानुसार चंद्रग्रहण असलेल्या परिस्थितीत पितरांचे श्राद्ध करू नये. यातून पितरांना मोक्ष मिळणार नाही. पितरांना शांती आणि मोक्ष प्रदान करण्यासाठी चंद्रग्रहणानंतरच श्राद्ध करण्यास प्रारंभ करा. चंद्रग्रहण 10.17 वाजता संपेल. त्यानंतर पिंडदान करु शकतात.
कोणत्या राशींवर काय परिणाम
चंद्रग्रहण आणि पितृ पक्ष याला हिंदू धर्मात महत्त्व आहे. या दिवशी धन, विलास, आनंदाचा कारक मानला जाणारा शुक्र स्वतःच्या राशीत तूळ राशीत प्रवेश करेल. कन्या राशीमध्ये ग्रहणाचा प्रभाव दिसून येईल. या चंद्रग्रहणाचा प्रभाव काही राशींवर प्रतिकूल तर काही राशींवर अनुकूल असणार आहे. पितृ पक्षातील पहिले श्राद्ध करणारे लोक ग्रहणाच्या आधी किंवा नंतर श्राद्ध करू शकतात.
भारतात चंद्रग्रहणाचा प्रभाव नाही
चंद्रग्रहण भारतात दिसणार नाही. चंद्रग्रहण विशेषत: दक्षिण अमेरिका, पश्चिम आफ्रिका आणि पश्चिम युरोप या देशांमध्ये दिसेल. भारतीय वेळेनुसार, पेनम्ब्रल चंद्रग्रहण सकाळी 6.11 वाजता सुरू झाले आहे. सकाळी 07:42 वाजता आंशिक चंद्रग्रहण होईल. चंद्रग्रहण सकाळी 08:14 वाजता शिखरावर असेल आणि पेनम्ब्रल ग्रहण सकाळी 10:17 वाजता संपेल. चंद्रग्रहण सुरु होत असलेल्या वेळेत भारतात सकाळ आहे. या परिस्थितीत ग्रहणाचा भारतातील जनतेवर फारसा परिणाम होणार नाही.
18 सप्टेंबर 2024 पासून पितृ पक्ष सुरू होत आहे. याच दिवशी चंद्रग्रहणही होत आहे. हिंदू धर्मात चंद्रग्रहण सकारात्मक नसून अशुभ मानले जाते. चंद्रग्रहण भारतात दिसणार नसल्याने त्याचा थेट परिणाम होणार नाही. हे ग्रहण पितृ पक्षातील पहिल्या श्राद्धाला होत असल्याने त्याचे महत्त्व वाढत आहे.
कोणत्या राशीवर काय परिणाम
चंद्रग्रहणाच्या दिवशी गुरु वृषभ राशीत, मंगळ मिथुन राशीत, बुध सिंह राशीत, सूर्य, शुक्र आणि केतू कन्या राशीत, प्रतिगामी शनि कुंभ राशीत असेल आणि ग्रहण चंद्र आणि राहूच्या संयोगात असेल. मीन राशीचे संक्रमण असेल. ज्योतिषशास्त्रानुसार हे चंद्रग्रहण मेष, सिंह, मकर आणि मीन राशीसाठी हानिकारक असेल. आर्थिक नुकसानासोबतच त्यांना नोकरी इत्यादी नुकसानीलाही सामोरे जावे लागेल. त्याचबरोबर शुक्र, तूळ इत्यादी राशींना फायदा होईल. त्यांच्या आर्थिक स्थितीतही सुधारणा होईल.